IAF Recruitment : अग्निपथ वायु भरती 2023 साठी रेजिस्ट्रेशन सुरु, अर्ज करा

agnipath vayu

IAF Agniveer Agnipath Recruitment 2023 : अग्निवीर वायु भरती 2023 – 2024 साठी अर्ज सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३.

भारतीय वायू सेना मार्फत अग्निपथ वायू भरती करिता अर्ज मागवण्यात येत आहे. अग्निवीर वायू भरती दोन टप्प्यामध्ये होणार असून सर्व प्रथम लेखी चाचणी व त्या नंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. अर्ज १७ मार्च पासून ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन सादर करावा लागेल .

अग्निवीर वायु भरती 2023 माहिती

पदे : अग्निवायु

पात्रता :

  • विज्ञान विषय : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांपैकी 12 वी किंवा इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वैकल्पिकरित्या, डिप्लोमा (पॉलीटेकनिक कोर्समध्ये किमान 50% गुणांसह 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह, किंवा भौतिकशास्त्र हा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गैर-व्यावसायिक विषय म्हणून आणि गणितासह 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेला असावा
  • इतर : इयत्ता 12वी इंग्रजी विषय म्हणून 50% गुणांसह किंवा किमान 50% गुणांसह 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम. इंग्रजी विषयात 50% गुण असणे आवश्यक आहे.

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा ….

वयोमर्यादा : साडे 17 वर्षे ते 21 वर्षे  जन्म 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान.

अर्ज फी : 250 /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

लेखी परीक्षा दिनांक : 20 मे 2023 पुढे

नोटिफिकेशन डाउनलोड करा :

अग्निवीर वायु भरती जाहिरात

जाहिरात डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : https://agnipathvayu.cdac.in/