Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न

आज आम्ही खास तुमच्यासाठी इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न (Indian History IMP Questions) आणि त्याचे उत्तर घेऊन आलो आहोत.जे PSI पूर्व परीक्षा , PSI मुख्य परीक्षा ,STI पूर्व परीक्षा ,ASO पूर्व परीक्षा या मध्ये हमखास विचारलेली आहेत.

Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न

Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न खालीलप्रमाणें आहेत.

1) खालील विधांनांचा विचार कराः

(अ) सरोजनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
(ब) बद्रीन तय्यबजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते

वरीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/ कोणती?

(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब
(4) न अ व ब


2) भारतीय लोक सायमन कमिशनच्या विरोधात (2013)

(1) भारतीयांना 1919 च्या कायद्यात बदल नको होता.
(2) प्रातांमध्ये द्विगृही पद्धती बंद करण्याची शिफारस सायमन कमिशनने केली होती.
(3) सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.
(4) देशाच्या विभाजनाची सूचना सायमन कमिशनने केली होती.


3) सत्याग्रहातबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(अ) रौलेट कायदा (Sedition) समितीच्या शिफारशीवर आधारित होता.
(ब) रौलेट सत्याग्रहामध्ये गांधीजींनी होम रुल लीगचा वापर करण्याचा प्रयत्न केला.
(क) आयोग विरुद्धातील निदर्शन रौलेट सत्याग्रहाबरोबर तोडले गेले.

वरीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती?

( 1 ) फक्त अ
(2) अ आणि ब
(3) ब आणि क
(4) अ, ब, क


4) रौलेट कायद्याचा उद्देश काय होता? (2012)

(1) महायुद्धाच्या प्रयत्नांना सक्तीची आर्थिक मदत देणे.
(2) विनाचौकशी अटक करणे तसेच संक्षेपाने खटला निकालात काढणे.
(3) खिलाफत चळवळ दाबून टाकणे
(4) माध्यमांच्या/वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादने


5) ब्रिटीशांनी भारतीय शेतकर्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला?

(1) भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा
(2) भारतीय प्रगतीत हातभार लागावा
(3) ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता.
(4) शेतकन्यांना फार मोठा नफा मिळणार होता.


6) स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस ‘स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला?

(1) 26 जानेवारी 1949
(2) 26 जानेवारी 1930
(3) 26 जानेवारी 1931
(4) 24 जानेवारी 1930


7) गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अमलात आणली.

(1) हिमाचल प्रदेश
(2) बिहार
(3) राजस्थान
(4) मध्यप्रदेश


8) फेब्रुवारी 1922 च्या चौरीचौरी घटनेनंतर गांधीजींनी असहकर चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन ‘नॅशनल कॅलमिटी असे कोणी केले?

(1) पंडित मोतीलाल नेहरू
(2) लाला लजपत राय
(3) सुभाषचंद्र बोस
(4) पंडित जवाहरलाल नेहरू


9) पुढीलपैकी कोणी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती?

(1) जवाहरलाल नेहरू
(2) सुभाष चंद्र बोस
(3) इंग्लिश पत्रकार
(4) फ्रेंच पत्रकार10) कालानुक्रमे रचना करा.

(अ) मस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनांच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली.
(ब) काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली.
(क) लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
(ड) गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

पर्यायी उत्तरे

(1) अ, क, ड, ब
(2) ड, ब, अ, क
(3) ब, अ, क, ड
(4) अ, ब, क, ड


11) गांधी-आयर्विन करारामुळे काय साध्य झाले ?

(1) पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
(2) मिठावरील कर रद्द झाला.
(3) गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
(4) वरीलपैकी एकही नाही.


12) जवाहरलाल नेहरुंबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

(अ) ते स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते.
(ब) त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
(क) ‘नेहरू रिपोर्ट ‘ लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राजपद्धतीचा आराखडा मांडला.
(ड) मला पाश्चात्त्य जगात उपन्यासारखे वाटते, पण मायदेशातही कधी कधी परक्यासारखे वाटते,’ असे त्यांचे मत होते.

पर्यायी उत्तरे

(1) अ, ब, व, ड
(2) अ, ब, व,क
(3) अ, क, व,ड
(4) ब, क,व,ड


13) सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

(1) कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
(2) सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
(3) गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
(4) वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.


14) खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?

(1) शाळावरील बहिष्कार
(2) न्यायालयांवरील बहिष्कार
(3) परदेशी कापडांवरील बहिष्कार
(4) कर न भरणे


15) भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु करण्याचा मान खालीलपैकी कुणास जातो?

१) बाळशास्त्री जांभेकर
२) दादाभाई नौरोजी
३) जेम्स ऑगस्टस हिक्की
४) लोकमान्य टिळक


16) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?

१) १७९३ चा सनदी कायदा
२) १८१३चा सनदी कायदा
३) १७७३ चा नियमनाचा कायदा
४) १८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा


17) १९व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून मांडणी कोणी केली?

अ] दादाभाई नौरोजी
ब] एम. जी. रानडे
क] रोमेशचन्द्र दत्त
ड] आर.सी. मुजुमदार

१) अ फक्त
२) अ आणि ब फक्त
३) अ, ब आणि क
४) अ आणि ड फक्त


18) पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.

१) ‘शारदासन’ आणि ‘मुक्तिसदन’ची स्थापना
२) ‘स्त्रीकोश’ या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
३) निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन’ व ‘प्रीतीसादन’ ४) त्यांच्या कार्याबद्दल “कैसर ए हिंद” हि पदवी बहाल


19)’द ग्रेट रिबेलियन’ या पुस्तकाचे लेखक कोण?

(१) अशोक कोठारी
(२) डॉ. एस. एन. सेन
(३) अशोक मेहता
(४) वि.डी.सावरकर


20) अयोग्य विधान ओळखा.

(१) स्थापना १८८५ मध्ये झाली.
(२) राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
(३) राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
(४) इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.


21) पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखाः

(1) भूलाभाई देसाई –
(2) कैलासनाथ काटजू
(3) तेजबहादूर सपू
(4) मोतीलाल नेहरू


22) गोलमेज परिषदेतील निवदेनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला म्हणून संबोधावे असे म्हटले होते.

(1) महार
(2) हरिजन
(3) प्रोटेस्टंट हिंदू
(4) नवबौद्ध


23) सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधानात कोणते/ कोणतीविधान/ विधाने खरे / खरी नाहीत?

(1) खान अब्दुल गफ्फार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकांचे संघटन करुन सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरु केली, त्यात कर न देणे हे ही अंतर्भूत होते.
(2) नागालँडची राणी गेडीन्ल्यूने वयाच्या 13 व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षांची कारावासाची शिक्षा
(3) सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षाही ग्रामीण विभागात बलवान बनली
(4) व्यापारी समूहाने सरकारला मदत केली.


24) बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ? (PSI पूर्व परीक्षा 2012)

(1) लॉर्ड रिपन
(2) लॉर्ड डफरीन
(3) लॉर्ड डलहौसी
(4) लॉर्ड कर्झन


25) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? (PSI पूर्व परीक्षा 2012)

(1) महात्मा गांधी
(2) लोकमान्य टिळक
(3) चित्तरंजन दास
(4) न्यायमूर्ती रानडे


26) इ. स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा ……. याने केली. (PSI पूर्व परीक्षा 2012)

(1) लॉर्ड कडून
(2) पंचम जॉर्ज
(3) इंग्लंड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट


27) महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ ….. यांनी सुरू (PSI पूर्व परीक्षा 2012 )

(1) महात्मा गांधी
(2) महात्मा फुले
(3) पंडित नेहरु
(4) लोकमान्य टिळक


28) ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले ? (PSI मुख्य परीक्षा 2012)

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(2) महात्मा ज्योतिबा फुले
(3) लोकमान्य टिळक
(4) गोपाळ गणेश आगरकर


29) लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात …. या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली.

(1) न. चिं. केळकर व कृष्णाजी खाडिलकर
(2) ज. स. करंदीकर व न. चिं. केळकर
(3) जयंतराव टिळक व दा. वि. गोखले
(4) ग. वि. केतकर व जयंतराव टिळक


30) जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंबन केला?

(1) राष्ट्रीय शिक्षण-मोच- स्वदेशी
(2) स्वदेशी आंदोलन क्रांती
(3) बहिष्कार आंदोलन मोर्चा
(4) बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण


31) स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे?

(1) अस्पृश्यांचे पुढारी
(2) मराठ्यांचे पुढारी
(3) तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी
(4) गरिबांचे पुढारी


32) भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औद्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? (STI पूर्व परीक्षा 2012)

(1) 1915
(2) 1916
(3) 1917
(4) 1918


33) हंटर आयोगाचे प्रमुख डॉ. विल्यम हंटर यांच्या मते …. च्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. (STI पूर्व परीक्षा 2012)

(1) शारदा सदन
(2) हुजूरपागा
(3) नूतन मराठी विद्यालय
(4) न्यू इंग्लिश स्कूल


34) आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती ?

( 1 ) उषा मेहता
(2) अरुणा असफ अली
(3) लक्ष्मी सेहगल
(4) यापैकी नाही.


35) लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्व अंगिकारली होती. त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती?

(1) स्वराज्य
(2) स्वदेशी
(3) सहकार
(4) राष्ट्रीय शिक्षण


36) ‘अभिनव भारत’ चे उद्देश काय होते ?

(अ) परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळविणे.
(ब) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकांत प्रचार करणे.
(क) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रूजविणे.
(ड) जेंव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे,

पर्यायी उत्तरे

(1) अ, क
(2) अ, ब, क
(3) ब, क, ड
(4) अ, ब, क, ड


37) लॉर्ड कर्झन ने बंगालची फाळणी कशासाठी केली? (ASO पूर्व परीक्षा 2012)

(अ) प्रशासनाच्या सोयीसाठी
(ब) राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी
(क) अन्य भाषिक प्रदेश (बिहार, ओरिसा) वेगळा करण्यासाठी.

पर्यायी उत्तरे
(1) अ, ब
(2) ब. क
(3) अ.क
(4) अ, ब, क


38) बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही? (PSI पूर्व परीक्षा 2013)

(1) तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता.
(2) ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरविले. वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली.
(3) मवाळांनी व मुस्लीम लीग पुढान्यांनीही तिच्या कार्यक्रमात भाग घेतला.
(4) वरील एकही नाही.


39) जहाल काळात ‘केसरी’ व ‘मराठा’ जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते ? (PSI पूर्व परीक्षा 2013)

(1) त्यांनी ‘केसरी’ इंग्रजीत व ‘मराठा’ मराठीत 1881 मध्ये सुरू केले.
(2) आगरकरांनी ‘मराठा’ चे तर टिळकांनी ‘केसरी’ चे संपादन केले.
(3) वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
(4) वरील एकही विधान बरोबर नाही.


40) रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? (PSI पूर्व परीक्षा 2013)

(1) कधी काळी, इंग्रज येण्याअगोदर ते दरोडेखोरी करत
(2) सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते.
(3) इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्त्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले.
(4) वरीलपैकी एकही अयोग्य नाही.


41) हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता. (2001)

(1) काल कोठडी प्रकरण
(2) जालियनवाला बाग हत्याकांड
(3) 1857 चा उठाव
(4) बंगालची फाळणी


42) पंजाबमधील 1919 च्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहड पदवी परत करणारे प्रसिद्ध भारतीय कोण? (2004)

(1) तेज बहादूर सप्रू
(2) आशुतोष मुखर्जी
(3) रवींद्रनाथ टागोर
(4) सय्यद अहमद खान


43) माँटेग्यू-चेम्सफर्ड अहवाल खालीलपैकी कशाचा आधार होता? (2004)

(1) इंडियन कौन्सिल अॅक्ट 1909
(2) भारत सरकार कायदा 1919
(3) भारत सरकार कायदा 1935
(4) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947


44) खालीलपैकी कशामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडले? (2007)

(1) शस्त्रास्त्रे कायदा
(2) जन सुरक्षा कायदा
(3) रौलेट कायदा
(4) देशी वृत्तपत्र कायदा


45)’न्यू हॅम्प्स फॉर ओल्ड’ या सदराखाली भारतीय राष्ट्रीय सभेच्या मवाळ राजकारणावर चिकित्सक टीका कुणी केली?
(2008)

(1) अरविंद घोष
(2) आर. सी. दत्ता
(3) सय्यद अहमदखान
(4) वीर राघवाचारी


46) रौलट कायदा झाला तेव्हा भारताचे व्हाइसरॉय कोण होते? (2008)

(1) लॉर्ड आयर्विन
(2) लॉर्ड रिडिंग
(3) लॉर्ड चेम्सफोर्ड
(4) लॉर्ड वेव्हल


3 thoughts on “Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा