Indira Gandhi Information in Marathi – इंदिरा गांधी माहिती

  • जन्म : १९ नोव्हेंबर १९१७.
  • मृत्यू : ३१ ऑक्टोबर ११८४
  • पूर्ण नाव : इंदिरा फिरोज गांधी
  • वडील : जवाहरलाल
  • आई : कमला
  • जन्मस्थान : अलाहाबाद (उत्तर प्रदेश).
  • शिक्षण : अलाहाबाद. पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले.
  • उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रवेश घेतला पण काही कारणास्तव पदवी न मिळविता भारतात त्या परत आल्या.
  • विवाह : फिरोज गांधी यांच्यासोबत (इ. स. १९४२ मध्ये).

कार्य

इ.स. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळयळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकाना साहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची ‘वानरसेना’ स्थापन केली इ.स १९४२ च्या ‘चले जाव’ आदोलनात त्यानी भाग घेतला आणि त्याबद्दल तुरुंगवास भोगला.

इ. स. १९५५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्या बनल्या पुढे इ.स १९५९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली.

इ.१९६४ मध्ये पंडित नेहरूच्या मृत्यूनंतर लालबहादुर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले त्यांच्या मंत्रिमडळात इंदिराजीनी माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले.

इ.स. १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री याच्या निधनानंतर इंदिरा गांधी याची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.

इ. स १९६९ मध्ये कांग्रेस पक्षात फूट पडून जुन्या कांग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट कांग्रेस व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आले.

याच वर्षी त्यांनी पुरोगामी व लोककल्याणकारी कार्यक्रमाची अमलबजावणी करण्याची जोरदार मोहीम उघडली प्रथम त्यानी देशातील चौदा बड्या बँकाचे राष्ट्रीयीकरण केले. याशिवाय संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला.

इ स. १९७१ मध्ये इंदिराजीनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषीत केली या निवडणुकीमध्ये त्यांनी ‘गरिबी हटाव’ ची घोषणा दिली.

या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचड बहुमताने विजयी झाला. काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती केंद्रित झाली आणि त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या

भारतावर सतत आक्रमण करण्याऱ्या पाकिस्तानच्या पूर्वबंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारतद्वेष्ट्या पाकिस्तानचे’बांगला देश’ व ‘पाकिस्तान’ असे दोन तुकडे केले.

तत्पूर्वीच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे अमेरिकेत असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन मोठ्या धूर्तपणे इ. स. १९७१ मध्ये सोव्हिएत युनियनशी वीस वर्षाचा ऐतिहासिक असा मैत्री व पर सहकार्य करार घडवून आणला त्यांची ही असामान्य कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी त्यांचा इ. स. १९७१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून गौरव केला.

इ. स. १९७२ मध्ये इंदिराजींनी पाकिस्तानशी द्विपक्षीय ‘सिमला करार’ करन आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले.

इ.स. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींची रायबरेली मतदार संघातून लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरविली.

इंदिरा गांधींनी इ. स. १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली. पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली व इ. स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार खावी लागली. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या.

परिणामी जनता पक्षाच्या हातात सत्ता गेली पण त्या पक्षाचे व सरकारमधील घटक पक्षांचे भांडण लागल्याने इ. स. १९८० मध्ये मुदतपूर्व झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळविला आणि इंदिराजी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या.

इ.स. १९८२ मध्ये दिल्लीत नवव्या आशियायी स्पर्धाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

इ.स. १९८३ मध्ये नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची सातवी शिखर परिषद भरविली गेली. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले.

पाकिस्तानच्या चिधावणीने पंजाबमधले शीख अतिरेकी पंजाबचे स्वतंत्र ‘खलिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी विघातक कारवाया करू लागले. शीख अतिरेकी अमृतसरमधील सुवर्णमंदिरासारख्या पवित्र जागेत शस्त्रास्त्रे ठेवू लागले. त्यामुळे इंदिराजींनी देशहितासाठी सुवर्णमंदिरात सैन्य घुसविले.

सैनिकी कारवाई करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागले. या घटनेने काही अविचारी शिखांची मस्तक भडकली. परिणामी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सतवंतसिंग व बेअंतसिंग या शीख शरीररक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

पुरस्कार

इ.स. १९७१ मध्ये ‘भारतरत्न’.

विशेषता

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,

भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.

मृत्यू

३१ ऑक्टोबर ११८४ रोजी त्यांचे निधन झाले.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा