बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे

• बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे : बंगाल राज्य (१७१७-१७७२) व बंगाल मधील युद्धे यांच्याविषयी माहिती बगणार आहोत.बंगाल चा दिवाण म्हणून कोणाची निवड झाली प्लाशीची लढाई केंव्हा झाली त्याची पार्श्वभूमी काय होती या बद्दल आढावा घेणार आहोत तर चला मग सुरु करूया बंगाल राज्य व बंगाल युद्धे याच्याबद्दल माहिती.

● बंगाल राज्य व बंगाल युद्धे

१)मुर्शीद कुली खान (१७१७-२७)

● मुर्शीद कुली खान याची नेमणूक १७०० मध्ये औरंगजेबने बंगालचा दिवाण म्हणून, तर फारूक सियारने १७१३ मध्ये ५ नायब सुभेदार म्हणून व १७१७ मध्ये सुभेदार म्हणून केली प्लासीच्या होती. १७१७ पासून तो स्वतंत्रपणे बंगालचा कारभार पाहू लागला. १७१९ मध्ये फारूक सियारने त्याला ओरिसाचाही सुभेदार बनविले.

● त्याने आपली राजधानी ढाक्याहून मुर्शीदाबाद येथे हलविली.मुघल सत्तेपासून स्वायत्तता प्राप्त केली.अशा रीतीने तो बंगालचा पहिला नवाब ठरला.

● त्याने बंगालच्या प्रशासनात विविध सुधारणा घडवून आणल्या. तसेच औरंगजेबचे १६९१ चे फर्मान व फारूक सियारचे १७१७ चे फर्मान यांनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आलेल्या व्यापारी सवलतींच्या गैरवापरावर त्याचे कडकपणे लक्ष ठेवले.

२)शुजाउद्दिन (१७२७-३९)

● तो मुर्शीदचा जावई होता, त्याने मुर्शीदची धोरणे पुढे चालू ठेवली. त्याला मुघल बादशाह मुहम्मद शाहने १७३३ मध्ये बिहारचीही सुभेदारी बहाल केली.त्यामुळे यापुढे बंगालच्या नवाबाची सत्ता बंगाल, बिहार व ओरिसा यांवर प्रस्थापित झाली.

३)सरफराझ खान (१७३९-४०)

● तो शुजाचा मुलगा होता. मात्र त्यास बिहारचा नायब सुभेदार अलीवर्दी खान याने ठार मारले.


४)अलीवर्दी खान (१७४०-५६)

● त्याने मुघल बादशाह मुहम्मद शाह यास २ कोटी रूपये देऊन सत्ताप्राप्तीचा कायदेशीर फर्मान प्राप्त करून घेतला. त्याच्या काळात बंगालमध्ये मराठ्यांचे (नागपूरच्या भोसल्यांचे) सतत हल्ले चालू होते. वर्षाला १२ लाख रुपये इतकी बंगालची चौथ म्हणून देऊ करून त्याने भोसल्यांशी शांतता प्रस्थापित
केली.

● त्याने इंग्रज व फ्रेचांना व्यापारी विशेषाधिकारांचा गैरवापर करण्यापासून प्रतिबंध केला. इंग्रजांना कलकत्याभोवती व फ्रेंचांना चंद्रनगर भोवती तटबंदी बांधण्यापासून परावृत्त केले.

● अलीवर्दीच्या मृत्यूच्या आधीच गादीसाठी सत्ता संघर्ष सुरू झाला होता. मात्र अलीवर्दीने आपल्या सर्वात लहान मुलीचा मुलगा सिराज उद्दौला याची निवड केली.

५) सिराज उद्दौला (१७५६-५७)

बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे : प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमीः

i) सत्तेवर आल्यावर सिराजने कलकत्त्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला पत्रे पाठवून कलकत्त्याची तटबंदी पाडण्याचे, बंगालच्या गादीवर दावा असलेल्या शौकत जंग (घषिती बेगमचा मुलगा व सिराजचा चुलत भाऊ) याला मदत न करण्याचे, तसेच शौकत जंग याला पाठिंबा देणाऱ्या राजवल्लभ यांच्या कुटुंबाला संरक्षण न देण्याचे आवाहन ब्रिटिशांना केले.

ii)मात्र ब्रिटिशांनी त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सिराजने प्रथम ४ जून, १७५६ रोजी इंग्रजांची कासीमबझार येथील वखार ताब्यात घेतली व नंतर १५ जून रोजी कलकत्ता ताब्यात घेतले. इंग्रजांनी फुल्टा या समुद्री ठिकाणावर आश्रय घेतला. कलकत्त्याचे नाव अलिपूर असे करण्यात आले.
कलकत्त्याचा कब्जा माणिकचंद नावाच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात देऊन सिराज मुर्शिदाबादला परतला.

• iii)ब्लॅक होल ट्रॅजेडी:- २० जून, १७५६ रोजी एका छोट्या खोलीमध्ये रात्री डांबण्यात आलेल्या १४६ इंग्रज युद्धकैद्यांपैकी १२३ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला, केवळ २३ व्यक्ती जीवंत राहिले. या घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी असे नाव पडले. इंग्रजांनी त्याचे खापर सिराजवर फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र इतिहासकारांच्या मते, निश्चितच या घटनेसाठी सिराज जबाबदार नव्हता.

iv) या घटनेनंतर सिराजने शौकत जंगचा पराभव करून त्यास ठार केले. शौकत जंगने मुघल बादशाह आलमगीर, दुसरा याच्याकडून बंगालच्या सुभेदारीचा फर्मान मिळविलेला होता. तसेच तो सत्ता मिळविण्यासाठी बंगालमधील काही प्रभावशाली व्यक्ती व ब्रिटिशांच्या मदतीने कटाच्याही तयारीत
होता.

v) त्यानंतर ब्रिटिशांनी नवाबाच्या दरबारातील काही प्रमुख व्यक्तींना फितविले: मीर जफर- सिराजचा मीर बक्षी, माणीकचंदकलकत्त्याचा ऑफिसर-इन-चार्ज, ओमीचंद- कलकत्त्याचा श्रीमंत व्यापारी, जगत सेठ- बंगालचा प्रसिद्ध बँकर/सराफ,राय दुर्लभ व खादीम खान- प्रमुख दरबारी इत्यादी.

vi) १४ डिसेंबर, १७५६ रोजी मद्रासहून आलेल्या नौदलाच्या तुकडीच्या साहाय्याने रॉबर्ट क्लाईव्हने २ जानेवारी, १७५७ रोजी कलकत्ता परत मिळविले.

vii) अलिपूरचा तह (फेब्रुवारी, १७५७):- ५ फेब्रुवारी रोजी रॉबर्ट क्लाईव्हने थोड्या ब्रिटिश सैनिकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करून सिराजच्या काही सैनिकांचा पराभव केला. त्यामुळे सिराजने इंग्रजांशी अलिपूरचा तह करून त्यांचे पूर्वीचे सर्व व्यापारी विशेषाधिकार कायम केले. कलकत्त्याचे संरक्षण फ्रेंचांच्या हल्ल्यापासून करण्यासाठी तटबंदीची संमती देण्यात आली. ब्रिटिशांना नुकसान भरपाई देण्यात आली.ब्रिटिशांनी मैत्री व सदिच्छेचे वचन दिले.

viii) मात्र मार्च मध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या चंद्रनगर वसाहतीवर हल्ला करून तहाचे उल्लंघन केले. सिराजने चिडून फ्रेंचांना संरक्षण जाहीर केले. त्यामुळे ब्रिटिशांनी जून मध्ये सिराजला पदच्यूत
करण्याचा कट आखला. मीर जफर या सिराजच्या मीर बक्षीला नवाबपदाचे आमिष दाखवून त्याला आपल्याकडे वळवून घेतले.

प्लासीची लढाई, २३ जून, १७५७

प्लासीची लढाई, २३ जून, १७५७ : इंग्रजांच्या कारवायांची कल्पना आल्याने सिराज मोठ्या
सैन्यानिशी इंग्रजांवर चालून गेला. २३ जून, १७५७ रोजी बक्सारची प्लासी येथे लढाईला तोंड फुटले. मीर जफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर लढाईत उतरलेच नाही. मीर जफरचा विश्वासघात ध्यानात आल्याने सिराजला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. मोहनलाल व मीर मदान यांच्या नेतृत्वाखाली छोटी तुकडी ब्रिटिशांविरूद्ध शौर्याने लढली. मीर जफरचा मुलगा मीरान याने सिराजला पकडून ठार मारले. अशा
रीतीने शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी केवळ फंदफितुरीने प्लासीची लढाई जिंकली. प्लासीची लढाई ही एक छोटी चकमक (a skirmish) ठरली. मात्र तिचे परिणाम दूरगामी ठरले.

◆ ६)मीर जफर (१७५७-६०)

● इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जफर बंगालचा नवाब बनला. त्याने अंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसामध्ये मुक्त व्यापारचा अधिकार दिला, तसेच २४ परगणा भागाची जमीनदारीही दिली. सिराजने कलकत्त्यावर केलेल्या हल्ल्याची भरपाई म्हणून १.७७ कोटी रुपये दिले. तसेच इंग्रज अधिकाऱ्यांना अनेक ‘देणग्या’ दिल्या. त्याच्या काळापासूनच भारताच्या संपत्तीचे
इंग्लंडकडे नि:सारण होण्यास सुरूवात झाली.

● मीर जफरला इंग्रजांची लूडबूड नकोशी वाटायला लागल्यानंतर त्यांने इंग्रजाविरूद्ध डचांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रिटिशांनी १७५९ मध्ये डचांचा बेडेराच्या लढाईत (Battle of Bedera) पराभव केला. त्याचबरोबर १७६० मध्ये मीर
जफरची उचलबांगडी करून त्याचा जावई मीर कासीम याला नवाब बनविले.

◆ ७)मीर कासीम (१७६०-६३)

● मीर कासीमने इंग्रजांना बुरद्वान, मिदनापूर व चितगावची जमीनदारी बहाल केली, तसेच २९ लाख रुपये भरपाई दिली.

● त्याने आपली स्थिती बळकट करण्यासाठी विविध महसूल व हल्ला लष्करी सुधारणा केल्या. राजधानी मुर्शिदाबाद हून मोघीर हलविली. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी दस्तकांचा गैरवापर करीत. दस्तक हे मुक्त व्यापारासाठी कंपनीला देण्यात येणारे मोफत पास (a free pass) असत. तो त्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. भारतीय व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी त्याने १७६३ मध्ये अंतर्गत व्यापारावरील सर्वच कर रद्द करून टाकले.

● मीर कासीमच्या या कृती न आवडल्यामुळे इंग्रजांनी त्याला पदच्युत करून मीर जफरला पुन्हा नवाबपद दिले.

बंगाल राज्य व बंगाल युद्धे : बक्सारची लढाई, २२ ऑक्टोबर, १७६४

● बक्सारची लढाई, २२ ऑक्टोबर, १७६४
नवाबपद गेल्यानंतर मीर कासीम अवधच्या नवाबाच्या
मीर आश्रयाला गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अवधचा नवाब शुजा उद्दौला, मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र माहीम काढली.

● २२ ऑक्टोबर, १७६४ रोजी बिहारमधील बक्सार येथे युद्ध अशा झाले. मेजर हेक्टर मन्रो याच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने फंदफितुरीने
वरील तिघांच्या सैन्याचा पराभव केला.

◆ ८)मीर जफर (१७६३-६५):

१७६५ मध्ये मीर जफरचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा नज्म उद्दौला याला नवाब बनविण्यात आले.

◆ ९)नज्म उद्दौला (१७६५-७२)

● १७६५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉबर्ट क्लाईव्हने पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी प्रसिद्ध तह केला. तो अलाहाबादचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तहान्वये मुघल बादशाहकडून इंग्रजांना बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला त्याला ‘दिवाणी अधिकार’ असे म्हणतात. तसेच इंग्रजांनी बंगालच्या नवाबाकडून बंगालच्या सुभ्याचे ‘फौजदारी अधिकार’ (निझामती अधिकार) ही मिळविले.

● मात्र हे अधिकार इंग्रजांनी प्रत्यक्ष आपल्या हातात घेतले नाहीत.त्यासाठी त्यांच्याकडे वेळ व मनुष्यबळही नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी दिवाणी अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उपदिवाण, तर फौजदारी अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उप-नझिम नेमला. हे व्यक्ती नवाबाच्या दरबारातील भारतीय व्यक्ती होते. अशा रीतीने, ब्रिटिशांच्या हातात अधिकार आले, मात्र जबाबदारी नव्हती. नवाब केवळ नामधारी शासक बनला. याला ‘दुहेरी शासन पद्धती’ (Dual system ofGovernment) असे नाव पडले. ती एक भ्रष्ट पद्धत ठरली. ही पद्धत
१७७२ पर्यंत चालली.

● १७७२ मध्ये ही पद्धत रद्द करण्यात आली. नज्म उद्दौलाला पेन्शन देऊन पदमुक्त करण्यात आले व बंगालची सत्ता ब्रिटिशांनीप्रत्यक्ष आपल्या हातात घेतली.

बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा