जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) : Period of the Extremists

जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) माहिती : Period of the Extremists

प्रास्ताविक : जहालाचा कालखड, १९०५ ते १९१८ (Period of the Extremists)

• मवाळाच्या कालखडातच हळूहळू जहालवाद (extremism) वाढू लागला होता. त्यास लढाऊ राष्ट्रवाद (militant nationalism) असेही म्हटले जाते. हा जहालवाद १९०५ च्या वंगभंग चळवळीच्या स्वरूपात स्पष्टपणे व्यक्त झाला. त्यामुळे १९०५ ते १९१८ पर्यंतचा कालखंड ‘जहाल कालखंड’ म्हणून ओळखला जातो. अर्थात, या काळात (मुख्यतः १९०७ ते १९१६ दरम्यान) काँग्रेस मवाळ नेत्यांच्याच ताब्यात होती.


• भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या सुरूवातीपासूनच अनेक नेत्यांनी परकीय सत्तेचे धोके जाणून देशभक्तीची गरज वाढीस लागण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती. सुरूवातीच्या राष्ट्रीय चळवळीने शिक्षित भारतीयांचे आवश्यक तेवढे राजकीय शिक्षण झालेले होते. त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलून देशात नवचैतन्य निर्माण झाले होते.

• मात्र मवाळ राष्ट्रवाद्यांनी केलेल्या कोणत्याच महत्वाच्या मागण्या ब्रिटिशांनी न स्विकारल्यामुळे मवाळ नेत्यांची राजकीय तत्वे व पद्धती यांप्रती राजकीयदृष्ट्या जागृत लोकांच्या मनात नाराजी निर्माण झाली.

जहालवादाच्या उदयाची कारणे

(Causes of rise of extremism)


१) ब्रिटिश सत्तेच्या खऱ्या स्वरूपाची जाणीवः

• मवाळ राष्ट्रवादी नेत्यांचे राजकारण या विश्वासावर आधारलेले होते की, ब्रिटिश सत्तेची आतून सुधारणा शक्य आहे. मात्र ब्रिटिश सत्तेच्या राजकीय व आर्थिक बाजूं बद्दल अधिक ज्ञान पसरत गेल्यामुळे हा विश्वास ढासाळत गेला. अर्थात मवाळांचे राजकीय कार्यच त्यासाठी बहुतांशी कारणीभूत ठरले.

i) राष्ट्रवादी नेत्यांनी लोकांच्या दारिद्र्यासाठी ब्रिटिश सत्तेलाच जबाबदार धरले.

ii) राजकीयदृष्ट्या जागृत भारतीयांची खात्री झाली की, ब्रिटिश सत्तेचा उद्देश भारताचे आर्थिक शोषण व इंग्लंडचे समृद्धीकरण हाच आहे. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या जागी भारतीय जनतेने चालविलेले व नियंत्रित केलेले सरकार प्रस्थापित झाल्याशिवाय भारताची आर्थिक प्रगती शक्य नाही, अशी त्यांची खात्री झाली.

iii) भारतीय उद्योग भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालीच विकसित होऊ शकतील, असे त्यांचे मत झाले, कारण भारतीय शासनच भारतीय उद्योगांना संरक्षण व प्रोत्साहन देऊ शकेल.

iv) परकीय सत्तेच्या आर्थिक दुष्परिणामांचे दृश्य स्वरूप भीषण दुष्काळाच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसून आले. १८९६ ते १९०० दरम्यानच्या दुष्काळाने ९० लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला.

२) आत्मसन्मान व आत्मविश्वास यांमध्ये वाढ

• भारतातील सामाजिक -धार्मिक चळवळीमुळे १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय राष्ट्रवादी नेत्यांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढला होता.तशेच भारतीय जनतेच्या स्वतःचे शाशन चालविण्याच्या व देशात प्रगतीच्या वाटेवर नेण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास वाढला होता.

३) शिक्षण व बेरोजगारीची वाढ

• १९ व्य शतकाच्या अखेरीस शिक्षित भारतीयांच्या संख्या स्पष्टपणे वाढली होती .त्यांच्यापैकी बरेच अत्यंत कमी पगाराच्या सरकारी नोकऱ्यावर काम करत होते,तर बहूसंख्य बेरोजगार होते.

४) आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव

काही आंतरराष्ट्रीय घटनांच्या प्रभावामुळे जहालवादास प्रोत्साहन मिळाले.

५) लढाऊ राष्ट्रवादाच्या विचारांचे आधीपासून आस्तित्व

राष्ट्रीय चळवळीच्या सुरवातीपासूनच भारतात लढाऊ राष्ट्रवादाची विचारसरणी आस्तित्वात होती.

जहालांची राजकीय कार्यपद्धती

• जहालांची राजकीय कार्यपद्धती टिळकांच्या चतु:सूत्री कार्यक्रमाद्वारे स्पष्ट होते.या कार्यक्रमात बहिष्कार ,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चार सूत्रांचा समावेश होता.

१) स्वदेशी : स्वदेशी हि आर्थिक तशेच राजकीय चळवळ होती .लोकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास ब्रिटनमधील उद्योगांना नुकसान होईल व देशी उद्योगांना उर्जीतावस्था येईल.

२) बहिष्कार : स्वदेशी व बहिष्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.टिळकांनी सांगितले कि ” तुम्ही स्वदेशीचा स्वीकार केला,तर परदेशी मालाचा बहिष्कार केला पाहिजे”.

३) राष्ट्रीय शिक्षण : तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम,स्वाभिमान,व स्वावलंबी वृत्ती रुजवण्याचे साधन म्हणून टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला.

४) स्वराज्य : वरील सर्व कृतीचे अंतिम फलित म्हणजे स्वराज्य.

जहालमतवादी नेते

१) बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०)

२)बिपीन चंद्र पाल ( १८५८-१९३२)

३) लाला लजपत राय (१८६५-१९२८)


Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा