जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi

जाहिरात लेखन Jahirat Lekhan in Marathi – या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी मध्ये जाहिरात लेखन Advertisement Writing कसे करावे . जाहिरात लेखन हे वर्ग ९ वि व १० वि च्या अभ्यासक्रमामध्ये विचारले जाते.

जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi

जाहिरात लेखन म्हणजे एखादी वस्तू , साधन, सेवा यांची माहिती आकर्षक पणे लोकांपर्यंत पोहचवणे . जाहिरात बनविण्याचा प्रमुख उद्देश आपली वस्तू लोकांच्या नजरेत आणून तिची जास्तीत जास्त विक्री करणे हा असतो. तुम्ही रस्त्यावरील बॅनर, वर्तमानपत्र, मोबाईल फोन व टीव्ही मध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती पाहिल्या असतील. या जाहिरात खाण्याच्या वस्तू पासून तर परिधान करण्याच्या कपड्यांपर्यंतच्या असतात. 

जाहिरातीची माध्यमे – Jahirat Lekhan Medium

 1. इंटरनेट – Internet – Digital Marketing
 2. चित्रपट – Movie
 3. वृत्तपत्रे – Newspaper
 4. मासिके –
 5. आकाशवाणी Radio
 6. दूरदर्शन – Television
 7. चौकांमधील फलक – Banners
 8. गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके

जाहिरात तयार करताना घ्यायची काळजी – Tips to Write

 1. जाहिरात तयार करताना प्रथम मथळा, उपमथळा तयार करावा.
 2. जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
 3. जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी.
 4. जाहिरातीत व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
 5. जाहिरातीची भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी.
 6. जाहिरातीतील तपशिलामध्ये सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी, कवितेतल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करावा.
 7. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी.
 8. जाहिरात ही वेचक, अर्थपूर्ण आणि प्रसन्नता निर्माण करणारी असावी.
 9. जाहिरात ही परिणामकारक आणि सुसंवाद साधणारी असावी.
 10. जाहिरातीत विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम.
 11. जाहिरातीला चित्राची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही.
 12. जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे आहे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी असते.
 13. जाहिरातीमध्ये शक्य झाल्यास कंपनीची मुद्रा तयार करावी.
 14. जाहिरातीमध्ये कंपनीचे नाव व पत्ता ठळकपणे लिहावा.

पत्र लेखन मराठी मधे बघण्यासाठी येथे क्लिक करा

Jahirat Lekhan Examples

खालील दिलेल्या जाहिरात लेखन वाचून कृती सोडवा

 • जाहिरातीतून मिळणारा संदेश – योगा शिबिराचे आयोजन केले आहे.
 • जाहिरातीचे वैशिष्ट्य – जाहिराती मध्ये योग्य तज्ञाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे
 • जाहिरातीतील ठळक वैशिष्ट्ये – मोफत आरोग्य तपासणी

तुम्ही वाचले आहेत जाहिरात लेखन – Jahirat lekhan in Marathi . आवडले असल्यास कंमेंट करून नक्की कळवा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा