केंद्रप्रमुख भरती 2023 – एकूण 2384 जागा येथे करा अर्ज, अभ्यासक्रम व पात्रता बघा

kendra pramukh bharti

MSCE Cluster Head Recruitment 2023 : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील केंद्रप्रमुख भरती 2023 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ पर्यंत आहे. या लेखात आपण केंद्र प्रमुख भरती साठी अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता बघणार आहोत.

MSCE Recruitment 2023 – केंद्रप्रमुख भरती माहिती

शिक्षण परीक्षा परिषद पुणे, मार्फत राज्यातील शाळांमधील केंद्र प्रमुख या एकूण २३८६ पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे . या भरती अंतर्गत जिल्हा परिषेदमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी स्पर्धा परीक्षा आयोजित केली असून जुन २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होणार आहे.

केंद्रप्रमुख भरती पात्रता : ZP Cluster Head Recruitment 2023 Eligibility Criteria

  • फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा
  • प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करायच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारचे वय 50 वर्षे असावे.
  • उमेदवार ज्या जिल्ह्या परिषद मध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी पात्र असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३

केंद्र प्रमुख भरती अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/

केंद्र प्रमुख लेखी परीक्षा अभ्यासक्रम : ZP Cluster Head Recruitment 2023 Syllabus PDF

पात्र उमेदवारांची २०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल, त्यामध्ये परीक्षा माध्यम इंग्रजी व मराठी असेल आणि वेळ २ तास.

kendra pramukh abhyaskram

विभाग १ : बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी (१०० गुण)

अभियोग्यता : तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता. भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल. आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी.

बुद्धिमत्ता :आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी

विभाग २ : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह (१०० गुण)

उपघटक १. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकाशी संबंधित सर्व कायदे योजना व अद्यावत शासन निर्णय (१० गुण)

  • राज्यघटनेतील शिक्षक व शिक्षण विषय तरतुदींची कलमांची माहिती अद्यावत दुरुस्तीसह,
  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्यावत व दुरुस्तींसह विश्लेषण, बलस्थाने व अडचणी,
  • बालहक्क संरक्षण कायदा 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता,
  • विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्यशासन) व शिष्यवृत्ती,
  • विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.

उपघटक २. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य (१० गुण)

UNICEF, NCERT NUEPA, , NCTE,  CCRT TISS  TIFR Homi Bhabha centre of science education, RTE EFLU MPSP SCERT MIEPA SISI DIET राज्य आंग्लभाषा संस्था.

उपघटक ३. माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक) (१५ गुण)

  • इंटरनेटचा प्रभावी वापर,
  • शाळा स्तरावर विविध माहिती भरणे,
  • शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (सरल यु-डायस प्लस),
  • संगणक वापरा विषयीचे ज्ञान,
  • माहितीचे विश्लेषण,
  • शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब इत्यादी 

उपघटक ४. अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती (१५ गुण)

  • पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंत अभ्यासक्रम,
  • अध्ययन निष्पत्तीतील उणीवा,
  • सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
  • प्रश्न निर्मिती, (स्वाध्याय) कौशल्य,  ASER, NAS. PISA, 
  • प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र, 
  • निकालासंबंधीची सर्व कामे इत्यादी 

उपघटक ५. माहितीचे विश्लेषण मूल्यमापन (२० गुण)

  • प्राप्त माहितीचे विश्लेषण
  • शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
  • ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
  • संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने

उपघटक ६. विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान (१५ गुण

  • मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
  • क्रीडा विषयक घडामोडी.