केवलप्रयोगी अव्यये

केवलप्रयोगी अव्यये – Keval Prayogi Avyavy in Marathi – वाक्यात केवळ वापरावयाचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग (उपयोग) करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात किंवा ते उदगार व्यक्त करणारे म्हणून त्यांना उद्गागारवाची शब्द असेही म्हणतात.हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात. ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्तिप्रत्यय नसतो.

(१) अरेरे। सचिन तेंडुलकर आऊट झाला!
(२) शाब्बास। आरोही, चांगते यश मिळवितेस।
(३) अवय। केवढी गर्दी ही!
(४) बाप रे। तो पाहा वाघ!
(4) शी। मला नाही आवडतं ते!

वरील वाक्यांमध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्यांच्या द्वारे व्यक्त करतो. पण कधी-कधी हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद् गारवाटे व्यक्त करतो. हे उदगार दाखविणारे शब्द वाक्यांच्या आरंभी येतात. ते वाक्याचा भाग नसतात. ते स्वतंत्र उद् गार असतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचा त्यांच्यापुढे येणाऱ्या वाक्यांशी संबंध नसतो.


(१) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, अहाहा.
(२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये : ऊं, अॅः, अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय,
(३) आचर्यकारक केवलप्रयोगी अव्यये :- ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, चकचक्, अरेच्या.
(४) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये :- शाबास, भले, वाहवा, यंव, छान, ठीक, फक्कड, खाशी.
(५) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा,
(६) विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- छे, छट्, हॅट, ऊः, उंह, च, अंहं, छे छे.
(७) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- धिक्, युः, शीऽ, इश्श, हुत, हुड, फुस्, हत्, छत, छी.
(८) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- अगे, अरे, अहो, र, अगा, अगो, बा, रे.
(९) मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यये :- चुप, चिंप, गप, गुपचित.

मागील उदाहरणांवरून आपल्या सहज लक्षात आले असेल की, एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना
व्यक्त करण्यासाठी वापरला गेला आहे. अमुक एक शब्द अमुक भावना व्यक्त करण्यासाठी वापरता जातो, असे होत नाही. भावनांचा अंतःकरणात स्फोट होऊन हे शब्द आपोआप तोंडावाटे बाहेर येतात. उद्गागारवाची अव्ययापुढे नेहमी उद्गागारवाचक चिन्ह हवे.


● व्यर्थ उद्गारवाची अव्यय


केवलप्रयोगी अव्यये ही सामान्यतः वाक्याच्या आरंभी येतात व भावना व्यक्त करतात, हे आपण पाहिले. पण
काहीसे उद्गारासारखे वाटणारे शब्द वाक्यांच्या मध्येही येताना आढळतात.
पुढील वाक्ये पाहा.


(१) पण मन बेटे स्वस्थ राहीना.
(२) मी आपला काय बोलणार?
(३) काल म्हणे मुलांनी गडबड केली.
(४) येणार असेल तर येईना बापडा!


वरील वाक्यांतील ‘बेटे, आपला, म्हणे, बापडा’ हे शब्द कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत किंवा
त्यांच्यामुळे अर्थातदेखील काही विशेष भर पडते, असे नाही. उलट वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक किंवा व्यर्थ असे हे शब्द येत असल्यामुळे अशा शब्दांना व्यर्थ उद्गागारवाची अव्यय असे म्हणतात.
बोलताना केवळ लकब म्हणून किंवा आठवेनासे झाले म्हणजे काही व्यक्तींच्या बोलण्यात पालुपदासारखे काही शब्द पुनःपुन्हा येताना आढळतात. जसेआत्ता, बरं का, जळतं मेलं, आणखीन, कळलं इतकं, जेहेत्ते. बरीक, वगैरे. अशा शब्दांना पादपूरणार्थक
केवलप्रयोगी अव्यये किंवा पालुपदे असे म्हणतात.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा