कोतवाल विषयी माहिती मराठीमध्ये : Kotwal Information in Marathi

कोतवाल विषयी माहिती मराठीमध्ये : Kotwal Information in Marathi

१) कोतवाल हा पूर्णवळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील ग्रामनोकर आहे. कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे.

Navin Updates Sathi Telegram Join Kara

२) कोतवालाची नेमणूक तहसिलदार करतात.कोतवाल पदासाठी शिक्षण ४ थी पास असावे लागते.

३) कोतवालांची संख्या गावाच्या लोकसंख्यवर अवलंबून असते, मात्र एखादया गावी एकाहून अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार शासनाच्या परवानगीने जिल्हाधिकान्यास आहे.

कोतवालांची संख्या :

गावाची लोकसंख्या कोतवालांची संख्या
१००० पर्यंत
१००१ ते ३०००
३००१ हुन अधिक
कोतवालांची संख्या

४) कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४० वर्षे इतके असावे लागते.

५) कोतवालपदी नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीने कुळकायदयात धारणक्षेत्रापेक्षा अधिक जमिन मालक किंवा कूळ या नात्याने धारण केलेली नसावी.

६) कोतवालाची नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीस तारणादाखल १०० रु व दोन जामीन दयावे लागातत.

७) कोतवालावर नजीकचे नियंत्रण तलाठ्याचे असते.

८) कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर नियंत्रण पोलीस पाटील ठेवतो.

९)कोतवालास दर सहा महिण्यास १५ दिवस किंवा वर्षाला ३० दिवस अर्जित रजा मंजूर होते.कोतवालास ८ दिवसांची किरकोळ रजा देण्याचे अधिकार तलाठ्यास आहे.

१०) कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदारास आहे.

११) कामात दिरंगाई केल्याबद्दल कोतवालास निलंबीत करण्याचे अधिकार तहसिलदारांना आहे.

१२) गावपातळीवर तलाठ्याच्या हाताखाली महसूलाचे काम करण्यासाठी कोतवालाची नेमणूक करतात.

१३) कोतवालाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा कोतवाल हा त्याचे काम पाहतो.

१४) कोतवालास मासिक ५,००० इतके वेतन मिळते.

१५) कोतवालास वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येते.

कोतवालाची कार्य :

१) गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने-आण करण्याची जबाबदारी कोतवालावर असते.

२) गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्याची जबाबदारी कोतवालावर असते.

३) गावकऱ्यांना चावडी किंवा सजा येथे बोलविण्याचे कार्य कोतवाल करतो.

४) गावात घडलेल्या गुन्हासंबंधी पोलिस पाटलास माहिती देण्याचे काम कोतवाल करतो.

५) पोलिस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर कोतवाल पहारा ठेवतो.

६) शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकर्‍यांना चावडीवर बोलावुन आणणे.

७) बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.

८) अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीसपाटलांना मदत करणे.

९) गावातील अधिकार्‍यांना जमीन महसूल वसुलीस मदत करणे.

१०) गावातील अधिकार्‍यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.

११) बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.

Leave a Reply