HOME Recruitment

कृषी विभागात लघुलेखक, लिपिक, सहायक पदांसाठी भरती

By July 18, 2023
0
krushi vibhag bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023

महाराष्ट्र कृषी विभागा मार्फत गट क व गट ब अराजपत्रीत 218 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २२ जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालील प्रमाणे:

कृषी विभाग भरती – 2023

पदांचे नावे – लघुटंकलेखक,लघुलेखक व लघु लेखक, वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक

एकूण जागा -२१८

रिक्त पदाचे नाव – लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) , लघुलेखक (उच्च श्रेणी)

शैक्षणिक पात्रता- माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.  लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

वरिष्ठ लिपिक – १०५ जागा
शैक्षणिक पात्रता- किमान द्वितीय श्रेणी पदवीधर 

सहाय्यक अधीक्षक– ५३ जागा 
शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा–  १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ०५ वर्षे सूट)

पगार 

लघुटंकलेखक – २५,५००- ८१,१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक (निम्न श्रेणी) -३८६००-१,२२,८०० (सुधारित – एस-१५ : ४१,८००-१,३२,३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक (उच्च श्रेणी) – ४१,८०० – १,३२,३०० (सुधारित – S-16 : ४४,९०० – १,४२,४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
 

शुल्क – 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]

अर्ज करण्याची पध्दत :-

  • प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  • पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या
  • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही..

जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CLOSE [X]