DTE Recruitment 2023 : तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 31 ऑगस्ट 2023 ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

DTE Recruitment 2023

अंतर्गत विभाग :

  • तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
  • महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई
  • तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई, पुणे , औरंगाबाद , नागपूर, नाशिक

पदाचे नाव व रिक्त जागा :

पदाचे नावरिक्त पदे
निम्नश्रेणी लघुलेखक06
वरिष्ठ लिपिक29
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक)07
एकूण42

नोकरी ठिकाण : राज्यात कोठेही

एकूण जागा : ४

शैक्षणिक पात्रता :

निम्नश्रेणी लघुलेखक : ( Stenographer )

  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • मराठी लघुलेखनाचा वेग किंमान 100 शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक : ( Senior Clerk )

  • कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणुन घोषीत केलेली अन्य कोणतीही अर्हता.
  • संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखनात किमान 30 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनात किमान 40 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
  • किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर कोणत्याही उद्योगात किंवा औद्योगिक उपक्रम किंवा व्यावसायिक संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा महामंडळे किंवा शासनाने स्थापन केलेल्या मंडळामध्ये प्रशासन किंवा लेखा विषयक कामाचा किंमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव

निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक): (Laboratory Assistant):

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका (Diploma in Engineering) परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.
  • शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी, संस्था किंवा आस्थापना किंवा शासन अंगीकृत, महामंडळामधील प्रयोगशाळा सहाय्यक किंवा साईट सुपरवायजर पदावर किंवा त्याने धारण केलेल्या पदविकेच्या विद्याशाखेशी संबंधीत मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसींग किंवा मेंटेनन्स किंवा सीएनसी मशीन हाताळण्याचा रोजंदारी किंवा कार्यव्ययी किंवा करार पध्दतीवर किंवा मानधन इत्यादी स्वरुपात पूर्णवेळ कामाचा 1 वर्षाचा अनुभव

निवड प्रक्रिया : निवड IBPS कंपनी द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 21 सप्टेंबर 2023

जाहिरात व अर्ज लिंक (DTE Notification): डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर जा  https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा