महाज्योती मार्फत MPSC व UPSC मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु 2023 – 2024

MAHAJYOTI MPSC UPSC Free Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे स्पर्धा परीक्षा MPSC व UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

Mahajyoti Free Coaching MPSC/UPSC

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) व UPSC परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३ -२०२४ करीता OBC/SBC/VJNT या संवर्गातील पात्र विद्याथ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेकरीता इतर मार्गसवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना 2023-24 या वर्षामध्ये UPSC/MPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

परीक्षा UPSC – EnglishUPSC – MarathiMPSC
प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या150010001500
प्रशिक्षणाचा कालावधी11 महिने11 महिने11 महिने
विद्यावेतन13,000/- (75% उपस्थिती असल्यास) 10,000/- (75% उपस्थिती असल्यास) 10,000/- (75% उपस्थिती असल्यास)
आकस्मिक निधी18,000/-12,000/-12,000/-
प्रशिक्षणाचे ठिकाणदिल्ली (माध्यम- इंग्रजी)पुणे (माध्यम – मराठी )पुणे

महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  1. विद्यार्थी हा ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  2. विद्यार्थी हा ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी,
  3. विद्याथ्यों हाही नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
  4. विद्याथ्यों ही पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरीता अर्ज करु शकतात.
  5. महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालु योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही,
  6. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
  7. विद्यार्थ्यांचे किमान वय (MPSC – 19) (UPSC – 21) वर्ष व कमाल वय (MPSC – 43 ) (UPSC – 35) वर्ष पेक्षा जास्त असू नये. दिव्यांग व्यक्तीकरीता वय37 वर्षापेक्षा अधिक असू नये.

अर्ज कसा करावा :

खाली दिलेल्या महाज्योती च्या लिंक वर जाऊन सूचना फलक निवडावे व ओनलाईन अर्ज सबमिट करून कागदपत्रे अपलोड करावे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे.

महाज्योती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा