महाराष्ट्र जिल्हे माहिती : Maharastratil Jilhe Information

0
198

महाराष्ट्र जिल्हे माहिती : Maharastratil Jilhe Information

महाराष्ट्र जिल्हे माहिती :महाराष्ट्रात जिल्हे किती व कोणते? असा प्रश्न नेहमी पोलीस भरती परीक्षेत विचारला जातो. म्हणून त्या बद्दल आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र जिल्हे,त्यांचे क्षेत्रफळ,संख्या याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे (Maharastratil Jilhe Information) यांची माहिती बगणार आहोत.मुंबई शहर व मुंबई उपनगर धरून महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत.

सध्या राज्यात असलेल्या छत्तीस जिल्हे(Maharastratil Jilhe Information) व त्यांची नावे यांची लिस्ट(List) पुढील तक्त्यात दिली आहेत.

१. सिंधुदुर्ग२. रत्नागिरी३. रायगड४. मुंबई शहर५. मुंबई उपनगर६. ठाणे
७. पालघर८. नाशिक९. धुळे१०. नंदुरबार११. जळगाव १२. अहमदनगर
१३. पुणे १४. सातारा१५.सांगली १६. सोलापूर१७. कोल्हापूर१८. औरंगाबाद
१९. जालना२०. परभणी२१. हिंगोली२२. बीड२३. नांदेड२४. उस्मानाबाद
२५. लातूर२६. बुलढाणा२७. अकोला२८. वाशिम२९. अमरावती३०. यवतमाळ
३१. वर्धा३२. नागपूर३३. भंडारा३४. गोंदिया३५. चंद्रपूर३६. गडचिरोली


• (१) मुंबई शहर व मुंबई उपनगर धरून महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत.

• (२) सन १९८० पूर्वी राज्यातील जिल्ह्यांची संख्या सव्वीस होती.

• (३) १ मे, १९८१ रोजी ‘रत्नागिरी’ व ‘औरंगाबाद’ या दोन जिल्ह्यांचे विभाजन करण्यात येऊन अनुक्रमे ‘सिंधुदुर्ग’ व ‘जालना या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.

• (४) १५ ऑगस्ट, १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ‘लातूर’ या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

• (५) २६ ऑगस्ट, १९८२ रोजी ‘चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली’ हा जिल्हा वेगळा करण्यात आला.

• (६) सन १९९० मध्ये ‘बृहन्मुंबई’ जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर’ या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.

• (७) १ जुलै, १९९८ रोजी अकोला’ व ‘धुळे’ या जिल्ह्यांचे विभाजन करण्यात येऊन अनुक्रमे ‘वाशिम’ व नंदुरबार’ या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.

• (८) १ मे, १९९९ रोजी ‘परभणी’ व ‘भंडारा’ या दोन जिल्ह्यांचे विभाजन करून अनुक्रमे ‘हिंगोली’ व ‘गोंदिया’ या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली गेली.

• (९) महाराष्ट्र आणि पस्तीस जिल्हे हे समीकरण आपल्या मनात ठसले असतानाच १ ऑगस्ट, २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन पालघर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला.

• (१०) हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. हिंगोली’ हा मराठवाड्यातील आठवा जिल्हा.

• (११) वाशिम आणि गोंदिया या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे. ‘वाशिम’ हा विदर्भातील दहावा जिल्हा ठरला आहे; तर ‘गोंदिया’ अकरावा!

• (१२) विदर्भातील नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत; तर अमरावती विभागात पाच जिल्हे आहेत.

• (१३) नंदुरबार जिल्हा आता ‘आदिवासी जिल्हा’ म्हणूनच ओळखला जात आहे. या जिल्ह्यात एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींच्या लोकसंख्येचे प्रमाण ६९.३ टक्के आहे.

• (१४) धुळे, नंदुरबार, नाशिक व पालघर या चार जिल्ह्यांच्या सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहेत.Previous articleShabd Samuh Badal Ek Shabd | One Word Substitution in Marathi
Next articleMPSC Book List : Best Books For MPSC Preparation – राज्यसेवा पुस्तके यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here