महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती व कोणते आहेत ? महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग ३ आहेत.त्यांची सविस्तर माहिती आता आपण बगणार आहोत.

महाराष्ट्राचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात.

  • सह्याद्री किंवा पश्चिम घाट; सातपुडा रांगा
  • महाराष्ट्र पठार (दख्खन पठार)
  • कोकण किनारपट्टी

महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग व त्यांचे प्रकार

कोकण किनारपट्टी

१) कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडील रेडी-बांद्यापर्यंत आहे.

२) सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजे ‘कोकण किनारपट्टी’ होय.

३) कोकण किनारपट्टीचा भारतातील विस्तार हा उत्तरेस मयूरा नदी ते दक्षिणेस कर्नाटकातील गंगावली नदीच्या खोऱ्यादरम्यान आहे.

४) कोकण ही ‘परशुरामाची भूमी’ आहे.कोकणास ‘अपरांत’ या नावे ओळखले जाते.


कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये :

  • कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरूंद झालेली आढळते. तर उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रूंदी सर्वाधिक आढळते.
  • कोकण किनारपट्टी ‘रिया’ प्रकारची आहे. कोकणच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्टपासून बनला आहे.
  • कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे ‘जांभा’ या प्रकारचा खडक आढळतो.
  • कोकण दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० कि.मी.इतकी आहे.
  • कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचे खणनकार्य तीव्र असते.
  • कोकणातील प्रमुख नद्या : उल्हास, वैतरणा, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इत्यादी.
  • कोकणातील सर्व नद्या सह्यपर्वतावरून वाहत येऊन अरबी समुद्रास मिळतात.

कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम:

उत्तर कोकण : दमणगंगा, वरोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसई (भातसा), काळू, उल्हास

मध्य कोकण : पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी (वाशिष्ठीची उपनदी), वाशिष्ठी, शास्त्री, बाव (शास्त्रीची उपनदी)

दक्षिण कोकण : काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, वाघोटन, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल

कोकणातील खाड्या : भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते; त्या नदीच्या भागास खाडी असे म्हणतात.

कोकणातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : मुंबई (उत्तरेकडे), अंजदिव, साष्टि, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा, कुरटे (दक्षिणेकडे)

सह्याद्री किंवा पश्चिम घाट

१) सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली.

२) सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्याच्यामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या असे नद्यांचे विभाजन झाले आहे.

३) महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात प. घाटाचा वाटा : १२.२% इतका आहे.

४) सह्याद्री घाटाची भारतातील लांबी : १६०० किमी असून महाराष्ट्रातील लांबी : ७५० किमी आहे.

५) सरासरी उंची : ९१५ ते १२२० मीटर इतकी आहे.

६) सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ हे नाशिक व नगर जिल्ह्यांदरम्यान आहे.

७) कळसूबाईची उंची : १६४६ मी. किंवा ५४०० फूट. आहे .कळसूबाईला ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ म्हणतात.

८) सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेल्या आहेत.

सह्याद्रीच्या तीन प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या :

१) सातमाळा अजिंठा डोंगरांगा : सातमाळा रांगा नाशिक जिल्ह्यात ,तर अजिंठा रांगा औरंगाबाद जिल्ह्यात आढळतात.या रांगामुळे उत्तरेकडे तापी व दक्षिणेकडे गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले आहे.

२) हरिश्चंद्र -बालाघाट रांगा : या रांगांमुळे गोदावरी व भीमा खोरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत. बालाघाट डोंगररांगा अहमदनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यात विस्तारल्या आहेत.

३) महादेव डोंगररांगा : या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. या रांगामळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी अलग झाली आहेत.त्र्यंबकेश्वर डोंगर, माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची भूवैशिष्ट्ये आहेत.

४) घाट : थळ, भोर, कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली इत्यादी घाट सह्याद्रीत आढळतात.

सह्याद्रीतील घाट मार्गाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : १) थळघाट (उत्तरेकडे), २) माळशेज घाट, ३) बोर (खंडाळा) घाट, ४) वरंधा घाट, ५) खंबाटकी घाट, ६) परसणी घाट, ७) आंबेनळी घाट, ८) कुंभार्ली घाट, ९) आंबा घाट, १०) फोंडा घाट, ११) हनुमंते घाट (कोल्हापूर-कुडाळ), १२) आंबोली घाट, १३) राम घाट

७) सातपुडा रांगा : राज्याच्या उत्तरेकडे नंदूरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे. पूर्व-पश्चिम विस्तार असलेल्या सातपुड्याचा फारच थोडा भाग राज्यात समाविष्ट होतो. नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे एकमेकांपासून अलग झाली आहेत.

सातपुड्याचा विस्तार : नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरास ‘तोरणमाळ पठार’ म्हणून ओळखले जाते.

अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना ‘गाविलगड टेकड्या’ असे म्हटले जाते.

सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर-ब-हाणपूर दरम्यान ब-हाणपूर खिंड आहे.

महाराष्ट्रातील सातपुडातील उंच शिखरे : १) अस्तंभा, जि. नंदूरबार (१३२५ मी.) २) बैराट, जि. अमरावती (गाविलगड टेकड्यांत, उंची : ११७७ मी.)

महाराष्ट्रातील स्थानिक डोंगररांगा :

जिल्हाडोंगरजिल्हा डोंगर
धुळे गाळणा डोंगरनांदेडमुदखेड डोंगर
भंडारा-गोंदियादरेकसा टेकड्यागडचिरोलीचिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर
परभणी-नांदेडनिर्मल रांगानागपूरगरमसूर डोंगर

महाराष्ट्र पठार (दख्खन पठार)

१) महाराष्ट्र पठारलाच ‘दख्खन पठार‘ असेही म्हणतात.

२) सह्याद्रीच्या पूर्वेस महाराष्ट्र पठार आहे.

३) महाराष्ट्राचा सुमारे ८६.७% भूभाग दख्खन पठाराने व्यापला आहे.

४) पठाराच्या उत्तरेस सातपुडा रांग पूर्व-पश्चिमेस पसरली आहे.

५) ‘गोदावरी खोरे’ हे राज्यातील सर्वात मोठे नदीखोरे आहे.

६) पठारावर गोदावरी,कृष्णा ,तापी ,भीमा,वर्धा-वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरी आढळतात.

७) नर्मदा नदी राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यात उत्तर सीमेवरून (सुमारे ५४ किमी ) पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.





Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा