मराठी व्याकरण प्रश्नसंच २ : Marathi Grammar Test 02 For Maha Bharti

1) भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली. या वाक्यातील, कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा.

1 ) साताऱ्याच्या, डोंगरात, घेतली
2) भाऊरावांनी, जमीन, घेतली
3) सातारा, विकत, माळरान
4) जमीन, भाऊराव, डोंगर

२ ) ‘रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते?

1) ती नाचत असे
2) सूर्य पूर्वेला उगवत असतो
3) सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे
4) यापैकी नाही

३ ) आज्ञार्थी क्रियापदावरुन कोणता आख्यातविकार ओळखला जातो.

1) ई-लाख्यात
2) ऊ-आख्यात
3) लाख्यात
4) वाख्यात

४ ) ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे?

1) गावा
2) आमुच्या
3) आम्ही
4) जातो

५ ) ‘पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते’ या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

1) साधित
2) शक्य
3) प्रयोजक
4) भावकर्तृक

६ ) कावळ्याचा समानअर्थी शब्द कोणता?

1) काक
2) एकाक्ष
3) कर्क
४) वरील 1 व २

७) ‘दगडापरीस वीट मऊ’ अधोरिखत शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) विरोधवाचक
2) तुलनावाचक
3) साहचर्यवाचक
4) संबंधवाचक

८ ) रामराव शेतात जात होते. वाक्याचा प्रयोग ओळखा.

1) कर्मणी
2) भावे
3)सकर्मक कर्तरी
४) अकर्मक कर्तरी

९ ) अबब! केवढी प्रचंड आग ही! हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

1) होकारार्थी
2) विधानार्थी
3) उद्गारार्थी
४) प्रश्नार्थी

१० ) ऐतिहासिक पोवाड्यांतून कोणता काव्यरस व्यक्त होतो ?

1) अद्भूत
2) भयानाक
3) रौद्र
४) वीर

११ ) ‘शावक’ हे कोणाचे पिल्लू आहे ?

1) हरण
2) कांगारु
3) वासरु
४) हत्ती

१२ ) शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.

1) वातानुकुलीन
2) वातानुकूलित
3) वातानुकूलीत
4) वातानुकुलित

१३ ) ताप थांबला का तिचा. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल.

1) प्रश्नचिन्ह
2) अर्धविराम
3) अपूर्णविराम
4) उद्गारचिन्ह

१४ ) ठीक ! आम्ही येऊ तुमच्याकडे. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार लिहा.

1) विरोधदर्शक
2) प्रशंसादर्शक
3) संबोधनदर्शक
4) संमतिदर्शक

१५) ‘व्याकरण’ म्हणजे ….

1) नियमांची जंत्री
2) भाषेला सरळ करणारे
3) भाषेच स्पष्टीकरण करणारे शास्त्र
4) वर्णविचार

१६ ) पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा – क,र,थ,म

1) क
2) थ
3) र
4) म

१७ ) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

1) वाघ
२) गुरु
3) वारा
4) यमुना

१८ ) पुढील शब्दाची अचूक जात ओळखा : ‘मी’

1) प्रथमपुरुषी सर्वनाम
२) भाववाचक नाम
3) विशेषण
4) क्रियापद

१९ ) ‘ समजण्यास कठीण ‘ या शब्द समूहासाठी एक शब्द निवड निवडा.

1) अनुपमेय
२) अनाकलनीय
3) तिठा
4) कठोर

२० ) ‘आम्ही दररोज पहाटे खेळत असू’ या वाक्यातील काळ ओळखा.

1) रीती वर्तमानकाळ
२) रीती भूतकाळ
3) अपूर्ण भूतकाळ
4) पूर्ण भूतकाळ

२१) पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते?

1) मनुष्यत्व
२) परंतु
3) समोर
4) वाहवा

२२) ‘प्रसादाला गरम दूध खूप आवडते’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) प्रसाद
२) गरम
३) गरम दूध
4) खूप

२३) ‘पडछाया’ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.

1) प्रतिबिंब
२) पडसाद
३) छाया
4) पडताळा

२४ ) योगय शब्दसमूह निवडा.

1) फुलांचा घड
२) खेळाडूंचा काफिला
३) नोटांचे बंडल
4) गुरांचा थवा

२५) ‘पडते घेणे’ या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा.

1) धारातीर्थी पडणे
२) जीव खाली पडणे
३) हातपाय गळणे
4) नमते घेणे

Similar Posts