मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example
मराठी पत्र लेखन | Letter Writing Format In Marathi Formal Letter in Marathi
या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी मराठी पत्र लेखन (Marathi Letter Writing) आणि पत्र लेखांचे नमुने बघायला मिडेल.
Contents :
- औपचारिक पत्रे
- अनौपचारिक पत्रे
- मागणीपत्र
- विनंतिपत्र
- तक्रारपत्र
- Marathi Letter Writing
पत्रलेखनाचे प्रकार
1)औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi
औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार््याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.
ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :
- मागणीपत्र
- बिनंतिपत्र
- तक्रारपत्र
औपचारिक पत्राचा नमुना | | Formal Letter Format in Marathi
___________x_____________
[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव
पत्रलेखकाचा स्वतःचा
पत्ता व नंबर.]
दिनांक: __________
प्रति,
[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी तपशील येथे लिहावी.]
विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]
संदर्भ : [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]
महोदय/महोदया,
[ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]
[___________________________________________________________________________________________________________________________________________]
आपला/आपली,
सही
______________x__________
2)अनौपचारिक पत्रे | Informal Letters In Marathi
आई, वडील, भाऊ, बहीण आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली होत नाही.
अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi
______________x__________
२३२, गांधी नगर,
मुंबई
प्रिय मित्र रमेश
सप्रेम नमस्कार,
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझाच मित्र
______________x__________