मराठी व्याकरण प्रश्नसंच १२ : Marathi Grammar Practice Test 12

 1. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

1) रुमाल
2) देह
3) ग्रंथ
4) शरीर

 1. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

1) चिपळया
2) डोहाळे
3) शहारे
4) खेडे

 1. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?

1) शीर्य
2) अनंता
3) आपण
4) माधुरी

 1. मराठी मुळाक्षरात खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते?

1) र
2) ल
3) य
4)ळ

 1. पालकांनी मुलांना मायेने वाढवावे हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?

1) संकरित
2) भावे
3) कर्मणी
4) कर्तरी

 1. ‘छे’! काय मेली कटकट? या वाक्याच्या अर्थावरुन हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

1) नकारार्थी
2) आज्ञार्थी
3) प्रश्नार्थक
4) उद्गारवाचक

 1. ‘अय्या’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे?

1) फारसी
2) हिंदी
3) अवधी
4) तमिळ

 1. ‘तो गाणे गाईल’. हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

1) वर्तमानकाळ
2) साधा भूतकाळ
3) भविष्यकाळ
4) चालू वर्तमानकाळ

 1. खालीलपैकी शुध्द वाक्य ओळखा.

1) गोष्टीची सुरुवातच मोठी चटकदार आहे.
2) गोष्टीची सुरुवातच मोठी चटकेदार आहे.
3) गोष्टीची सुरुवातच मोठि चकटदार आहे.
4) गोष्टीची सुरुवातच मोठी चटकधार आहे.

 1. ‘मातापिता या शब्दाचा समास ओळखा.

1) कर्मधारय
2) द्वंद्व
3) द्विगू
4) तत्पुरुष

 1. ‘साखरभात’ या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.

1) साखर आणि भात
2) साखरेचा भात
3) साखरमिश्रित भात
4) साखरेवेगळा भात

12, ‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य

1) मिश्र वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) साधे वाक्य
4) केवल वाक्य

 1. ‘संभाजी सिंहासारखा शूर होता.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) उपमा
2) उत्प्रेक्षा
3) भ्रांतिमान
4) अनन्वय

 1. ‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

1) अस्वस्थ वाटणे
2) समाधान वाटणे
3) पूजा करणे
4) निघून जाणे

 1. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

1) कोल्ह्याला द्राक्षे आवडत नाही.
2) कोल्ह्याला द्राक्षे आंबटच लागतात.
3) न मिळणाऱ्या गोष्टीला नाव ठेवणे.
4) कोल्हा द्राक्षे खात नाही.

 1. अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो. वाक्प्रचाराचा अर्थ वाक्य सांगा?

1) आवड नसते.
2) ज्ञान नसते.
3) गती नसते.
4) गळा नसतो.

 1. खालीलपैकी विसंगत असणारा शब्द ओळखा.

1) दिवस
2) बासर
3) वार
4) आठवडा

 1. ‘रजनी’ या शब्दाचा अर्थ काय होतो?

1) रात्र
2) मित्र
3) पत्र
4) सत्र

 1. ‘आकुंचन’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

1) आक्रसणे
2) प्रसरण
3) कपन
4) आंदोलन

 1. ‘कामाची टाळाटाळ करणारा’ या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द
  निवडा.

1) कामसू
2) कामकरी
3) कामचुकार
4) बिनकामी

 1. ‘हिरण्य’ यास समानार्थी असणारा शब्द ओळखा.

1) तांबे
2) सोने
3) चांदी
4) लोह

 1. ‘कच खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

1) फराळ करणे
2) माघार घेणे
3) विश्रांती घेणे
4) काच खाणे

 1. ‘दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?

1) पक्का निर्णय
2) सुंदर शिल्प
3) डळमळीत निर्णय
4) अर्धे वचन

 1. ‘तो बैल बांधतो’ हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे ?

1) कर्तरी प्रयोग
2) कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग
4) संकीर्ण प्रयोग

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा