मराठी व्याकरण प्रश्नसंच ६ :

१) गटात न बसणारा शब्द ओळखा.

१) वि .स .खांडेकर
२) पु.ल.देशपांडे
३) वि.दा.करवंदीकर
४) वि.वा.शिरवाडकर

२) पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते?

१) उ-ए
२) अ-आ
३) उ-ऊ
४) इ-ई

३) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला जातो? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.

१) उत्तीर्ण
२) परीक्षेत
३) झाला
४) विश्वास

४) खालील वाक्यात शब्दाची जात ओळखा. ‘परमेश्वर सर्वत्र असतो’.

१) विशेषण
२) क्रियाविशेषण
३) क्रियापद
४) सर्वनाम

५) ख,ग या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे?

1) स्वर
२) स्वरादी
३) व्यंजन
४) अनुनासिक

६) ‘निरभ्र’ म्हणजे काय ?

1) ढग भरून आलेले
२) एकही ढग नसलेले
३) एकच ढग असलेले
४) खूप ढग असलेले

७) ‘शेतकऱ्यांचा आसूड ‘ हा ग्रंथ कोणी लिहला.

1) महात्मा फुले
२) विष्णुशास्त्री चिपळूणकर
३) गणेश वासुदेव जोशी
४) डॉ.भाऊ दाजी लाड

८) ‘अरी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

1) अमृत
२) विष
३) रवी
४) सखा

९) मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही?

1) द्विवचन
२) एकवचन
३) अनेकवचन
४) बहुवचन

१०) ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ कधी असतो ?

1) १ मे
२) १५ ऑगस्ट
३) २७ फेब्रुवारी
४) १ जानेवारी

११) पुढील शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा : ‘खालचा ‘

1) संख्याविशेषण
२) सार्वनामिक विशेषण
३) अव्ययसाधित विशेषण
४) धातुसाधित विशेषण

१२) बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात,विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ?

1) सव्यय
२) अव्यय
३) विशेषण
४) नाम

१३) विचार,भावना ,अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ….होय.

१) संवाद
२) लिपी
३) हातवारे
४) भाषा

१४) ‘स्वतः’ हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?

१) आत्मवाचक
२) संबंधवाचक
३) संबधी विशेषण
४) तटस्थ

१५) ‘खल ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

१) खलबते करणारे
२) दुष्ट
३) चांगला
४) खलाशी

१६) पुढील वाक्यातील पहिला शब्द सर्वनाम आहे.त्याचा प्रकार ओळखा.’जो येईल तो पाहिलं ‘.

१) संबधी सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) आत्मवाचक सर्वनाम
४) पुरुषवाचक सर्वनाम

१७) पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते ?

१) ढीग
२) रास
३) जोडपे
४) मंडळ

१८) ‘आंगतुक ‘ या शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते?

१) न आवडणारा पाहुणा
२) सूचना न देता येणारा पाहुणा
३) परत न जाणारा पाहुणा
४) न येणारा पाहुणा

१९ ) ‘उचल खाणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

१) दडून बसणे
२) उचलणे
३) उसळून येणे
४) मनात येणे

२०) नाम ,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

१) अविकारी
२) विकारी
३) एकवचनी
४) अनेकवचनी

२१) विध्वस या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता ?

१) सौम्यता
२) सर्जन
३) भांडण
४) शांती

२२) पुढीलपैकी प्राणिवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा.

१) नर ,घोडा ,कुत्रा
२) बालक ,अपत्य ,वासरू
३) दार ,सखीजन ,कबिला
४) मादी ,लांडोर ,कालवड

२३) खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेकवचनी योजले जातात ?

१) सैन्य ,हजार
२) खेडे ,केळे
३) खडावा ,रोमांच
४) पैसा ,ढीग

२४) मराठी भाषा लेखनासाठी …………लिपीचा वापर करतात.

१) देवनागरी
२) ब्रह्मी
३) सकळा
४) सुंदरा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा