Bank Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत बंपर भरती, येथे करा अर्ज

MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण एकूण 153 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ट्रेनी ज्युनिअर क्लार्क, ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी सिनिअर क्लार्क या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा यांचा सविस्तर माहिती दिली आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (Trainee Junior Officers) , लिपिक (Trainee Clerks) आणि स्टेनो टंकलेखक (Steno Typist Marathi)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक प्रशिक्षणार्थी / Trainee Junior Officers (45 पदे): कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण.
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी / Trainee Clerks (107 पदे) : उमेदवाराकडे सर्व सेमिस्टर/वर्षांच्या एकूण किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण होणे श्रेयस्कर असेल.
  • कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी / Steno Typist (1 पद ) : कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण. उमेदवाराला मराठी लघुलेखनमध्ये 80/100 आणि लिप्यंतरणामध्ये 40 शब्द प्रती मिनिट च्या वेगाने चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. उमेदवारांची संगणक अनुप्रयोग (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेड शीट) मध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीनंतर इंग्रजी स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकणे आवश्यक आहे, ते अयशस्वी झाल्यास, त्यांचे प्रोबेशन बँकेद्वारे मंजूर केले जाणार नाही.

वयोमर्यादा :

  • लिपिक प्रशिक्षणार्थी: किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी: किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे
  • कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी: किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे

वेतन – 32,000 ते 50,000 महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023

अर्ज फी : पद 1 व 3 – 1770/- आणि पद 2 1180/-

परीक्षा IBPS कंपनी द्वारे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीचा अभ्यासक्रम व इतर तपशील साठी जाहिरात काळिजीपूर्वक वाचा .

MSC Bank जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/

आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा