नगरपालिका विषयी माहिती : Municipal Councils Information

नगरपालिका विषयी माहिती : राज्यातील ज्या स्थानिक क्षेत्राची लोकसंख्या १५,००० हून कमी नसते व ३ लाखाहून आधिक नसते, अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात येते.तसेच 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या ठिकाणी नगरपालिकाची स्थापना केली जाते.

नगरपालिकेचा रचना

• नगरपालिकेच्या सदस्यांना ‘नगरसेवक’ असे म्हणतात.

• नगरसेवकाच्या पात्रतेसाठी आवश्यक वयोमर्यादा २१ वर्ष लागते.

• १९६५ च्या नगरपालिका कायद्यानुसार महाराष्ट्रातील नगरपलिकांचे कार्य चालते.

• नगरसेवकांचा कार्यकाल ५ वर्षे असून ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून येतात. दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात.

• १९९२ च्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार तीन प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना करण्यात आली.त्या खालीलप्रमाणे आहेत.

• नगरपालिकांचे वर्गीकरण : लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे अ, ब, क वर्गामध्ये करण्यात येते.

नगरपालिकांचा वर्ग लोकसंख्या
‘अ’ वर्ग १ लाखाहून अधिक
‘ब’ वर्ग ४०,००० ते १ लाख
‘क’ वर्ग ४०,००० हून कमी

• नगरपालिकेत किमान १७ ते कमाल ६५ सदस्य असतात.

नगरपालिकेतील आरक्षण

• नगरपालिकेत महिलांसाठी ५०% जागा ह्या राखीव असतात. तशेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी लोकांसाठी २७% जागा ह्या राखीव असतात.व अनुसूचित जातीजमातींना एकूण लोकसंख्येशी त्यांच्या असलेल्या प्रमाणात काही जागा राखीव ठेवल्या जातात.

नगराध्यक्ष


• नगराध्यक्ष हा शहराचा ‘पहिला नागरिक’ असतो. नगरपालिकेच्या प्रमुखास (अध्यक्षास) ‘नगराध्यक्ष’ असे म्हणतात.

• नगराध्यक्षांचा कार्यकाल हा वर्षाचा असतो.तसेच उपनगराध्यक्षांचा कार्यकाल हा अडीच वर्षाचा असतो. नगरपालिकांची निवडणूक दर ५ वर्षांनी होत.

• नगरसेवक किंवा उपनगराध्यक्ष यांना राजीनामा द्यायचा असेल,तर ते आपला राजीनामा नगराध्यक्षांकडे देतात.

• नगराध्यक्ष यांना आपला राजीनामा द्यायचा असल्यास ते राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देतात.

• नगराध्यक्षावर आणला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला किंवा मान्य नाही केल्यास दूसरा अविश्वास ठराव त्यांच्यावर दाखवायला किमान एका वर्षाचा कालावधी लागतो.

• नगराध्यक्षांची निवड हि मे २०१६ पूर्वी नगरसेवकांकडून अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जात असे. पण त्यानंतर १० मे २०१६ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून म्हणजेच प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जनतेकडून केली जात आहे.

नगराध्यक्षांची कार्ये


१) नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो. नगरपालिकेच्या सभा बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.

२) नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण करणे.

३) नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष हे त्यांचे काम पाहतात. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत नगरपालिकांच्या सभांचे अध्यक्षपद उपनगराध्यक्ष भूषवितात.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा