पंचायतराज वरील एका वाक्यातील सराव प्रश्न

१) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेस …. असे संबोधले जाते.

पंचायतराज

२) महाराष्ट्र ग्रामपचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?

१९५८

३) वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा संमत करण्यात आला …

८ सप्टेंबर ,१९६१

४) महाराष्ट्रात सध्या …. ग्रामपंचायती कार्यरत आहेत.

२७,८९६

५) ग्रामपंचायत सदस्याना …. असे संबोधले जाते.

पंच

६) ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो?

सरपंच

७) ….. पासून महाराष्ट्रात पंचायतराज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली.

१ मे, १९६३

८) राज्यात सध्या ३६ जिल्हे असून जिल्हा परिषदांची संख्या …. इतकी आहे.

३४
९) राज्यात सध्या ३५५ (+) तालुके असून पंचायत समित्यांची संख्या …. इतकी आहे.

३५१

१०) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१८-१९ अनुसार राज्यात २७ महानगरपालिका आहेत; याच पाहणीनुसार राज्यातील नगर
पंचायतींची संख्या किती आहे?

१२६

११) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल…… असतो.

५ वर्ष

१२) ……मध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो.

ग्रामसभा

१३) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान …..बैठका होणे बंधनकारक आहे.

चार

१४)..…. यांचे ग्रामसेवकांवर नजीकचे नियंत्रण असते.

गटविकास अधिकारी

१५) त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीतील सर्वांत कनिष्ठ स्तरावर कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ….

ग्रामपंचायत

१६) संबंधित खेड्यातील अनुसूचित जाति-जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाति-जमातींच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ कलम १० (२) (अ) अनुसार …. यांना आहेत.

राज्य निर्वाचन आयोग

१७)……ही संस्था त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीतील व्यावहारिकदृष्ट्या मधल्या स्तरावर कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था होय.

पंचायत समिती

१८) त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती?

जिल्हा परिषद

१९) ग्रामस्तरावरील ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोणाचा निर्देश करता येईल?

ग्रामसेवक

२०) …..यांना शासनाने ग्रामस्तरावरील ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केले आहे.

ग्रामसेवक

२१) ….. ना ‘लोकशाहीचा पाळणा’ असे म्हटले जाते.

स्थानिक स्वराज्य संस्था

२२) …. या संघराज्य प्रदेशात द्विस्तरीय पंचायतराज पद्धती अस्तित्वात आहे.

दादरा आणि नगर-हवेली

२३) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका आदी) स्त्रीप्रतिनिधींसाठी..…. जागा राखीव असतात.

एक-द्वितीयांश

२४) ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

सरपंचाकडे

२५) जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा …… असतो.

५ वर्ष

२६) गटविकास अधिकाऱ्याची निवड कोणामार्फत होते?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

२७) ….हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

गटविकास अधिकारी

२८) गटविकास अधिकारी हा ……चा वर्ग १ वा वर्ग २ मधील राजपत्रित अधिकारी असतो.

राज्य शासन

२९)….मध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो.

ग्रामसभा

३०) …..समितीचा सभापती निवडून आलेल्या महिला परिषद सदस्यांपैकी असतो.

महिला व बालकल्याण

३१ ) राज्यात सध्या एकूण ……महानगरपालिका आहेत.

२७

३२) जिल्हा परिषदेच्या दोन बैठकांमध्ये ….पेक्षा अधिक कालावधी असत नाही .

तीन महिने

३३) …हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.

जिल्हाचे पालकमंत्री

३४) जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल केव्हापासून गणला जातो?

जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा