पंडित जवाहरलाल नेहरू – Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi : पंडित नेहरू हे भारताच्या इतिहासातील महत्वाचे व्यक्ती आहे, ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते, या लेखात आपण जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

  • जन्म : १४ नोव्हेंबर १८८९
  • मृत्यू : २७ मे १९६४
  • पूर्ण नाव : जवाहरलाल मोतीलाल नेहरू
  • वडील : मोतीलाल
  • आई : स्वरूपराणी
  • जन्मस्थान : अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
  • शिक्षण : इ. स. १९१० मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनटी कॉलेजातून पदवी संपादन केली.
  • इ.स.१९१२ ‘इनर टेंपल’ या लंडनमधील कॉलेजातून बॅरिस्टरची पदवी संपादन केली.
  • विवाह: कमला सोबत (इ. स. १९१६)
  • ओळख : आधुनिक भारताचे शिल्पकार

पंडित जवाहरलाल नेहरु वयक्तिक माहिती : Jawaharlal Nehru Personal Information in Marathi

पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी मोतीलाल नेहरु यांच्या घरी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे घराला “आनंद भवन नाव देण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस “राष्ट्रीय बाल दिन’ म्हणुन साजरा केला जातो.

१९१६ मध्ये पंडीत नेहरूंचे लग्न “कमला ” यांच्याशी झाले व १९१७ मध्ये त्यांना “इंदिरा प्रियदर्शनी यांच्या रुपाने कन्यारत्न प्राप्त झाले.

पंडीतजीने केंब्रिज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

पहील्यांदाच १९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले व संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.

1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता.

1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले.

फेब्रुवारी-मार्च 1936 मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै 1938 मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.

१९३६ च्या फेजपूर येथील ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१९३५ मध्ये अलमेडा येथील तुरंगात असताना “अॅन ऑटोबायोग्राफी’ हे स्वतःचे आत्मचरित्र लिहीले.

१९४० मध्ये सुरु झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे २ रे वैयक्तिक सत्याग्रही होते.

१९४२ मध्ये अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” किंवा “भारत की खोज” हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला

०२ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे पहिले पंतप्रधान व पहिले परराष्ट्रमंत्री होते.

जवाहरलाल नेहरु हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरु यांना “स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार” असेही म्हटले जाते.

१९५० मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडीतजी होते. देशासाठी “पंचवार्षीक योजना” ही मुळ संकल्पना पंडीत जवाहरलाल नेहरू यांचीच होती. पंडीतजीनी १९५१ सालापासुन देशामध्ये पंचवार्षिक योजना सुरु केल्या.

१९५१ मध्ये पंडीतजींनी पहिल्या आशियाई क्रिडा स्पर्धा “दिल्ली येथे भरविल्या.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी १९५५ च्या बांग परीषदेमध्ये “अलिप्त राष्ट्र संघटना’ ही महत्वपूर्ण संकल्पना मांडली. नेहरुणीच्या प्रयनाने १९६१ मध्ये “अलिप्त राष्ट्र संघटना” (NAM) ही संस्था अस्तित्वात आली.

“शांतीदूत” “आधुनिक भारताचे शिल्पकार” “आंतरराष्ट्रवादाचे जनक’ असे संबोधले जाते.

पंडीतींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये “नॅशनल हेरॉल्ड” हे वृत्तपत्र सुरु केले होते.

१९५४ मध्ये भारत व चीन दरम्यान “पंचशील करार” घटक आणला.

जवाहरलाल नेहरू कार्य : Nehru Works Information in Marathi

इ. स. १९१२ मध्ये इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या वडिलांचे ज्युनिअर म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.

इ. स. १९१६ मध्ये राजकारणात कार्य करण्याच्या उद्देशानेच पंडित नेहरूंनी गांधीजींची भेट घेतली. देशाच्या राजकारणात, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती.

इ. स. १९१६ मध्ये त्यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्या होमरूल लीगमध्ये प्रवेश केला.

इ.स.१९१८ मध्ये ते या संघटनेचे सेक्रेटरी बनले. त्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यातही ते सहभागी झाले.

इ. स.१९२० मध्ये महात्मा गांधीनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत नेहरू सहभागी झाले. त्याबद्दल त्याना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली.

इ.स. १९२२-२३ मध्ये जवाहरलाल नेहरू इलाहाबाद नगर पालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

इ. स. १९२७ मध्ये नेहरूनी सोव्हिएत युनियनला भेट दिली. समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले. समाजवादी विचारांकडे आकृष्ट झाले.

इ.स. १९२९ मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती. याच अधिवेशनात काँग्रेसने प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. या अधिवेशनात भारताला पूर्णपणे स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ‘संपूर्ण स्वातंत्र्याचा’ ठराव पास करण्यात आला.

हा निर्णय सर्व भारतीयांपर्यंत पोचविण्यासाठी २६ जानेवारी १९३० हा दिवस राष्ट्रीय सभेने निश्चित केला. गावोगावी प्रचंड सभा झाल्या. जनतेने स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रतिज्ञा म्हणून २६ जानेवारी हा दिवस महत्त्वाचा आहे.

इ. स. १९३७ मध्ये काँग्रेसने प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये भरघोस यश संपादन केले. या वेळी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने नेहरूंनी वाहिली.

इ. स. १९४२ च्या ‘चले जाव चळवळीला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. काँग्रेसने ही चळवळ सुरू करावी म्हणून गांधीजींचे मन वळविण्यात पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर लगेचच सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. तेथेच त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला.

इ. स.१९४६ मध्ये स्थापन झालेल्या भारताच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून नेहरूंची निवड झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या पदावर राहिले.

इ. स.१९५० मध्ये पंडित नेहरूंनी नियोजन आयोगाची स्थापना केली.

पंचशील तत्त्वे

भारताच्या परराष्ट्र धोरणाची आधारतत्त्वे म्हणून जवाहरलाल नेहरूंनी पंचशील तत्त्वांना प्राधान्य दिले होते. ही पंचशील तत्वे १९५४ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चौ-एन-लाय यांच्यात झालेल्या चर्चेत निश्चित करण्यात आली होती. या पंचशील तत्त्वात पुढील पाच तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे.

१. राष्ट्रांनी परस्परांच्या प्रादेशिक सलगतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करावा.

२. राष्ट्रांनी परस्परांच्या प्रदेशावर अतिक्रमण करू नये.

३.राष्ट्रांनी एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये.

४.राष्ट्रांनी परस्परांशी समतेची व सहकार्याची वागणूक ठेवावी.

५.राष्ट्रांनी शांततामय सहजीवनाचे व आर्थिक सहकार्याचे धोरण स्वीकारावे.

ग्रंथसंपदा

  • आत्मचरित्र (१९३६) (Autobiography)
  • जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन (१९३९) (Glimpses of World History)
  • भारताचा शोध (१९४६) (The Discovery of India) garri.

पुरस्कार

इ.स. १९५५ साली भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पंडित नेहर देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेषता

आधुनिक भारताचे शिल्पकार.

पंडित नेहरूंचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन ‘बालक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जवाहरलाल नेहरू मृत्यू

२७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले.