पंडिता रमाबाई : Pandita Ramabai Information in Marathi

पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) यांचा जन्म २३ एप्रिल १८५८, गंगामुळ (जि, मंगळूर, कर्नाटक) नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला.त्यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे असे होते.तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई डोंगरे होते. Pandita Ramabai Information in Marathi.

• त्यांचे वडील पुरोगामी विचारांचे होते ,स्त्रियांना शिक्षण द्यावे असे मत पंडिता रमाबाई यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे यांचे होते.म्हणून त्यांनी रमाबाई यांना वेदादींचे शिक्षण दिले होते.दुष्काळ पडल्यामुळे रमाबाई व त्यांच्या घरच्यांना गाव सोडावे लागले.या भ्रमंती दरम्यान अनंतशास्त्रींनी रमाबाईंना संस्कृतचे शिक्षण दिले.

• १८७४ मध्ये या भारत भ्रमंतीदरम्यानच पंडित रमाबाई यांचे वडील अनंतशास्त्री व आई लक्ष्मीबाई या दोघांचे निधन झाले.आईवडिलांच्या मृत्यूनतर बंधू श्रीनिवास यास सोबत घेऊन रमाबाईंनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण केले. संस्कृतवर रमाबाईंचे प्रभुत्व होतेच, परंतु या काळात त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या सारख्या भाषांवरही प्रभुत्व मिळवले.

• कोलकाता मुक्कामी आपल्या पांडित्याने त्यांनी विद्वानांना प्रभावित केले.कलकत्ता विश्वविद्यालयातील पंडितांनी मोठ्या सन्मानाने युनिव्हर्सिटीत आमंत्रित करून रमाबाईंना पंडिता सरस्वती असे बिरुद अर्पण केले.कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

• १८८० मध्ये पंडित रमाबाई यांचा भाऊ श्रीनिवासच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी त्यांचे मित्र पेशाने वकील असलेल्या ब्राह्मोसमाजी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी नोंदणीपद्धतीने विवाह केला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढींविरूद्ध बंड पुकारले होते. 

• मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही लग्नानंतर एकोणीस महिन्यांनी म्हणजे ४ फेब्रुवारी १८८२ मध्ये मेधावींचेही निधन झाले.याना एक मुलगी झाली होती तीच नाव मनोरमा असे होते. मेधावी यांच्या मृत्यूनंतर पंडित रमाबाई मुलीला घेऊन पुण्याला स्थायिक झाल्या.

• पुढे त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेण्याचा निर्णय घेतला व बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ ची स्थापना केली. 

• देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत होते.१८८२ साली हंटर कमिशनपुढे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.

• मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्या इंग्लंड व अमेरिकेत गेल्या. २९ सप्टेंबर १८८३ रोजी इंग्लंडमधील बॉटिज चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
त्यानंतर स्त्री-शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी हयातभर काम केले.बंगाली स्त्रियांनी त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ असे मानपत्र दिले.

पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था :


१) आर्य महिला समाज, पुणे (१८८२) : या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती केली.या संस्थेच्या शाखा अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, ठाणे, मुंबई येथे स्थापन.

२) रमाबाई असोसिएशन : १८८७ साली अमेरिकेतील बोस्टन शहरात रमाबाईंनी ही संस्था स्थापन केली.

३) शारदा सदन (शारदाश्रम), मुंबई : १८८९. या संस्थेमार्फत निराश्रित विधवा, अनाथ स्त्रियांच्या निवासभोजनाची व्यवस्था. १८९० मध्ये शारदा सनदचे पुणे येथे स्थलांतर व काही काळाने केडगाव येथे स्थलांतर. पुण्यात ही संस्था नावारूपास आली.शारदा सदनचे सल्लागार : न्या. रानडे, न्या. के. टी. तेलंग, डॉ. भांडारकर.

४) मुक्ती सदन, केडगाव : १८९६. या संस्थेमार्फत अनाथ, विधवा स्त्रियांचे शिक्षण, निवास-भोजनाची व्यवस्था.पतित स्त्रियांसाठी ‘कृपा सदन’, अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा ‘बातमी सदन’, अनाथ मुलांसाठी ‘सदानंद सदन’, प्रीति सदन, शांती सदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या अन्य संस्था आहेत.
अमेरिकेत त्यांनी बालोद्यान शिक्षण पद्धती शिकून घेतली. व्हॉईसरॉय लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी लेडी डफरीन यांच्या नावे फंड सुरू करून स्त्रियांसाठी वैद्यकीय सोयी
उपलब्ध करून दिल्या.

तुम्ही बघितली आहे पPandita Ramabai Information in Marathi.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा