पशुसंवर्धन विभाग भरती 2023 , विविध 446 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे

AHD Recruitment : पशुसंवर्धन विभाग भरती 2023, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे मार्फत एकूण विविध 446 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, या भरती अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर हे पदे भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023

भरण्यात येणारी पदे व एकूण जागा खालीलप्रमाणे

पदाचे नावएकूण जागा
पशुधन पर्यवेक्षक376
वरिष्ठ लिपीक44
लघुलेखक (उच्चश्रेणी)02
लघुलेखक (निम्नश्रेणी)13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
तारतंत्री03
यांत्रिकी02
बाष्पक परिचर02
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षकपशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
(i) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा (इयत्ता 10 वी) (एस.एस.सी) उत्तीर्ण झालेला असादा आणि

(ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, 

किंवा

महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, 

किंवा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, 

किंवा

महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही.एस.सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी
वरिष्ठ लिपीककोणत्याही शाखेतील पदवीधर
लघुलेखक (उच्चश्रेणी)SSC/समतुल्य परीक्षा आणिशॉर्ट हँड स्पीड 120 डब्ल्यूपीएम आवश्यक आणिइंग्रजी टायपिंग -40 डब्ल्यूपीएम किंवा मराठी – 30 डब्ल्यूपीएम
लघुलेखक (निम्नश्रेणी)SSC/समतुल्य परीक्षा आणिशॉर्ट हँड स्पीड 100 डब्ल्यूपीएम आवश्यक आहे आणिइंग्रजी टायपिंग – 40 डब्ल्यूपीएम किंवा मराठी – 30 डब्ल्यूपीएम
प्रयोगशाळा तंत्रज्ञप्रयोगशाळेतील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc.in किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजीसह बॅचलर ऑफ सायन्स आणि प्रयोगशाळेतील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्रमहाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल कायद्यानुसार वैध नोंदणी
तारतंत्रीसंबंधित विषयात ITI
यांत्रिकीअधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर अपडेट केल्या जाईल
बाष्पक परिचरअधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर अपडेट केल्या जाईल
वरील पात्रता २०१७ जाहिराती प्रमाणे आहे, अधिकृत जाहिरात आल्यानंतर माहिती उपडेट केली जाईल.

वयोमर्यादा : १८ ते ४० (मागास्वर्गीय सूट )

अर्ज सुरु होण्याची तारीख : २७ मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जून २०२३

अधिकृत संकेतस्तळ : https://ahd.maharashtra.gov.in/

पशुसंवर्धन जाहिरात येथे बघा : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

1 thought on “पशुसंवर्धन विभाग भरती 2023 , विविध 446 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा