Perfect Continuous Tense – पूर्ण चालू काळ

◆ Perfect Continuous Tense – पूर्ण चालू काळ

● present perfect Continuous Tense – पूर्ण चालू वर्तमानकाळ

Present Perfect Continuous Tense
पूर्ण चालू वर्तमानकाळ
– उपयोग :- भूतकाळात (खूप आधीपासून) सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे किंवा नुकतीच
संपली आहे असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

– ओळख : वाक्याच्या शेवटी साधारपणे त आलेला आहे ( जसे,तो सकाळपासून अभ्यास करत आलेला आहे). पण ‘त आलेला आहे’ शेवटी असलेले वाक्य बोलायला थोडे कठीण होते. म्हणून बऱ्याचदा आपण मराठीत हाच अर्थ व्यक्त करण्यासाठी ‘त आलेला आहे’ ऐवजी फक्त -त आहे किंवा -तोय वापरतो.

– रचना :- कर्ता + have / has • been + क्रियापदाला ing….
have आणि has चा फरक तुमच्या लक्षात असेलच. परत एकदा पहा. एकवचनी कर्त्यासोबत has, पण I व you सोबत have, आणि अनेकवचनी कर्त्यासोबत have.
आता खालील वाक्यांचा अभ्यास करून हीच वाक्ये परत स्वत: करा.

१) मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय,तो अद्याप आलेला नाही. I have been waiting for him since
morning, he hasn’t come yet.
२) मी तुझी सकाळपासून वाट पाहतोय,तुला इतका उशीर का झाला? I have been waiting for you since morning, why are you so late?
३) तो अलीकडे खूप अभ्यास करतोय. He has been studying hard recently.
४) तो अलीकडे कामाला उशिरा येतोय. He has been coming to work
late recently
५) मुलं ७ वाजेपासून खेळत आलेली आहेत. Boys have been playing since 7
o’clock. .
६) कोणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे/चोरतोय Someone has been stealing my money.
७) कुठे आहेस तू? मी तुला आठवडाभर शोधतोय. Where are you? I have been looking for you all week.
८) तुमचा मुलगा गेल्या दोन महिन्यापासून शाळा चुकवतोय. Your son has been cutting school for the last two months.
९) त्याला अलीकडे खूप विचित्र स्वप्न पडताहेत.
He has been having very strange dreams recently.
१०) अलीकडे तो रोज पंधरा तास काम करतोय. He has been working 15 hours
a day recently.
११) मी दिवसभर चालत आहे. पाय दुखत आहेत माझे. I have been walking all day. My feet are hurting
१२) मी गेली १५ वर्षे इंग्रजी शिकवतोय. I have been teaching English for
the last fifteen years. १३) तासाभरापासून ती बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करतेय. She has been trying to put thebbaby to sleep for an hour.
१४) मी कितीतरी तासांपासून रांगेत उभा आहे. I have been standing in the queue for hours.

● पूर्ण चालू वर्तमानकाळ किंवा पूर्ण वर्तमानकाळ यापैकी कोणताही काळ वापरून भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे असा अर्थ व्यक्त केला जाऊ शकतो.
जसे, I have taught English for 15 years = I have been teaching English
for 15 years = मी पंधरा वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहे.

– पण अशा दोन्ही प्रकारे सारखा अर्थ व्यक्त करणे काही क्रियापदांसोबतच शक्य आहे.
• अशी काही क्रियापदे :- live, work, teach, learn, expect, rain, snow, sit,
Stand, wait, stay, want, study.
• आणखी उदाहरणे :- It has rained continuously since morning = It
has been raining…. = सकाळपासून एकसारखा पाऊस पडत आहे.
लक्ष द्या :- पूर्ण वर्तमानकाळाद्वारे अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी वाक्यात for ten
years, since morning, वगैरे सारखे शब्द वापरणे आवश्यक आहे. मात्र पूर्ण चालू
वर्तमानकाळाद्वारे ही क्रिया अशा शब्दांशिवाय सुद्धा व्यक्त करता येते.

● Past Perfect Continuous Tense – पूर्ण चालू भूतकाळ

Past Perfect Continuous Tense
पूर्ण चालू भूतकाळ : एखादी क्रिया भूतकाळातील ठरावीक वेळेच्या (खूप) आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरूच होती किंवा त्या वेळेपर्यंत सुरू होती असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात.
ओळख :- साधारणपणे वाक्याच्या शेवटी -त आलेला होता. पण परिस्थितीनुसार वरील अर्थ उघडच असल्यास वाक्याच्या शेवटी फक्त ‘-त होता’ सुद्धा असणे शक्य आहे.

रचना :- कर्ता + had been + क्रियापदाला ing +….
उदाहरणे :१) तो तिथे दहा वर्षांपासून राहत आलेला होता.
He had been living there for 10 years.
२) मी संध्याकाळी मोकळा होतो, पण मी दिवसभर काम करत होतो.
I was free in the evening, but I had been working all day. ३) बर्फ दिवसभर एकसारखा पडत आलेला होता.
The snow had been falling continuously all day.
४) खूप काळापासून मला असलं पुस्तक हवं होतं.
I had been wanting such a book for a long time.

● Future Perfect Continuous Tense – पूर्ण चालू भविष्यकाळ

Future Perfect Continuous Tense
पूर्ण चालू भविष्यकाळ
उपयोग:- एखादी क्रिया भविष्यकाळातील ठरावीक वेळेच्या (खूप) आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा त्या वेळेवर संपलेली असेल असे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात.
ओळख :- साधारणपणे वाक्याच्या शेवटी – त आलेला असेल.
● रचना :- कर्ता + will have been + क्रियापदाला ing +….

● उदाहरणे :१) या वर्षाच्या शेवटी तो पंधरा वर्षांपासून इंग्रजी शिकवत आलेला असेल (म्हणजे त्याला इंग्रजी शिकवायला सुरुवात करून १५ वर्षे होतील).
He will have been teaching English for 15 years by the end of
this year. .
२) येत्या ऑक्टोबरमध्ये मी हे पुस्तक दहा वर्षांपासून लिहित आलेलो असेन (म्हणजे हे पुस्तक लिहायला सुरुवात करून मला दहा वर्षे होतील).
Come October, I will have been writing this book for 10 years.
३) या महिन्याच्या शेवटी, आम्ही इथे पाच वर्षांपासून राहत आलेलो असणार (म्हणजे आम्हाला इथे राहून पाच वर्षे होतील).
By the end of this month, we wilल have been living here for five
years.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा