PCMC Bharti 2023 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १६ हजार ८३८ पदांसाठी मेगाभरती, जाहिरात बघा

PCMC Bharti : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठी मेगा भरती केली जाणार. पिंपरी चिंचवड शहराचा होणारा विस्तार आणि त्यामुळे वाढलेला कामाचा ताण लक्षात घेत महापालिके ने नियोजित होण्याऱ्या संख्येत वाढ केली आहे . सुरुवातीला महापालिकेच्या होण्याऱ्या भरतीला एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. मात्र, नवीन सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता ५ हजार ३२५ पदे वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जुना भरण्यात येणाऱ्या जागा आणि सुधारीत असे मिळन एकूण १६ हजार ८३८ पदांची निमिर्ती करण्यात आली आहे. या भरतीला शासनाने मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेकडून मेगा नोकर भरती केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती २०२३

PCMC मध्ये येणाऱ्या मे महिन्यात एकूण पूर्वी मंजूर व नवीन अश्या एकूण १६ हजार ८३८ पदे भरले जाणार असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

कोणती पदे भरली जाणार

  • कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक etc..

अधिक माहिती साठी https://www.pcmcindia.gov.in/index.php ला भेट द्या..

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा