Number – वचन । Gender लिंग English Grammar in Marathi

Learn Number – वचन and लिंग Gender vachan in English Grammar in your Marathi language.

वचन in English

१) इंग्रजीमधे अनेकवचन करताना साधारणपणे एकवचनी नामाला s लावतात.
उदा. pen-pens, book-books,table-tables, chair-chairs.

२) एकवचनी नामाच्या शेवटी -s / -sh / -ch / -x असल्यास अनेकवचन करताना -es लावतात.
उदा. box-boxes, watch-watches, bus-buses, brush-brushes.

३)’0′ शेवटी असलेल्या बऱ्याच नामांचे अनेकवचन सुद्धा -es लावून करतात.
उदा. tomato-tomatoes, mango-mangoes, potato-potatoes.

४) एकवचनी नामाच्या शेवटी -y असल्यास त्याचे अनेकवचन करताना -y चे -ies केले जाते.
उदा. baby-babies, city-cities, story-stories.
परंतु शेवटच्या -y पूर्वी स्वर (a,e,i,o,u) असल्यास अनेकवचन करताना फक्त 5 लावावे.
जसे, boy-boys, day-days, donkey-donkeys, guy-guys.

५) एकवचनी नामाच्या शेवटी -f किंवा fe असल्यास त्याचे अनेकवचन करताना f/fe काढून -ves लावतात.
जसे, thief-thieves, leaf-leaves, wolf-wolves, life-lives, knife-knives
काही अपवाद:- chief, roof, proof, safe, gulf, belief यांचे अनेकवचन करताना फक्त -s लावावे.

६) संयुक्त नामांचे अनेकवचन करताना त्यातील प्रमुख भागाचे अनेकवचन करतात.
उदा. son-in-law+ sons-in-law, step-son + step-sons.

७) खालील काही शब्दांचे अनेकवचन पहा:
child- children
woman – women
foot – feet
tooth – teeth
goose – geese

८) खालील शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे: deer – deer , sheep – sheep aircraft – aircraft, swine- swine series – series

९) dozen, hundred, thousand, million (=दशलक्ष), billion (=अब्ज),
score(= वीस, वीसचा संच) या शब्दांचे अनेकवचन करता येते. परंतु हे शब्द संख्येसोबत वापरल्यास यांचे अनेकवचन केले जात नाही. म्हणजे आपण hundreds of people (शेकडो लोक) म्हणू शकतो. पण ‘सहा शे लोक’ म्हणताना आपण six hundred people असे म्हणतो, six hundreds नाही.

१०) अक्षरांचे आणि संख्यांचे अनेकवचन करताना ‘s लावतात. जसे,
There are 3 b’s in the word ‘babble’. Add four Z’s and three 8’s.
११) संख्यावाचक नसलेली (म्हणजे uncountable) नामे item, piece वगैरे
सारख्या नामांसोबत वापरून संख्यावाचक (countable) नामाप्रमाणे वापरली
जाऊ शकतात.

उदा. a piece / a bit of advice = एक सल्ला.
a few bits of advice = काही सल्ले.
an interesting item of news = एक मनोरंजक बातमी.
many interesting items of news =
अनेक मनोरंजक बातम्या.

लिंग Gender – English Grammar in Marathi

इंग्रजीमधे लिंगाच्या दृष्टीने नामाचे चार गट पडतात :
१) Masculine gender (पुरुषलिंग)
उदा. man, brother, uncle, son, king, father, lion इ.

२) Feminine gender (स्त्रीलिंग)
उदा. woman, sister, aunt, daughter, queen, mother, lioness इ.

३) Neuter gender (नपुंसकलिंग/तृतीय लिंग)
उदा. table, chair, tree, crowd, family इत्यादी.
(या गटात प्रामुख्याने निर्जीव वस्तूंची नावे व समूहवाचक नामे येतात.)
समूहवाचक नामासोबत क्रियापदाचे एकवचनी किंवा अनेकवचनी कोणतेही रूप वापरले जाऊ शकते. म्हणजे our team has won आणि Our team have won यापैकी कुठल्याही प्रकारे आपण बोलू शकतो.

४) common gender (उभयलिंग )
स्त्री व पुरुष दोघांसाठी वापरले जाऊ शकणारे शब्द या गटात येतात.
teacher शिक्षक, शिक्षिका
student विद्यार्थी विद्यार्थिनी
pupil विद्यार्थी/विद्यार्थिनी
teenager १३ ते १९ वयोगटातील व्यक्ति

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा