पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये : Police Patil Information in Marathi

पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये (Police Patil Information in Marathi) : पोलीस पाटील हे पद प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे . त्या काळी हे पद गावातील शूर व कर्तृत्वान व्यक्तीकडे दिल्या जाई . शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच मोगलांच्या काळापासून पोलीस पाटील हे पद आस्तित्वात आले . भारतात प्राचीन काळापासून गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्राम प्रमुख असायचा.ब्रिटिश काळात कायदा सुव्यवस्था आणि महसूल वसुलीची जबाबदारी या पदाकडे देण्यात आली. तसेच ब्रिटिश काळात पोलीस पाटील पद वंश परंपरागत दिले जात असे. मात्र आता शासनाने १९४६ पासून हि वंश परंपरागत पोलीस पाटील नेमण्याची पद्धत बंद केली.

पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये : Police Patil Information in Marathi

● मुंबई नागरी कायदा (बॉम्बे सिव्हील अॅक्ट), १८५७ नुसार राज्यात पोलिस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र मुलकी पोलिस अधिनियम, १९६२ अन्वये १ जानेवारी १९६२ पासून राज्यातील वंशपरंपरागत मुलकी पद रद्द झाले.

● महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम, १९६७ नुसार पोलिस पाटलाची नियुक्ती केली जाते. राज्य सरकार, जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती करते.

वयोमर्यादा : पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ व कमाल ४५ वर्षे असावे लागते.

वेतन : पोलिस पाटलांचे वेतन दरमहा रु. ३,००० (तीन हजार रुपये)

निवडणूक प्रक्रिया/ पात्रता : पोलिस पाटील या पदासाठी नियुक्ती होण्याकरता त्या उमेदवाराने किमान १० वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी लागते . गावातील उमेदवारास पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती होण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. तसेच नियुक्ती करत असताना ती सुरवातीला ५ वर्ष इतकीच केली जाते. तसेच त्या व्यक्तीचे गावात घर व जमीन असणे आवश्यक असते.

● पूर्वी पोलिस पाटलाची नेमणूक प्रत्येकवेळी ५ वर्षांच्या पटीत वाढविण्याची तरतूद होती. आता ही नेमणूक १० च्या पटीत वाढविली जाते. पोलिस पाटलास वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदावर राहता येत नाही.

● शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलिस पाटीलपदी नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारास आहेत.

शासनाच्या नव्या धोरणानुसार पोलीस पाटील पदासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांची मुलाखत दयावी लागते.

● परीक्षेत जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास पोलीस पाटील पदी नियुक्त केल्या जाते.

पोलिस पाटलास त्यांच्या पदाव्यतिरिक्त पूर्ण वेळेची कायमस्वरूपी दुसरी कोणतीही नोकरी करता येत नाही. पोलिस पाटलास शेती वा इतर व्यवसाय करता येतो, मात्र असा व्यवसाय त्याच्या पदाच्या कर्तव्यांच्या आड येता कामा नये.

पोलिस पाटील हा पूर्णवेळचा शासकीय नोकर नसल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये एखादे पद वा सदस्यत्व धारण करता येऊ शकते. पोलिस पाटलास रजा देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदारास आहेत.

● राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवकांना मिळणाऱ्या सवलती पोलिस पाटलास मिळत नाहीत. मात्र अटींची पूर्तता केल्यास त्याच्या मुलांना मोफत शिक्षण मिळू शकते. पोलिस पाटलास गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकान्यास असतात.

पोलीस पाटील कार्य : गैरवर्तणुकीबाबत पोलिस पाटलास एक वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्फ केले जाऊ शकते . गावपातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त राखणे, गुन्ह्यांची खबर पोलिस ठाण्यास देणे, गुन्ह्यास आळा घालणे, विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे आदी कर्तव्यांशी पोलिस पाटील संबंधित आहे.

गावात नैसर्गिक आपत्ती व संसर्गजन्य रोगाची साथ पसरल्यास त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना पोलिस पाटील देतो.

• गावपातळीवर अंमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकान्यास पोलिस पाटील खबर देतो.

• गावात अनैसर्गिक वा संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी वा संबंधित पोलिस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी पोलिस पाटलावर असते.

• गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलिस पाटलास कोतवाल हा कनिष्ठं ग्रामनोकर मदत करतो.

● गावपातळीवर कोतवाल आदी कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी पोलिस पाटलावर असते.

• पोलिस पाटलाची नेमणूक करताना मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य देण्यात येते. पोलिस पाटलाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा पोलिस पाटील त्याचे काम पाहतो.

● सण ,उत्सव ,यात्रा व निवडणूक यांच्या घडामोडीवर ठेवणे.

1 thought on “पोलीस पाटील माहिती मराठीमध्ये : Police Patil Information in Marathi”

  1. आमच्या जावळी ग्राम पंचायत पेन गावा मध्ये पोलीस पाटलाची जागा रिक्त आहे ,त्या जागी मला स्थान मिळाले तर बरे होईल

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा