शब्दयोगी अव्यये | English Preposition in Marathi

शब्दयोगी अव्ययाचा संबंध साधारणपणे त्याच्या पुढच्या शब्दाशी असतो. जसे, There is a book on the table या वाक्यात on चा संबंध table शी आहे.Agra is to the south of Delhi या वाक्यात to चा संबंध south शी आणि of चा संबंध Delhi शी आहे.

◆ 1.ABOUT

ABOUT
१) I was not talking about it.
मी त्याबद्दल बोलत नव्हतो.
२) Don’t worry about Hari.
हरीची काळजी करू नकोस.
३) Do you have any money about you?
तुझ्याजवळ काही पैसे आहेत का?
४) She is about 5 feet tall.
ती जवळपास पाच फुट उंच आहे.

◆ 2.ABOVE

ABOVE
१) There is a mirror above the washbasin.
वॉशबेसनवर आरसा आहे.
२) They live above us.
ते आमच्या वर (= वरच्या मजल्यावर) राहतात.
3) My name is above yours in the list.
यादीत माझं नाव तुझ्यावर आहे.
४) An inspector is above a sub-inspector.
निरीक्षक उपनिरीक्षकापेक्षा मोठा असतो.

3.ACROSS

ACROSS
१) My office is across the road
माझं ऑफीस रस्त्याच्या त्या बाजूला आहे.
(म्हणजे ऑफीसला पोहोचण्यासाठी मला फक्त रस्ता ओलांडावा लागतो.)
2) Can you swim across this river?
तू ही नदी पोहून ओलांडू शकतोस का?
(म्हणजे तू या नदीच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत पोहू शकतोस का?
३) A new bridge is being built across the river.
नदीवर नवीन पूल बांधला जात आहे.

4.ABOARD

● ABOARD
we got aboard the bus / the train / the ship.
आम्ही बसमधे/आगगाडीत/जहाजावर चढलो.

5.AFTER

AFTER
१) Do you believe in the life after death? ?
मृत्यूनंतरच्या जीवनावर तुझा विश्वास आहे का?
२) After marriage, he became poor.
लग्नानंतर तो गरीब झाला.
३) He has been named after his grandfather.
त्याच्या आजोबाच्या नावावरून त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे.
४) He was asking after you.
तो तुझ्याबद्दल विचारत होता.

6.AGAINST

AGAINST
१) Everyone was against that decision.
प्रत्येकजण त्या निर्णयाविरुद्ध/च्या विरोधात होता.
२) It is against law to drive without licence.
लायसन्सशिवाय गाडी चालवणं नियमाच्या विरुद्ध आहे.
३) Stand your bike against the wall.
भिंतीला टेकून/लावून सायकल उभी कर.
४)This picture will look good against that wall.
हे चित्र त्या भिंतीवर चांगलं दिसेल.

7.ALONG/ALONGSIDE

● ALONG/ALONGSIDE
१) A road goes along the river.
नदीच्या बाजूने एक रस्ता जातो.
2) Vehicles were parked along the road.
वाहने रस्त्याच्या बाजूने उभी केलेली होती.
३) Have you brought your diary along?
तू तुझी डायरी सोबत आणली आहे का?
४) we will not work alongside them.
आम्ही त्यांच्यासोबत काम करणार नाही.

8.AMONG (= amongst)

AMONG (= amongst)
दोनपेक्षा जास्त व्यक्ती अगर गोष्टींमधे असे दर्शवताना – विशेषत: मनात निश्चित संख्या नसताना among वापरतात. जसे,
He disappeared among the crowd.
तो गर्दीमधे दिसेनासा झाला.

9.AROUND

● AROUND
१) Photographers gathered around him.
छायाचित्रकार त्याच्याभोवती जमले.
२) The earth moves around the sun.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
३) He is around thirty.
तो जवळपास तीस वर्षांचा आहे.
४) The trees around your house are lush green.
तुझ्या घरासभोवतालची झाडे हिरवीगार आहेत.

10.AT

AT
ठरावीक स्थान किंवा वेळ दर्शवण्यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाण अगर वेळेपूर्वी at वापरतात. जसे,
१) He dropped me at the station. त्याने मला स्टेशनवर सोडलं.
२) The class starts at 6.00.
क्लास सहा वाजता/सहाला सुरू होतो.
3) I met him at the airport.
मी त्याला विमानतळावर भेटलो.
४) There is someone at the door. .
कोणीतरी दारावर आहे.

11.BEFORE

BEFORE
१) Think before speaking.
बोलण्यापूर्वी/आधी विचार करा.
२) Before marriage, he was rich.
लग्नापूर्वी तो श्रीमंत होता.
३) He stood up before a crowd of 100,000 people to give a speech.
एक लाख लोकांच्या जमावासमोर तो भाषण देण्यासाठी उभा राहिला.

12.BEHIND

BEHIND
१) Who is behind your success?
तुझ्या यशामागे कोण आहे?
2) Our house is behind the post office.
आमचं घर पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे आहे.

13.BELOW

● BELOW
१) The temperature had gone below 20°Cyesterday.
काल तापमान २० सें. च्या खाली गेलं होतं.
२) A sub-inspector is below an inspector.
उपनिरीक्षक निरीक्षकापेक्षा कनिष्ठ असतो.
They live below us.
ते आमच्या खाली (= खालच्या मजल्यावर) राहतात.
४) Your name is below mine in the list.
यादीमधे तुझं नाव माझ्याखाली आहे.

◆14.BENEATH

BENEATH
१) I found this letter beneath the table.
मला हे पत्र टेबलाखाली सापडलं. २) This action is certainly beneath you.
ही कृती निश्चितच तुला न शोभणारी आहे.
३) He thought it beneath him to talk with us.
आमच्याशी बोलणं त्याला कमीपणाचं वाटलं.

◆ 15.BESIDE

BESIDE
१) He came and sat beside me.
तो माझ्या बाजूला येऊन बसला.
२) My handwriting is poor beside yours.
माझं अक्षर तुझ्या तुलनेत खराब आहे.

16.BESIDES

BESIDES
१) The shop is open every day besides Sunday.
रविवार धरून दुकान प्रत्येक दिवशी उघडं असतं.
२) Everyone passed besides Hari.
हरीला धरून सगळे पास झाले.
३)We can’t afford biscuits, chocolates, cakes, et cetera-besides these things are not healthy.
आपल्याला बिस्किट, चॉकलेट, केक, वगैरे परवडत नाहीत – शिवाय या गोष्टी आरोग्यदायी नाहीत.

17.BETWEEN

● BETWEEN
१)This bus runs between Nanded and Parbhani.
ही बस नांदेड आणि परभणीच्या दरम्यान चालते.
२) Amravati lies between Akola and Nagpur.
अमरावती अकोला आणि नागपूरच्या मधे आहे.
३) The temperature will be between 30 and 35°C tomorrow.
उद्या तापमान ३० आणि ३५ च्या दरम्यान असेल.
Between साधारणपणे दोघांच्या मधे असे दर्शवण्यासाठी वापरतात. पण निश्चित संख्या मनात असताना दोनपेक्षा जास्तच्या बाबतीत सुद्धा between वापरता येईल.
उदा. Pakistan lies between India, Afghanistan and iran. पाकिस्तान भारत, अफगाणिस्तान आणि इराणच्या मधे आहे.

18.BEYOND

● BEYOND
१) There is a small town beyond this mountain, .
या पर्वताच्या पलीकडे एक लहान गाव आहे.
2) I have got nothing beyond this dress.
था ड्रेसच्या पलीकडे/शिवाय माझ्याकडे काहीच नाही.

19.BY

BY
१) I prefer travelling by train.
मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो.
२) we are going by car.
आम्ही कारने जात आहोत,
३) You can improve your English by reading English newspapers.
इंग्रजी वर्तमानपत्रे वाचून तुम्ही तुमची इंग्रजी सुधारू शकता.
४)I am a teacher by profession.
मी व्यवसायाने शिक्षक आहे.

20.CONSIDERING

CONSIDERING
१) Considering the quality, the price is not high. .
दर्जा विचारात घेतल्यास किंमत जास्त नाही.
२) Considering the bad weather, we cancelled going there. खराब हवामान विचारात घेऊन आम्ही तिथे जाणं रद्द केलं.

21.DESPITE

DESPITE
We decided to go there – despite the bad weather.
खराब हवामान असूनही/खराब हवामानाची पर्वा न करता आम्ही तिथे जायचं ठरवलं.

22.DURING

DURING
1) They lived abroad during the war.
युद्धाच्या दरम्यान /युद्ध सुरू असताना ते परदेशात राहिले.
२) He goes swimming every day during summer.
उन्हाळ्यात/उन्हाळ्याच्या दरम्यान तो दररोज पोहायला जातो.

◆ 23.EXCEPT/BUT

EXCEPT/BUT
१) The shop is open every day except Sunday.
रविवार सोडून दुकान दररोज उघडं असतं.
२) Everyone liked this plan except (for) / excepting one person.
एक जण सोडून ही योजना प्रत्येकाला आवडली.
३) He can be anything but arrogant.
तो उद्धट सोडून काहीही असू शकतो (= तो काहीही असू शकतो पण उद्धट नाही).
४) Everyone passed except Hari.
हरीला सोडून प्रत्येकजण पास झाला.

● शब्दयोगी अव्ययानंतर क्रियापद येत असल्यास तेव्हा क्रियापदाचे -ing रूप वापरले जाते. मात्र except आणि but या शब्दयोगी अव्ययांनंतर क्रियापदाचे पहिले रूप येते. पहा:
१) We can do nothing except wait till tomorrow.
उद्यापर्यंत वाट पाहण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
२) He does nothing but complain.
तक्रार करण्याशिवाय तो दुसरं काहीच करत नाही.
३) She can do anything except / but cook.
स्वयंपाक सोडून ती बाकी काहीही करू शकते.

24 EXCLUDING/INCLUDING

● EXCLUDING/INCLUDING
१) The price of the car is 175000 rupees excluding the taxes.
कर सोडून/वगळून कारची किंमत १७५००० रुपये आहे. २) How much is it including the taxes?
कर धरून किती किंमत आहे?

25.FOR

FOR
१) Are these books for sale?
ही पुस्तके विक्रीसाठी आहेत का?
२) What have you come here for?
तू इथे कशासाठी आला आहेस?
3) V for victory.
v (व्ही) म्हणजे विजय.
४) Idon’t go to him for various reasons.
मी त्याच्याकडे वेगवेगळ्या कारणांमुळे जात नाही.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा