महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती

महाराष्ट्रातील पर्जन्य माहिती :

महाराष्ट्रातील पर्जन्यकाळ (Rainfall in Maharashtra ) हा प्रत्येक भागात वेगवेगळा असतो.त्यामुळे महाराष्ट्रात पडणारा पाऊस व त्याचे होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक भागात वेगवेगळे असतात.महाराष्ट्रात असलेल्या पाण्याची उपलब्धता हि महाराष्ट्रातील पर्जन्य यावर अवलंबून असते.आज आपण महाराष्ट्रातील पर्जन्याची विविधता सविस्तरपणे बगणार आहोत.

• राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पड़तो. (वार्षिक सरासरी पर्जन्य : ४०० ते ६००० मि.मी.)

• किनारी भागात ७ जूनपासून (मृग नक्षत्र) मोसमी पावसाळा सुरवात होते.

• राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो.राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे २०% क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे.

• राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना ‘ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून’ पाऊस मिळतो, मात्र या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस तुलनेने कमी असतो.

• एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागांत पावसाच्या ‘आंबेसरी’ (आम्रसरी) पडतात. हा पाऊस आंबा पिकास मानवतो.

• सर्वात जास्त 85% पाऊस हा महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून मुळे भेटतो.

‘आंबोली’ येथे सर्वाधिक पाऊस पडतो म्हणून त्यास ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हटले जाते.

• राज्यात सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यातील दहीवडीम्हसवड परिसरात (२९ ते ३० सेमी) पडतो.

• ऑक्टोबर उष्मा : ऑक्टोबर हा महिना पावसाळा व हिवाळ्यादरम्यानचा ‘संक्रमणाचा काळ’ असतो. पर्यायाने राज्यात ऑक्टोबर महिन्यात विलक्षण असह्य उकाडा (Octomber Heat) जाणवतो.

• हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ असला तरी राज्यात नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात होते.


महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण :

  • कोकण (सर्वाधिक)
  • विदर्भ
  • मध्य महाराष्ट्र
  • मराठवाडा (सर्वात कमी)

राज्यातील मान्सूनची (पर्जन्याची) विविधता

राज्याचा प्रदेश पर्जन्याचे प्रमाण वैशीष्ट्ये
कोकण
किनारपट्टी
भरपूर पाऊस
२५० ते ३०० सें.मी.
दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे २४४ सें.मी. पाऊस.
कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.
घाटमाथाअति पर्जन्याचा प्रदेश
(प्रतिरोध पर्जन्य)
३०० सें.मी.हून अधिक पाऊस
दक्षिणेकडे आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यातील
सर्वाधिक म्हणजे सुमारे ७०७ सेमी पाऊस पडतो.
उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.
सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागपर्जन्यछायेचा प्रदेशघाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे ५९४ सेंमीहून अधिक पाऊस ;
तर त्याच्या पूर्वेकडे पाचगणी (१५८ सें.मी.);
वाई (५४ सें.मी.) असे प्रमाण कमी होत जाते.
गोदावरी, भीमा व कृष्णा खोरेअवर्षणग्रस्त प्रदेश ५० ते ७५ सें.मी. पाऊसमालेगाव (नाशिक) येथे ४४ सें.मी. पाऊस
दहीवडी (सातारा) येथे २९ सें.मी. पाऊस
पूर्व विदर्भ
(चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा)
वाढते पर्जन्य (१५० सें.मी.)पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात पाऊस वाढत जातो.
सातपुड्याच्या रांगांचा परिणाम ( प्रतिरोध पर्जन्य )
ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

Similar Posts