राजा राममोहन रॉय | Raja Rammohan Roy Marathi MPSC Notes

0
211

राजा राममोहन रॉय यांचे जीवन चरित्र राज्यसेवा इतिहास संपूर्ण माहिती मराठी मध्ये. Raja Rammohan Roy MPSC History full information in marathi

 • जन्म : २२ मे, १७७२.
 • मृत्यू : २७ सप्टेंबर १८३३
 • पूर्ण नाव : राममोहन रमाकांत रॉय
 • वडील :रमाकांत रॉय.
 • आई : तारिणी देवी.
 • जन्मस्थान: रामनगर (जि. हुगळी, बंगाल).
 • विवाह :’उमादेवी’ सोबत बालविवाह. पहिल्या पत्नीचे निधन, नंतर दोन विवाह
 • शिक्षण :वयाच्या ९ व्या वर्षीच अरबी-फारसी भाषेचे अध्ययन.
 • इ. स. १७९९ मध्ये वनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. या शिवाय इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक व लॅटिन भापांचाही अभ्यास त्यांनी केला.

राजा राममोहन रॉय कार्य – Raja Rammohan Roy Social Works

 • १८०३ मध्ये त्यांनी ‘तुहफत – उल – मुवाहिद्दीन’ (एकेश्वरवाद्यांना नजराणा) नावाचा फारसी भाषेतील ग्रंथ लिहिला.
 • इ. स. १८०९ मध्ये रंगपूर येथे कलेक्टर जॉन डिव्वी यांचा दिवाण म्हणून त्यांनी नोकरी पत्करली.
 • इ. स. १८१५ मध्ये त्यांनी ‘आत्मीय सभा’ स्थापन केली.
 • इ. स. १८१७ मध्ये त्यांनी हिंदू कॉलेज’ ची स्थापना केली.
 • इ.स. १८२१-२२ मध्ये त्यांनी बंगाली भाषेत ‘संवाद कौमुदी’ व फारसी भाषेत मिरात – उल – अखबार’ अशी दोन साप्ताहिके काढली.
 • इ. स. १८२२ मध्ये त्यांनी ‘अग्लो हिंदू स्कूल’ ची स्थापना केली.
 • इ. स. १८२६ मध्ये संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वरवादाच्या समर्थनासाठी त्यांनी ‘वेदांत कॉलेज’ ची स्थापना केली.
 • १८२८ मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्रान्हो समाजाची स्थापना केली.
 • इ. स. १८२८ मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
 • राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट व अमानुप प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली. सतीची चाल धर्मविरोधी आहे, असे त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा आधार घेऊन प्रतिपादन केले. त्यांनी केलेल्या लोकजागृतीमुळेच तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी इ. स. १८२९ मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला.
 • बालविवाह, बालहत्या, केशवपन, जातिभेद, यासारण्या प्रथानाही त्यांनी विरोध केला. त्यांनी विधया पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि समाजात विधवाना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले.
 • राजा राममोहन रॉय यांनी ‘गोदिया’ हे बंगाली भापेच्या व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले

राजा राममोहन रॉय विचार -Raja Rammohan Roy Thoughts

 • भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्यवनातच गुरफटून न पडता गणित व भौतिक शास्त्रे यांचे शिक्षण घ्यावे.
 • ब्राह्मो म्हणजे ब्रह्मांची उपासना करणारा, ब्रह्म म्हणजे विश्वाचे अंतिम तत्त्व, याअंतिम तत्त्वाची उपासना करणारा तो ब्राह्मो समाज होय.
 • धर्मशास्त्राने सांगितलेले विचार स्वतःच्या अनुभवावर व ज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजेत.
 • प्रेम, सेवा व परोपकार हाच धमाचा खरा अर्थ होय, असे समजून सवानी परस्परांशी व्यवहार करावा.

राजा राममोहन रॉय पुरस्कार– Raja Rammohan Roy Prizes

दिल्लीच्या मोगल बादशहा दुसरा अकबर याने राममोहन रॉय यांना ‘राजा’ हा किताब देऊन सन्मानित केले.

राजा राममोहन रॉय विशेषता

 • आधुनिक भारताचे जनक.
 • मानवतावादी समाजसुधारक.
 • इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here