महात्मा जोतिबा फुले | Mahatma Jyotiba Phule Marathi MPSC Notes | Samaj Sudharak

0
284

Mahatma Jyotiba Phule Marathi MPSC Notes Purn Mahiti, Maharashtra Samaj Sudharak Jyotiba Phule Complete Information in Marathi. राज्यसेवा नोट्स महाराष्ट्रातील समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पूर्ण माहिती.

Mahatma Jyotiba Phule Marathi MPSC Notes

 • जन्म : ११ एप्रिल १८२७
 • मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०
 • पूर्ण नाव : जोतीराव गोविंदराव फुले. 
 • वडील :गोविंदराव फुले. 
 • आई : चिमणाबाई फुले
 • पत्नी :  सावित्रीबाई फुले

महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ पुण्यामध्ये झाला त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील “कटगुण” हे होते.

महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते त्यांच्या आईचे नाव “चिमणाबाई” होते तर आजोबाचे नाव “शेरीबा ” होते.

ज्योतिबा 1 वर्षाचे असतानी त्यांच्या आईचा मृत्यु  झाला नंतर ज्योतिबाचा संभाळ त्यांची आत्या “सगुणाबाई “यांनी केला.ज्योतिबाचे मूळ आडनाव “गोऱ्हे” हे होते.

ज्योतिबाच्या आजोबाचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून कालांतराने त्यांचे आडनाव फुले असे झाले .ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माळी समाजाचे होते.

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक कार्य

Mahatma Jyotiba Phule Social Works

 • ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
 • १७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली.
 • १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
 • १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
 • १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.
 • १८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.
 • १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
 • १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.
 • शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती शब्धबद्ध केली.
 • यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.
 • सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरु केले.
 • महात्मा फुलेंनी आप्लया मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळ नावाची संस्था स्थापन केली.
 • २४ सष्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
 • १८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्‍नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेची स्थापना केली.
 • इ.स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या (ड्यूक ऑफ कॅनॉट) कार्यक्रमात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
 • महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. यामुळेच जनतेने त्यांना १८८८ साली महात्मा हि पदवी दिली.
 • 3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
 • 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
 • 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
 • 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
 • 1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
 • 1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
 • 10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
 • 24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
 • व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
 • 1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
 • महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
 • 1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
 • 1868 – ‘ब्राम्हणांचे कसब
 • 1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.
 • 1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
 • 1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
 • 1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
 • 1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
 • 1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
 • अस्पृश्यांची कैफियत.
 • शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये

 • थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.
 • 1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
 • 1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
 • 1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
 • 2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.
 • ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
 • उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
 • सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘
 • सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here