Samas- समास |अव्ययीभाव समास | तत्पुरुष समास – मराठी व्याकरण

0
121

Samas- समास |अव्ययीभाव समास | तत्पुरुष समास – मराठी व्याकरण


समास : जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. अशा रीतीने
तयार झालेल्या ह्या जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.
• उदा. (३) राजाचा वाडा-राजवाडा (२) राम आणि लक्ष्मण-रामलक्ष्मण (३) साखर घालून केलेला भात-साखर भात. (यातील राजवाडा, रामलक्ष्मण आणि साखरभात हे सामासीक शब्द आहेत.)

● या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे असे म्हणतात. ● समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे साहाय्य घेऊन त्याची फोड करावी लागते. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला त्या समासाचा विग्रह करणे असे म्हणतात.

• उदा.(१) तोंडपाठ-तोडाने पाठ (२)ऋणमुक्त-ऋणातून मुक्त (३) प्रतिदिन-दर दिवशी (४) सत्यासत्य-सत्य किंवा असत्य (५)लंबोदर-लंब आहे उदर त्याचे तो. (५) कृष्णार्जुन-कृष्ण आणि अर्जुन

● समासाचे एकूण चार प्रकार खालीलप्रमाणे आहेत. (१)अव्ययीभाव समास (२) तत्पुरुष समास (३) द्वंद्व समास (४)बहुव्रीही समास

पहिले पद मुख्य, दुसरे पद मुख्य, दोन्ही पदे मुख्य, दोन्ही पदे गौण

(१) अव्ययीभाव समास

● (१) अव्ययीभाव समास : यात पहिले पद प्रधान (महव्वाचे) असून असते किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो.

• उदा. (१) अजन्म-जन्मापासून (२) प्रतिवर्ष-दर वर्षाला (३) आमरण-मरणापर्यंत (४) घडोघडी-प्रत्येक घडीला (५) गावोगाव-प्रत्येक गावी (६) यथाशक्ती-शक्तीप्रमाणे.
इतर उदाहरणे-दरमजल, दररोज, हरहमेश, बिनशर्त, बेलाशक,बरहुकूम, गैरहजर, बरखास्त आसेतू, जागोजाग, घरोघर, पावलोपावली, बेमालूम, रात्रंदिवस, इत्यादी.

(२) तत्पुरुष समास

(२) तत्पुरुष समास : यात दुसरे पद प्रधान असते. प्रमुख लक्ष्मणउपप्रकार पुढीलप्रमाणे.

● (अ) विभक्ती तत्पुरुष समास – समासाचा विग्रह करतांना गाळलेला विभक्तिप्रत्यय किंवा गाळलेले शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात.

• उदा. (१) कष्ट साध्या-कष्टाने साध्य (तृतीया तत्पुरुष समास) (२) शास्त्रसंपन्न-शास्त्रात संपन्न (सप्तमी तत्पुरुष समास) (३) देवपूजा जोडल्या देवाची पूजा (षष्ठी तत्पुरुष समास).
इतर उदाहरणे – भक्तिवश, गायरान, बाईलवेडा, पोळपाट, गर्भश्रीमंत, स्वर्गवास, पोटशूळ.

● (आ) कर्मधारय समास : हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार तयारअसून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. त्यात क पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.

• उदा. महादेव-महा असा देव, सुवासना- सु अशी वासना, पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष, घनश्याम-घनसारखा श्याम, किंवा  एका पदाची दुसऱ्या पदाला उपमा दिलेली असते. उदा. कमलनयन- विहंग कमलासारखे नयन; मुखचंद्र-मुख हाच चंद्र इतर उदाहरणे-रक्तचंदन, नीलकमल, पीतांबर, लालभडक, मेघश्याम, नरसिंह, विद्याधन,काव्यामृत.

● (इ) द्विगू समास – यात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण  असून संपूर्ण सामाजिक शब्दाला समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो. 

उदा. त्रिभुवन-तीन भुवनांचा समुदाय, पंचपाळे-पाच पाळ्यांचा समुदाय,

इतर उदाहरणे – पंचवटी, चातुर्मास, नवरात्र, सप्ताह,
पंचारती, त्रैलोक्य.

(ई) मध्यमपद लोपी समास – यात विग्रह करतांना दोन पदांतील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात.
• उदा. बटाटेभात-बटाटे घालून केलेला भात, वांगीपोहे- वांगी घालून केलेले पोहे, पुरणपोळी-पुरण घालून केलेली पोळी,लंगोटीमित्र-लंगोटी घालत असल्या वेळेपासूनचा मित्र.

(उ) नत्रतत्पुरुष : यातील पहिले पद अ, अन् किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. दुसरे पद जर स्वरादी असेल तर पहिले पद अन् हे असते.

• उदा. अन् + आदर – अनादर = आदर नसलेला
न + गण्य = नगण्य = गण्य नसलेला
इतर उदाहरणे – अपुरा, नास्तीक, अयोग्य, निरोगी, नाइँलाज,बेडर, अहिंसा

(ऊ) उपपद तत्पुरुष : या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदन्ताचे रूप असते. म्हणजे एखाद्या धातूचा एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असते.
उदा. हर्षद-हर्ष देणारा, नाटककार-नाटक लिहिणारा, पंकज – पंकात जन्मलेले, जलद-जल देणारा
इतर उदाहरणे : ग्रंथकार, कुंभकार, पांथस्थ, मार्गस्थ, द्विज,विहंग, शेषशायी, देशस्थ मनुज नृप, सुखद, पयोद, खग, नग, सुज्ञ,कृतघ्न, शेतकरी, लाचखाऊ, आगलाव्या, भाजीविक्या, वाटसरु.

● (ओ) अलुक तत्पुरुष समास · ज्या विभक्ती तत्पुरुषात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासाला ‘अलुक् तत्पुरुष समास’ म्हणतात. उदा. युधिष्ठिर अग्रेसर, पंकेरूह,कर्तरिप्रयोग, कर्मणिप्रयोग, सरसिज.
* वरील शब्दाचा पहिला पदांतील अग्रे, युधि, पंके, कर्तरि,कर्मणि सरसि ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत.
* तोंडी लावणे’ हे अलुक्, तत्पुरुष या समासाचे मराठी उदाहरण आहे.

Samas- समास |अव्ययीभाव समास | तत्पुरुष समास – मराठी व्याकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here