सावित्रीबाई फुले माहिती – Savitribai Phule Information in Marathi

0
462

Savitribai Phule Information in Marathi : सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये, त्यांचे बालपण , सामाजिक कार्य , सावित्रीबाई फुलेंचा निबंध .

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला त्या नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथील खंडोजी नेवसे-पाटील यांच्या कन्या होत, इ. स. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यावेळी योतिबांचे वय तेरा वर्षाचे तर सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षांचे होते. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या.

Savitribai Phule Information Mahiti in Marathi

 • जन्म : 3 जानेवारी 1831 
 • मृत्यू : 10 मार्च 1897
 • पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतीराव फुले
 • टोपणनाव : ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
 • वडील : खंडोजी नेवसे (पाटील)
 • आई : सत्यवती नेवसे
 • अपत्ये: यशवंत फुले
 • चळवळ: मुलींची पहिली शाळा सुरु करणे
 • पुरस्कार: क्रांतीज्योती

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य : म. १८४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या.

बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत होता. पुण्यातील उच्चवर्णीयांना व सनातनी लोकांना याचा अतिशय संताप आला त्यांनी सावित्रीबाईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत जात-येत असताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदानालस्ती करीत. काही कर्मठ लोक त्यांच्या अंगावर चिखल-शेण फेकीत , त्यांना दगड मारीत पण सावित्रीबाईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले.)

सनातनी लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरले. त्यामुळे आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे त्यांना मानवले नाही/ इ स १८४९ मध्ये गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले।

इ.स १८६३ मध्ये महात्मा फुल्यानी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीबाई करीत या अनाथ मुलावर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्याची सर्व प्रकारची सेवा करीत त्याना स्वतःला अपत्य नव्हते. पुढे अशाच एका अनाथ मुलाला ‘यशवंता’ ला त्यांनी दत्तक घेतले) (इ. स. १८९० मध्ये महात्मा फुले याचे निधन झाले. पुढे सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा सावित्रीबाईनी वाहिली (इ. स. १८९३ मध्ये सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईनी भूषविल)

 • ३ जानेवारी १८३१ – सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी जन्म.
 • १८४० – ज्योतिराव फूले यांच्याबरोबर विवाह
 • १८४१ – शिक्षणास प्रारंभ.
 • १८४७ – शिक्षक प्रशिक्षण.
 • १ जानेवारी १८४८ – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींच्या पाहिल्या शाळेची स्थापना, सावित्रीबाई शिक्षिका झाल्या.
 • १ मे १८४९ – पुणे येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात प्रौढाच्या शाळेची स्थापना आणि सावित्रीबाईंचे अध्यापन कार्य.
 • १८४९-५० – पुणे-सातारा-नगर या जिल्यांत शाळेची स्थापना आणि त्यातील काही शाळात शिक्षिका म्हणून कार्य.
 • १८४९ – वंचितांच्या शिक्षणासाठी पती ज्योतिरावांबरोबर गृहत्याग.
 • १८५२ – शाळाची तपासणी व आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय.
 • १२.२.१८५३ – मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा विश्रामबाग वाड्यात गौरव आणि सर्व शाळान्चा एकत्र पार पाडलेला बक्षिस समारंभ.
 • १८५३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि सावित्रीबाईंचे यासाठी कार्य.
 • १८५४ – काव्यफुले या कविता संग्रहाचे प्रकाशन.
 • १८५५ – रात्रशाळेची स्थापना.
 • २५.१२.१८५६- ज्योतिबांची भाषणे हे पुस्तक प्रकाशित केले.
 • १८६० – विधवा पुनर्विवाहास सहाय्य.
 • १८६४ – अनाथ बालकाश्रम चालविला.
 • १८६८ – घरचा हौद अस्पृशांसाठी खुला.
 • २४.९..१८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना.
 • १८७५ ते १८७७ – पुणे परिसरात ५२ अन्नछत्रे उघडून सत्यशोधक समाजातर्फे चाललेल्या दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व.
 • २८.११.१८९० – पती महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.
 • १०.३.१८९७ – प्लेग क्रांतिज्योतीचे महानिर्वाण

सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा

काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर, मातोश्री सावित्रीबाई भरणे व गाणी इत्यादी.

सावित्रीबाई फुले यांची विशेषता

 • महाराष्ट्रातील स्त्री-मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी.
 • पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका.
 • त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून पाळण्यात येतो.

सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. जी स्त्री क्रांतिबा जोतिराव फुले यांची पत्नी. त्यांच्या सहवासात व संस्कारात पन्नास वर्षे राहिली. तिने वयाच्या दहाव्या वर्षापासून अक्षरओळख करून घेतली. साक्षर झाली. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला.

तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, याचा वस्तूपाठ घेण्यासाठी काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिली आणि एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून 1852 सालीच सरकार दरबारी तिचा सन्मान झाला. जोतिरावांनी समाजाची दशा व दिशा सावित्रीला समजावून दिली. सावित्रीला स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा वसा घेतला. दीनदलित स्त्रियांची गुलामगिरी तिला अस्वस्थ करीत होती. तिचे नाव भावनाळले. विचारांचा कल्लोळ उठला व ती कव‍ियत्री झाली. 

1854 साली तिचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराणचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीचे भावविश्व फुलांनी बहरून गेले.

‘पिवळा चाफा, जाईचे फुल, जाईची कळी, गुलाब फुल’ आदी त्यांच्या कवितांच शीर्षकावरून लक्षात येते. या संग्रहातील फुलाविषयीच्या कवितांचा आविष्कार अत्यंत आधुनिक आहे. आविष्कार पद्धती आधुनिक मराठी काव्यात फार पूर्वीपासून होती, व तिचा उगम सावित्रीबाईंच तारुण्सुलभ कवितेत आहे. 

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे.

रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने


या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतिकातून सावित्री अचूकपणे व समर्थपणे करते. या संग्रहातील उरलेल्या कवितांपैकी काही कविता तिच्या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. जोतिरावांच्या सम्यक विचारातून स्फुरलेल्या आहेत. ‘स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हा’ या कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूम‍ी व नाटय़ अतिशय प्रभावी आहे.    

काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।

सर्वा जागे केले। या सूर्याने ।।

शूद्र या क्षितीजी। जोतिबा हा सूर्य ।।तेजस्वी अपूर्व। उगवला।             

अशी जोतिरावांना ‘ज्ञानसूर्य’ मानणारी महान कवयित्री अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री होती. 1811 साली जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी जोतिरावांचे एक पद्यमय चरित्र लिहिले आहे. त्याचे नाव ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्य चरित्रग्रंथ दस्तुरखुद्द सावित्रीनेच लिहिला आहे. फुले चरित्राबाबत तो अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज मानला पाहिजे. या चरित्रग्रंथाला बावन्नकशी म्हटले आहे. त्यात बावन कडवी आहेत. लग्न झाले तेव्हापासून जोतिराव आपली पत्नी सावित्री आणि ‘आऊ’ सगुणाबाई यांनासुद्धा शिक्षणाचे पाठ देत असे हे चरित्र सांगते. म्हणूनच या चरित्रकाव्यग्रंथात कृतज्ञतेची भावना अभिव्यक्त झालेली आहे.

तुम्ही वाचली आहे Savitribai Phule Information in Marathi ,आवडली असल्यास कंमेंट करून कळवा

Previous articleMaharashtra Police Bharti Syllabus in Marathi 2021 : पोलीस भरती अभ्यासक्रम
Next articleविधानपरिषद (Legislative Council) माहिती : VidhanParishad Information in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here