शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One Word Substitution in Marathi

अनेक शब्दांबद्दल एक शब्द : Marathi Vyakaran

शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी (Shabd Samuh Badal Ek Shabd) म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होतो. अश्या अनेक १०० हुन अधिक शब्द समहूची यादी खाली दिली आहे . One Word Substitution in Marathi.

ज्याला कधीही मृत्यू नाही असा = अमर

ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे = अनुपम, अनुपमेय

ज्याचा कधीही वीट येत नाही असे = अवीट

मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण = अन्नछत्र

कोणाचाही आधार नाही असा = अनाथ

ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे = अनमोल

मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ) = अनुज

पूर्वी कधीही न घडलेले = अभूतपूर्व

जे टाळले जाऊ शकत नाही असे = अपरिहार्य

एखाद्या गोष्टीची उणीव असणारी स्थिती = अभाव

एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा = अष्टावधानी

पायांत पादत्राणे न घालता = अनवाणी

पूर्वी कधीही न ऐकलेले = अश्रुतपूर्व

पूर्वी कधीही न पाहिलेले = अदृष्टपूर्व

कोणाच्याही पक्षात सामील न होणारा = अपक्ष

जे साध्य होत नाही ते = असाध्य

देवलोकातील स्त्रिया = अप्सरा

नेत्याचे अनुकरण करणारे व त्याच्या मागून जाणारे = अनुयायी

ढगांनी झाकलेले = अभ्राच्छादित

कधीही विसरता न येणारे = अविस्मरणीय

वर्णन करता येणार नाही असा = अवर्णनीय

कधीही नाश पावणार नाही असा = अविनाशी

ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा = अजिंक्य, अजेय

सूचना न देता येणारा पाहुणा = आगतुक

तुलना करता येणार नाही असे = अतुलनीय

निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था = अनाथाश्रम

पडदा दूर करणे = अनावरण

थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट

कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू

एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती

मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित

अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक

ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड

ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू

विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू

ज्याने लग्न केले नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)

ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे = अथाग

घरी पाहुणा म्हणून आलेला = अतिथी

अतिशय उंच = मोजता येणार नाही इतके

अनुभव नसलेला = अननुभवी

अन्न देणारा = अन्नदाता

आवरता येणार नाही असे = अनावर

विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण

आकाशातील ताऱ्यांचा पट्टा = आकाशगगा

जिवंत असेपर्यंत = आजन्म

मरण येईपर्यंत = आमरण

थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद

मनाला आल्हाद देणारा = आल्हाददायक

ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा = आजानुबाहू

लग्नात द्यावयाची भेट = आहेर

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत = आसेतुहिमाचल

नसलेली गोष्ट आहे असे वाटणे = आभास

संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत = आपादमस्तक

देव आहे असे मानणारा = आस्तिक

स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र = आत्मवृत्त, आत्मचरित्र

बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण = आबालवृद्ध

अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी = आदिवासी

वाटेल तसा पैसा खर्च करणे = उधळपट्टी

सतत पैसा खर्च करणारा = उधळ्या

ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा = उपकृत

उदयाला येत असलेला = उदयोन्मुख

शिल्लक राहिलेले = उर्वरित

जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राह शकणारा = उभयचर

घरदार नसलेला = उपऱ्या, बेघर

सूर्याचे उत्तरेकडे जाणे = उत्तरायण

शापापासून सुटका = उ:शाप

सतत उद्योगात मग्न असणारा = उद्यमशील

हळूहळू घडून येणारा बदल = उत्क्रांती

सतत एकटे राहण्याची आवड असलेला = एकलकोंडा

श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ

लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत = अंगाईगीत

अंग राखून काम करणारा = अंगचोर

दुसऱ्याच्या ताब्यात असलेला = अंकित

निरनिराळ्या राष्ट्रांतील = आंतरराष्ट्रीय

आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा = कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष

कर्तव्याकडे पाठ फिरविणारा = कर्तव्यपराङ्मुख

जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी = कमलाक्षी

अंगी एखादी कला असणारा कलावान = कलाकार, कलावंत

दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा = कनवाळू

कष्टाने मिळणारी = कष्टसाध्य

कानास गोड लागणारे = कर्णमधुर

कामाची टाळाटाळ करणारा = कामचुकार

भाकरी करण्याची लाकडी परात = काथवट

सर्व इच्छा पूर्ण करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय = कामधेनू

कार्य करण्यास सक्षम असलेला = कार्यक्षम

अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा = कृष्णपक्ष

केलेले उपकार विसरणारा = कृतघ्

धान्य वा तत्सम वस्तू साठविण्याची जागा = कोठार

ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा = कोट्यधीश

कुंजात विहार करणारा = कुंजविहारी

मडकी बनविणारा = कुंभार

शीघ्रतेने किंवा अकस्मात घडून आलेला बदल = क्रांती

सतत पैसे खर्च करणारा = खर्चिक

आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र = खेळगडी

जन्मत:च श्रीमंत असलेला = गर्भश्रीमंत

जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी = गजगामिनी

सापांचा खेळ करणारा = गारुडी

गडाचा वा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी = गडकरी

तुम्ही वाचले आहेत मराठी शब्द समूह बद्दल एक शब्द…..

Similar Posts