सुरेंद्रनाथ बॅनर्जी माहिती मराठी –

सुरेंद्रनाथ  बॅनर्जी : (१० नोव्हेंबर १८४८–६ ऑगस्ट १९२५). सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी हे एक थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • जन्म : १० नोव्हेंबर १८४८.
  • मृत्यू : ६ ऑगस्ट १९२५
  • पूर्ण नाव : सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी.
  • वडील :दुर्गा चरण
  • जन्मस्थान : कलकत्ता
  • शिक्षण:  बी. ए. परीक्षा उत्तीर्ण.
  • आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण,

त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला होता.त्यांचे वडील दुर्गाचरण हे डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्‍लंडला जाऊन ते आय्. सी. एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९).

भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले (१८७४). त्या विरुद्ध त्यांनी इंग्‍लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्‍न केला पण तो निष्फळ ठरला. त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली. इंग्‍लंडमधील मुक्कामात एडमंड बर्क, जूझेप्पे मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला

कार्य

इ.स. १८७३ मध्ये त्यांच्याविरुद्ध काहींनी खोटे आरोप लावले होते. त्याकरिता चौकशीसाठी एक आयोग स्थापन करण्यात आला. त्यांना स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच आयोगाने त्यांना नोकरीतून काढले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची मागण्याकरिता त्यांनी इंडिया ऑफिसकडे अपील केले पण ते फेटाळले गेले.

तेव्हा त्यांनी बॅरिस्टर होण्याचे ठरविले पण तेथेही त्यांना मनाई करण्यात आली

इ. स. १८७५ मध्ये भारतात परत येताच ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांची मेट्रोपोलिटन कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकविताना ते त्यांच्या मनात देशभक्ती व ब्रिटिशविरोधी भावना जागृत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत.

इ.स. १८७६ मध्ये स्थापन झालेल्या ‘इंडियन असोसिएशन’ मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. जेव्हा सिव्हिल सव्हिसच्या परीक्षेकरिता वयाची अट २१ वर्षाहून १९ वर आणण्याचा सरकारने निर्णय घेतला होता तेव्हा इंडियन असोसिएशनने मोठया प्रमाणावर या निर्णयाचा विरोध केला.

इ.स. १८७६ मध्ये ते कलकत्ता महापालिकेवर निवडून आले.

इ.स. १८८२ मध्ये बॅनर्जी यांनी स्वत:चीच एक शाळा स्थापन केली. कालांतराने ती शाळा ‘रिपन कॉलेज’ म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘बंगाली’ नावाचे वृत्तपत्र काढून त्यातूनही त्यांनी जनजागृती केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात मुंबईला काँग्रेसचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते.

इ. स.१८९५ साली पुण्यास भरलेल्या व इ. स. १९०२ साली अहमदाबाद येथे भरलेल्या कांग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पुढे इंडियन असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे उदारमन त्यांनी दाखविले होते..

इ. स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी सरकारने करण्याचे ठरविताच सुरेंद्रनाथांनी लोकजागृती करून त्याविरोधी प्रचाराचे जे रान उठविले. त्यामुळे त्यांना अखिल भारतीय नेते’ भारतीय तरुणांचे नेते’ असे मानले जाऊ लागले.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालच्या फाळणीबाबत लिहितात, “बंगालच्या विभाजनाची कल्पना आमच्यावर बॉम्ब पडावा अशी आदळली. त्यामुळे आमचा भयंकर अपमान करण्यात आला असे आम्हाला वाटते. या योजनेद्वारे बंगाली भाषीक जनतेत विकसित होणाऱ्या आत्मसन्मान आणि एकात्मतेवर भयंकर आघात करण्यात आला, असे आम्हाला वाटते.”

इ.स. १९१८ मध्ये मुंबईत काँग्रेस अधिवेशनात मतभेद झाले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि त्यांचा गट कांग्रेसमधून बाहेर पडला. त्याच वर्षी त्यांनी ‘इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना केली. त्याचे अध्यक्ष ते झाले. नंतर पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. स्थानिक स्वशासनाचे ते मंत्री बनले.

पुरस्कार

इंग्रज सरकारने त्यांना ‘सर’ ही मानाची पदवी दिली.

विशेषता

  • आय, सी. एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय.
  • भारतीय राष्ट्रवादाचे जनक

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा