Talathi Bharti 2023 – अखेर तलाठी पदभरती जाहीर 4644 जागा ऑनलाईन अर्ज सुरु

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्रात 4644 रिक्त जागांसाठी तलाठी पदे भरण्यासाठी मोठी मेगा भरती जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात सुरुवात, Mahabhumi.gov.in वर २६ जून २०२३ ते २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकणार.

तलाठी भरती २०२३ जाहिरात –

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

तलाठी भरती पात्रता : Eligibility Criteria

शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि.१९/३/२००३ नुसार संगणकाची आता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना मंडळ मराठी/ हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण आवश्यक राहील.

माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता : पदवी होता असलेल्या आणि अचानक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेली नसलेल्या पदाच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किया इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास अर्ज करू शकतात.

तलाठी भरती वयोमर्यादा :

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
  • मागास प्रवर्ग: 19 ते 43

इतर वयोमर्यादा बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा .

महाराष्ट्र तलाठी वेतन : Talathi Salary

नवीन GR नुसार तलाठी वेतन श्रेणी – २५५०० ते ८११०० रुपये /- असेल .

जिल्हानिहाय रिक्त पदे – Talathi Bharti Vacancy 2023

तलाठी विभागरिक्त पदे
नाशिक 982
औरंगाबाद 939
कोकण 838
नागपूर 707
अमरावती 191
पुणे विभाग887
एकूण4644

तलाठी भरती परीक्षा स्वरूप : Talathi Exam 2023 Pattern

ऑफिसिअल जाहिरात निघाल्यानंतर जागांमध्ये बदल होऊ शकतो.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

Maharashtra Talathi Bharti 2023 Application Fee

  • सर्वसाथारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900

तलाठी भरती अर्ज कसा करावा : Talathi Online Application

पात्र उमेदवार २६ जून २०२३ पासून ते २५ जुलै २०२३ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink ऑनलाईन अर्ज करू शकतात .

तलाठी पदभरती २०२३ अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

Talathi Bharti Normalization :

तलाठी (गट-क) सवंर्गाची परिक्षा २०२३ ही राज्यातील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांची संख्या विचारात घेऊन सदर परिक्षा वेगवेगळया सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. सदर प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळया असतील. परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकपेक्षा अनेक सत्रात पार पाडावयाची झाल्यास भिन्न प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येईल व त्यासाठी पुढे नमूद केलेल्या (Mean Standard Deviation Method) या पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.

परीक्षा दिनांक – Talathi Bharti 2023 Exam Date

परीक्षा दिनांक https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वर प्रदर्शित केली जाईल . १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ दरमान्य ऑनलाईन पेपर होणार आहे

तलाठी भरती साठी मोक टेस्ट – Free Talathi Test Series 2023

तलाठी भरती चे जुने पेपर्स – Talathi Previous Year Papers

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा