तलाठी पदाबद्दल सविस्तर माहिती

तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील कर्मचारी असतो.जमीन संबधित कामकाजासाठी तलाठी या पदाची निवड केली जाते.1984 सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातील सरकारी हिशोब सांभाळण्यासाठी तलाठी या पदाची निर्मिती केली जाते.

तलाठी भरती साठी शैक्षणिक पात्रता:

 1. तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे,किंवा शासनमान्य इतर पदवीधर असणे आवश्यक.
 2. संगणक/माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,हि परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत हि प्राप्त करणे आवश्यक राहील.
 3. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
 4. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा:

 1. तलाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे किंवा 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 2. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट असते.

कशी होते तलाठी भरती?

 1. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.
 2. तलाठी पदासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
 3. तलाठी पदाची भरती हि सरळसेवा पद्धतीने होत असते.
 4. तलाठी पदे हि गट क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

लेखी परीक्षेचे स्वरूप:

तलाठी भरती परीक्षा हि 200 गुणांसाठी होते .100 प्रश्न असतात 1 प्रश्न 2 गुणांसाठी असतो 200 गुण हे 4 विषयामध्ये विभागली जातात.

प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतात

 1. मराठी
 2. गणित
 3. सामान्यज्ञान
 4. अंकगणित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *