उपराष्ट्रपती माहिती मराठीमध्ये : Uprashtrapati Information in Marathi

उपराष्ट्रपती माहिती मराठीमध्ये (Uprashtrapati Information in Marathi) : भारतासाठी ‘उपराष्ट्रपती’ पदाची तरतूद कलम ६३ नुसार केली आहे.

• भारताचे उपराष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात.

• राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचे काम पाहतात.

• भारताचे उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती या पदावरून स्वीकारण्यात आले आहे.

• कलम ६३ नुसार भारतासाठी ‘उपराष्ट्रपती’ पदाची तरतूद केली आहे.

• कलम ६४ नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष (सभापती) असतात, मात्र ते राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात.

• कलम ८९ नुसार राज्यसभेचे अध्यक्ष (सभापती) व उपसभापती यांची तरतूद.

शपथ (कलम ६९) नुसार उपराष्ट्रपतींना पदाची शपथ राष्ट्रपती देतात.

उपराष्ट्रपती माहिती मराठीमध्ये : Uprashtrapati Information in Marathi

पात्रता

उपराष्ट्र्पतीच्या पात्रतेसाठी (कलम ६६(३)नुसार:

१) तो भारताचा नागरिक असावा .

२) उपराष्ट्र्पतीच्या पात्रतेसाठी वय वर्ष ३५ वर्षे पूर्ण पाहिजे.

३) राज्यसभेवर निवडून येण्याची पात्रता.

४) कलम ६६ (२) नुसार उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसतो.

उपराष्ट्रपतींची निवडणूक

• उपराष्ट्रपतींची निवडणूक (कलम ६६) नुसार उपराष्ट्रपतींची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने केली जाते.
प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने ही निवड केली जाते.

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत केवळ पुढील सदस्य भाग घेतात. –
१) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित (Elected) सदस्य
२) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित (Nominated) सदस्य

• संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य भाग घेतात. घटकराज्यांतील
विधानसभा तसेच विधानपरिषद सदस्यांना हा अधिकार नसतो.

• उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारास भारतीय रिझर्व्ह बँकेत रु. १५ हजार अनामत रक्कम ठेवावी लागते.

कार्यकाल

उपराष्ट्रपतींचा कार्यकाल (कलम ६७) नुसार सामान्य परिस्थितीत ५ वर्षे,असतो.

पण त्या आधी उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा द्यायचा असल्यास,मुदतीआधी उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा देऊ शकतात.

उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केल्यास किंवा त्यांचे पदावर असताना निधन झाल्यास,उपराष्ट्रपतींचे पद मुदतपूर्व रिक्त होऊ शकते.

उपराष्ट्रपतींची पदच्यूती

उपराष्ट्रपतींना कालावधी पूर्ण होण्याआधी पदावरून दूर करायचे असल्यास –
हा ठराव प्रथम राज्यसभेत राज्यसभेच्या सदस्यांनीच मांडावा लागतो.
हा ठराव राज्यसभेच्या उपस्थित सदस्यांच्या प्रभावी बहुमतांनी संमत व्हावा लागतो.
त्यानंतर हा ठराव लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर झाल्यास उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते.
मात्र, अशा ठरावासंबंधीची नोटिस. किमान १४ दिवस आधी सभागृहात द्यावी लागते.
टीप : उपराष्ट्रपतींच्या पदच्यूतीची कारणे संविधानात स्पष्ट करण्यात आली नाहीत.
उपराष्ट्रपतींच्या पदच्यूतीसाठी महाभियोगाची आवश्यकता नसते.
उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणून त्यांच्या पदच्यूतीचे अधिकार राज्यसभेस आहेत.

उपराष्ट्रपतींचे पद मुदतपूर्व रिक्त झाल्यास ते भरण्यासाठीच्या तरतूदी

१) रिक्त पदावर हंगामी उपराष्ट्रपतींची नियुक्ती केली जात नाही. ते पद रिक्तच राहते.
२) हे रिक्त पद भरण्यासाठी लवकरात लवकर म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांच्या आत
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावीच लागते. मुदतपूर्व निवडणुकांमध्ये नव्याने निवडून आलेले उपराष्ट्रपती नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे पदावर राहतात.

उपराष्ट्रपतींचे अधिकार व कार्ये

१) कलम ६४ व कलम ८९ : उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती (Ex Officio Chairman of Rajya Sabha) असतात.
२) राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.
३) भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत जास्तीत जास्त सहा महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.
याउलट अमेरिकेचे उपराष्ट्रपती तेथील अध्यक्षांचे (राष्ट्रपतींचे) पद मुदपूर्व रिक्त झाल्यास उर्वरित संपूर्ण कालावधीसाठी उपराष्ट्रपती हेच अध्यक्ष तथा राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. म्हणजेच अमेरिकेत हंगामी राष्ट्रपती नेमण्याची पद्धत नाही.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा