◆ विशेषण : visheshan in marathi|प्रकार| उदाहरण : Marathi vyakaran
अनुक्रमणिका
◆ विशेषण
● विशेषण – नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
• विशेषण आणि विशेष्य
ज्या नामांबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. वरील शब्दसमूहातील विशेषण-विशेष्य संबंध पुढीलप्रमाणे तक्त्यात मांडता येतील.
विशेषण विशेष्य
चांगली मुले
काळा कुत्रा
हिरवे रान
◆ विशेषणांचे प्रकार
• विशेषणांचे मुख्य प्रकार तीन आहेत.
• (१) गुणविशेषण. •(२) संख्याविशेषण •(३) सार्वनामिक विशेषण.
त्या शिवायही विशेषणांचे पुढील तीन प्रकार आहेत. (१) नामसाधित विशेषण
(२) धातुसाधित विशेषण (३) अव्ययसाधित विशेषण.
१. गुणविशेषण
१. गुणविशेषण :- ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला
जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदा :- मोठी मुले, आंबट बोरे, शुभ्र ससा, शूर सरदार, रेखीव चित्र,निळासावळा झरा.
२. संख्याविशेषण
२. संख्याविशेषण :- ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण
असे म्हणतात.
संख्याविशेषणाचे पुढील पोटप्रकार आहेत –
• गणनावाचक संख्याविशेषण
• क्रमवाचक संख्याविशेषण • आवृत्तीवाचक संख्याविशेषण
• पृथकत्ववाचक संख्याविशेषण • अनिश्चित संख्याविशेषण.
• गणनावाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा.
दहा मुली, चौदा भाषा, साठ रुपये, सहस किरणे, अर्धा तास, दोघे मुलगे इत्यादी.
वरील शब्दांतील दहा, चौदा, साठ, सहस, अर्धा, दोघे या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो. त्यांस गणनावाचक संख्याविशेषणे म्हणतात.
• क्रमवाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा.
पहिला वर्ग, चौथा बंगला, आठवी इयत्ता, साठावे वर्ष.वरील शब्दांतील पहिला, चौथा, आठवी, साठावे’ ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात. अशा
विशेषणांना ‘क्रमवाचक संख्या विशेषणे‘ असे म्हणतात. प्रथमा, द्वितीया… सप्तमी ही संस्कृतातील क्रमवाचक संख्याविशेषणे मराठीतही वापरतात.
• आवृत्तिवाचक संख्याविशेषणे
पुढील शब्द पाहा.
चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद,वरील शब्दांतील ‘चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित’ ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना ‘आवृत्तिवाचक संख्याविशेषणे’ असे म्हणतात.
• पृथकत्ववाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा.
एकेक मुलगा, दहा-दहांचा गट. यातील ‘एकेक, दहा-दहा’ ही विशेषणे वेगवेगळा (किंवा पृथक) असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.
• अनिश्चित संख्याविशेषण
सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी, इतर लोक, इत्यादी देश.वरील शब्दांतील ‘सर्व, थोडी, काही, इतर, इत्यादी’ ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत, म्हणून त्यांना ‘अनिश्चित संख्याविशेषणे’ असे म्हणतात. जसे- अन्य, अल्प, एकंदर.
३. सार्वनामिक विशेषण
३. सार्वनामिक विशेषण – पुढील शब्दसमूह पाहा.
हा मनुष्य,तो पक्षी,तिच्या साड्या,असल्या झोपड्या,कोणता गाव. वरील शब्दांतील ‘हा, तो, मी, ती, असा, कोण’ ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे
नामाऐवजी येत असते. पण वरील शब्दांत सर्वनामांच्यापुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात.सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात
◆ विशेषणांचे कार्य व उपयोग
● विशेषणाचे मुख्य कार्य हे की, ते नामाबद्दल विशेष माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते.
विशेषण हे नेहमी नामासह येते. वाक्यात नाम नसेल, तर विशेषण असणार नाही. विशेषणाच्या पुढे नाम न
तेव्हा ते विशेषण नामाचे कार्य करते. उदा.
• नामसदृश विशेषणे
(१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
(२) श्रीमंतांना गर्व असतो. (नाम)
• दर्शक विशेषणे : ही मुलगी चलाख आहे.
• संबंधी विशेषणे: जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.
• प्रश्रार्थक विशेषणे: कोण मनुष्य येऊन गेला?
त्याने काय पदार्थ आणले ?
• सार्वनामिक विशेषणे: आम्हां मुलांना कोण विचारतो?
विशेषण : visheshan in marathi|प्रकार| उदाहरण : Marathi vyakaran