या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी वाक्य व त्याचे प्रकार – Vakya v Vakyache Prakar – मराठी व्याकरण मध्ये वाक्याचे अनेक प्रकार पडतात ते आज आपण बघणार आहोत .
वाक्य म्हणजे काय – Marathi Vyakya – Sentences
Table of Contents
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील या शब्दाच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.
वाक्याची रचना –
वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही; तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे. वाक्यातील शब्दांची रचना ही नियमांना धरून आहे.
- कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरूवातीला आला पाहिजे.
- क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजे.
- कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते.
- वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने मध्यभागी आले पाहिजे.
- जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या सुरूवातीला आले पाहिजे. अशा प्रकारे वाक्याची रचना केली जाते.
वाक्याचे प्रकार – Marathi Vakyache Prakar – Tyepes
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार :
1. विधांनार्थी वाक्य –
ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा .
- मी आंबा खातो.
- गोपाल खूप काम करतो.
- ती पुस्तक वाचते.
2. प्रश्नार्थी वाक्य –
ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- तू आंबा खल्लास का?
- तू कोणते पुस्तक वाचतोस?
- कोण आहे तिकडे?
3. उद्गारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- अबब ! केवढा मोठा हा साप
- कोण ही गर्दी !
- शाब्बास ! UPSC पास झालास
वरील प्रकारातील वाक्य होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही प्रकारातून व्यक्त करता येते.
4. होकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा .
- माला अभ्यास करायला आवडते.
- रमेश जेवण करत आहे.
- माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
5. नकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- मी क्रिकेट खेळत नाही.
- मला कंटाळा आवडत नाही.
6. स्वार्थी वाक्य –
ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- मी चहा पितो.
- मी चहा पिला.
- मी चहा पिनार.
7. आज्ञार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती,उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
- देव तुझे भले करो (आशीर्वाद)
- कृपया शांत बसा (विनंती)
- देवा माला पास कर (प्रार्थना)
- प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)
8. विधार्थी वाक्य –
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)
- तू पास होशील असे वाटते (शक्यता)
- ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)
- तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)
9. संकेतार्थी वाक्य –
जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
- जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
- पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
- गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.
- जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :
1. केवळ वाक्य –
ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा.
- राम आंबा खातो.
- संदीप क्रिकेट खेळतो.
2. संयुक्त वाक्य –
जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा.
- विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
- भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.
3. मिश्र वाक्य –
जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
My best friend is saurabh