जिल्हा परिषद अंतर्गत १९ हजार पदांची भरती, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व पदे भरण्याचे आदेश

जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या राज्यातील सर्व गट क आरोग्य व इतर विभागातील एकूण जवळ जवळ १९ हजार पदे भरण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे या विभागातील मोठी भरतीची जाहिरात निघेल असे वाटते. दिनांक १२ एप्रिल २०२३ ला नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला या मध्ये ZP मधील सर्व विभागातील रिक्त पदांचा आढावा पूर्ण झाला असून १८९३९ पदे भरण्यासाठीची मंजुरी देण्यात आली .

जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असलेल्या १९ हजार पदे येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत भरण्याचे आदेश ZP चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष चांदेकर यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच भरतीची जाहिरात निघेल, सर्व जिल्हापरिषद ची भरती एकत्र होणार असून IBPS मंडळाद्वारे परीक्षा घेणार येणार आहे.

त्याच बरोबर सदर परिपत्रानुसार विभागाच्या ३१.१२.२०२३ पर्यंत होणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व जाहिरातीकरिता अर्ज करण्याऱ्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे.

कोणती पदे भरण्यात येतील ?

कार्यकारी अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, पशुधन पर्वक्षक, लिपिक, शिक्षक, चालक इत्यादी … असे इतर पदे.

लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत जाहिरात प्रसीद्ध केली जाणार आहे

नवीन GR डाउनलोड करा ..

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा