जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात ४१४७ पदे भरण्यासाठी मंजुरी

जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एकूण ४१४७ पदे भरण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे या विभागातील मोठी भरतीची जाहिरात निघेल असे वाटते. दिनांक १० एप्रिल २०२३ ला नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला या मध्ये ZP मधील सर्व विभागातील रिक्त पदांचा आढावा पूर्ण झाला असून ४१४७ पदे भरण्यासाठीची मंजुरी देण्यात आली .

पाणी पुरवठा च्या नवीन GR नुसार एकूण ४१४७ पदांपैकी २७६५ पदे स्थायी स्वरुपात भरण्यात येत असून १३८२ पदे हे अस्थायी स्वरूपात भरण्यात येतील.

कोणती पदे भरण्यात येतील ?

कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखाधिकारी, सहायक अर्जदार, वरिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक लेखा, मेकॅनिक, रिंगमन, कनिष्ठ सहाय्यक असे इतर पदे.

लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरु होईल व जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदे भरण्यात येतील.

1 thought on “जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात ४१४७ पदे भरण्यासाठी मंजुरी”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा