समाजसुधारक : क्रांतिसिंह नाना पाटील माहिती

समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील : जीवन परिचय

  • पूर्ण नाव : नाना रामचंद्र मिसाळ
  • जन्म : 3 ऑगस्ट 1900
  • जन्मगाव : सांगली जिल्ह्यातील ‘वहेबोरगाव’ या गावी
  • मुळगाव : ‘येडमच्छिद्र’
  • मृत्यू : 6 डिसेंबर 1976
  • मृत्यूस्थळ : मिरज
  • वडील : रामचंद्र

समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांची सविस्तर माहिती

जन्म :

• समाजसुधारक नाना पाटील यांचे पूर्ण नाव : नाना रामचंद्र मिसाळ होते . यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘वहेबोरगाव’ येथे झाला. सांगली जिल्ह्यातील ‘येडमच्छिद्र’ हे त्यांचे मुळगाव होते ,पण वडील रामचंद्र हे गावचे पाटील म्हणून कार्यरत होते म्हणून लहानपणी नाना पाटील यांचे वास्तव्य मुख्यत्वे वाळवा या गावी होते.

• लहानपणापासूनच नानांना दणकट शरीरयष्टी लाभली होती . म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.

• नाना पाटील हे 1916 साली सातवी परीक्षा उत्तीर्ण झाले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ ‘ तलाठी ‘ म्हणून नोकरी केली. नंतर समाजकार्याच्या ओढीणे नोकरी सोडली व 1930 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला. नानांवरती वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता.

• ग्रामीण भागातील बहुजनसमाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे नानांचे प्रमुख योगदान होय.

• ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा उभी करण्याचा त्यांचा विचार होता त्यासाठी त्यांनी 1942 च्या चळवळीत ‘आपुला आपण करू कारभार’ हे सुत्र आमलात आणले.

• त्यातुनच नानांनी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

• ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र हाती घेऊन क्रांती सिंह नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं .गुलाम गिरीचि तीव्र तिढी स्वातंत्र्याचा ध्यास हे गुण नानाच्या अंगी होते त्याच बरोबर दनकट शरीर कुशल नेत्रुत्त्व या गुणांना प्रभावी वक्रुत्त्व याची जोड मिळाली पाहता पाहता सातारा सांगली पट्टयातुन नाना पाटलांच्या चळवळीत अनेकजण सामील झाले आणि तुफान सेना नावाची स्थापना झाली .

1929 ते 1932 या काळात त्यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली

समाजसुधारक ( क्रांतिसिंह नाना पाटील) : समाजसुधारणेचे कार्य

• क्रांतिसिंह नाना पाटील (३ ऑगस्ट, इ.स. १९००) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

• महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

• १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती.

• ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती.

• प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

• प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

• या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना पिळवणूक करणाऱ्या सावकारांना पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती.

• या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

• १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते.

• ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कहाड तालुक्यात प्रकट झाले.

• यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्वा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

• देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला.

• त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड. मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

मृत्यू : स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ मिरज मध्ये निधन झाले.

Leave a Reply