MPSC Rajyaseva New Syllabus 2026 – Marathi English PDF
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा राजपत्रित परीक्षे साठी नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तर हा नवीन राज्यसेवा अभ्यासक्रम 2026 MPSC परीक्षे साठी अमलात आणला जाईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2026 पासून होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी एक नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे, जो 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अमलात आणला जाईल. हा बदल उमेदवारांना स्वतःच्या तयारीच्या दृष्टीने एक नवीन दिशा देणार आहे आणि राज्यसेवेच्या प्रशासनिक पदांसाठी त्यांची क्षमता मोजण्याची पद्धत अधिक व्यापक आणि अद्ययावत करणार आहे.
MPSC New Syllabus Struture 2026
परीक्षा टप्पे:
राज्यसेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते:
- पूर्व परीक्षा (Preliminary Examination): ही परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची असते.
- मुख्य परीक्षा (Main Examination): ही परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असते.
- मुलाखत (Interview): ही परीक्षा व्यक्तिमत्व चाचणीसाठी असते.
२. पूर्व परीक्षा (Preliminary Examination):
- दोन पेपर असतात:
- पेपर १: सामान्य अध्ययन (General Studies): १०० प्रश्न, २०० गुण.
- पेपर २: CSAT (Civil Services Aptitude Test): ८० प्रश्न, २०० गुण. (Qualifying 33% गुण मिळवणे आवश्यक )
- दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ (Objective) प्रकारचे असतात.
- पेपर २ केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचा असतो. त्याचे गुण अंतिम गुणांमध्ये मोजले जात नाहीत.
- पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी असते.
३. मुख्य परीक्षा (Main Examination):
मुख्य परीक्षेत नऊ पेपर असतात, जे खालीलप्रमाणे आहेत:
- पेपर १: मराठी भाषा (Marathi Language): ३०० गुण.
- पेपर २: इंग्रजी भाषा (English Language): ३०० गुण.
- पेपर ३: निबंध (Essay): २५० गुण.
- पेपर ४: सामान्य अध्ययन १ (General Studies 1): २५० गुण.
- पेपर ५: सामान्य अध्ययन २ (General Studies 2): २५० गुण.
- पेपर ६: सामान्य अध्ययन ३ (General Studies 3): २५० गुण.
- पेपर ७: सामान्य अध्ययन ४ (General Studies 4): २५० गुण.
- पेपर ८: वैकल्पिक विषय पेपर १ (Optional Subject Paper 1): २५० गुण.
- पेपर ९: वैकल्पिक विषय पेपर २ (Optional Subject Paper 2): २५० गुण.
४. मुलाखत (Interview):
- मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- मुलाखत २७५ गुणांची असते.
- मुलाखतीमध्ये उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाची, संभाषण कौशल्याची आणि प्रशासकीय क्षमतांची चाचणी घेतली जाते.
५. अंतिम निवड:
- मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. (१७५०+२७५ =२०२५ गुण )
- पूर्व परीक्षेतील गुणांचा अंतिम निवडीमध्ये समावेश नसतो.
नवीन महाराष्ट्र राज्यसेवा अभ्यासक्रम ( MPSC New Syllabus ) बघण्यासाठी खालील PDF डाउनलोड करा.
| MPSC New Syllabus 2026 Marathi / राज्यसेवा मराठी अभ्यासक्रम | Download |
| MPSC New Syllabus English 2026 | Download |
| MPSC Old Syllabus | Click Here |
MPSC Book List : Click Here
इतर परीक्षेचे अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा

One comment