महाराष्ट्रातील समाज सुधारक-लाला लजपत रॉय (इ. स. १८६५ ते १९२८)

0
47
  • जन्म: २८ जानेवारी १८६५
  • मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२८
  • पूर्ण नाव : लाला लजपत राधाकृष्ण रॉय.
  • वडील : राधाकृष्ण
  • आई : गुलाब देवी.
  • जन्मस्थान : धुडेकी (जी. फिरोजपूर, पंजाब)
  • शिक्षण : इ.स. १८८० मध्ये कलकत्ता आणि पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण.
  • इ. स. १८८६ मध्ये कायद्याची पदवी मिळवली

कार्य

त्या वेळी स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला ‘आर्य समाज’ सार्वजनिक कार्यात अग्रेसर होता. आर्य समाजाच्या विकासोन्मुख आदर्शाकडे व समाजसुधारणेच्या योजनांकडे लालाजी आकर्षित झाले. ते वयाच्या सोळाव्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले.

इ. स. १८८२ साली हिंदी व उर्दू यांपैकी कोणत्या भाषेला मान्यता असावी, याबद्दल मोठा वाद चालला होता. लालाजी हिंदीच्या बाजूचे होते. त्यांनी सरकारला तसा एक अर्ज केला व त्यावर हजारो लोकांच्या सह्या गोळा केल्या.

इ.स. १८८६ मध्ये कायद्याची पदवी परीक्षा देऊन दक्षिण पंजाबमधील हिस्सारला त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

इ. स. १८८६ साली लाहोरला आर्य समाजाच्या वतीने दयानंद अँग्लो – वैदिक कॉलेज काढण्याचे ठरले. त्यासाठी लालाजींनी पंजाबातून पाच लाख रुपये गोळा केले. १ जून १८८६ रोजी कॉलेजची स्थापना झाली. लालाजी त्याचे सचिव बनले.

आर्य समाजाचे अनुयायी म्हणून ते अनाथ मुले, विधवा, व दुष्काळग्रस्त लोकाच्या साहाय्याला धावून जात.

इ. स. १९०४ मध्ये ‘द पंजाब’ नामक इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. या वृत्तपत्राने पंजाबात राष्ट्रीय चळवळीचे रान पेटविले.

इ.स. १९०५ मधये काँग्रेसतर्फे भारताची बाजू माइण्यासाठी लालाजीना इगलंडला पाठवायचे ठरले. त्यासाठी त्यांना जो पैसा देण्यात आला त्यातील नेता पैसा त्यांनी दयानंद अग्ला – वैदिक कॉलेजला व निमा अनाथ विद्याथ्यांच्या शिक्षणासाठी दिला. इंग्लंडला जाण्याचा खर्च त्यांचा त्यानीच केला.

इ.स. १९०७ मध्ये लाला लजपत रॉय शेतकऱ्याना चिथावणी देतात, सरकार विरोधी लोकांना भडकवितात या आरोपांवर सरकारने त्याना मंडालेच्या तुरुंगात ठेवले होते. सहा महिन्यांनी त्यांची सुटका झाली पण त्यांच्या पाठीशी लागलेल्या सरकारी हेरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते अमेरिकेस गेले. तिथे असलेल्या भारतीयांमध्ये स्वदेशाच्या स्वातंत्र्याची लालसा निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र काढले. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेग देण्यासाठी ‘इंडियन होमरूल लीग’ ची स्थापना केली.

स्वदेशाविषयी परदेशी लोकांत विशेष जागृती निर्माण करून १९२० मध्ये ते मायदेशी परतले. १९२० साली कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला व तुरुंगवास भोगला. तत्पूर्वी लालाजींनी लाहोरमध्ये ‘टिळक राजनीतिशास्त्र शाळा’ नामक राष्ट्रीय शाळा सुरू केली होती.

लालाजींनी ‘पीपल्स सोसायटी’ (लोकसेवक संघ) नावाची समाजसेवकांची संस्था काढली होती.

इ. स. १९२५ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लालाजींनी भुलविले..

इ. स.१९२५ मध्ये ‘वंदे मातरम्’ नामक उर्दू दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

इ. स. १९२६ मध्ये जिनिव्हाला आंतरराष्ट्रीय श्रमसंमेलन झाले. भारतीय अमिकाचे प्रतिनिधी म्हणून लालाजींनी त्यात भाग घेतला. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये झालेल्या अशाच समेलनांतही त्यांनी भाग घेतला.

इ. स. १९२७ मध्ये भारतात काही सुधारणा कर देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती केली पण सायमन कमिशन मध्ये साठी दस्य है इंग्रजच होते. त्यात एकही भारतीय नव्हता म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

३० ऑक्टोबर १९२८ ला सायमन कमिशन पंजाब मधील लाहोर येथे पोहोचले. लोकांनी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निषेधासाठी प्रचंड मोर्चा काढला होता. पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठीहल्लयात लाला लजपतराय जखमी झाले आणि दोन आठवड्यांनंतर रुणालयात ते मरण पावले.

ग्रंथसंपदा

इटलीतील देशभक्त जोसेफ मॅझिनी आणि गॅरिवाल्डी यांची चरित्रे तसेच श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी आणि दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर लालाजींनी पुस्तके लिहिली.

यंग इंडिया, अन हॅपी इंडिया, आर्य समाज इत्यादी ग्रंथ लिहिले.

विशेषता

लाल-बाल पाल या जहाल त्रिमूर्ती पैकी एक लालाजी होते.

‘पंजाब केसरी’ हा किताब लोकांकडून लालाजींना मिळाला आहे.

मृत्यू

१७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचे निधन झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा