लाला लजपतराय – Lala Lajpat Rai Information in Marathi

लाला लजपतराय माहिती मराठी: Lala Lajpat Rai Full Information in marathi.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाला लजपतराय एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि समाज सुधारक होते.

लाला लजपतराय यांची थोडक्यात माहिती

  • जन्म: २८ जानेवारी १८६५
  • मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२८
  • पूर्ण नाव : लाला लजपत राधाकृष्ण रॉय.
  • वडील : राधाकृष्ण
  • आई : गुलाब देवी.
  • जन्मस्थान : धुडेकी (जी. फिरोजपूर, पंजाब)
  • शिक्षण : इ.स. १८८० मध्ये कलकत्ता आणि पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण.
  • इ. स. १८८६ मध्ये कायद्याची पदवी मिळवली

लाला लजपतराय जीवन परिचय

  • लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1836 मध्ये पंजाब मधील धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला होता. सन 1849 ला त्यांचा विवाह राधा देवी यांच्याशी झाला. तर 1870 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडीलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लाला लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
  • थोर राजकारणी व ते एक उत्तम लेखक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. व ते जहाल मतवादी नेते होते.
  • स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामध्ये सहभागी झाले. या सम्मेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
  • लाला लजपत रायांनी राष्ट्रीय काँग्रेस च्या 1888 आणि 1889 या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला. पुढे 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली.
  • दरम्यान त्यांनी संपुर्ण देशात स्वदेशी वस्तु स्विकारण्याकरता एक अभियान चालवले. 1905 मधे ज्यावेळी बंगाल चे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला होता.
  • सायमन कमिशनचा विरोध शांततेने लढा करण्याची लालाजिंची इच्छा होती. त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पैनलमध्ये भारतीय राहू शकत नाहीत तर या कमिशन ने भारतातुन परत जावे. परंतु ब्रिटीश सरकार त्यांची ही मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठीचार्ज सुरू केला या अमानुष लाठीचार्ज मध्ये लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले व त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.
  • या घटनेमुळे त्यांचे मनोबल खचले होते व त्यांची प्रकृती देखील खालावत गेली आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.

लाला लजपतराय कार्य Lala Lajpat Rai Works in Marathi

  • त्या वेळी स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला ‘आर्य समाज’ सार्वजनिक कार्यात अग्रेसर होता. आर्य समाजाच्या विकासोन्मुख आदर्शाकडे व समाजसुधारणेच्या योजनांकडे लालाजी आकर्षित झाले. ते वयाच्या सोळाव्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले.
  • इ. स. १८८२ साली हिंदी व उर्दू यांपैकी कोणत्या भाषेला मान्यता असावी, याबद्दल मोठा वाद चालला होता. लालाजी हिंदीच्या बाजूचे होते. त्यांनी सरकारला तसा एक अर्ज केला व त्यावर हजारो लोकांच्या सह्या गोळा केल्या.
  • इ.स. १८८६ मध्ये कायद्याची पदवी परीक्षा देऊन दक्षिण पंजाबमधील हिस्सारला त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.
  • इ. स. १८८६ साली लाहोरला आर्य समाजाच्या वतीने दयानंद अँग्लो – वैदिक कॉलेज काढण्याचे ठरले. त्यासाठी लालाजींनी पंजाबातून पाच लाख रुपये गोळा केले. १ जून १८८६ रोजी कॉलेजची स्थापना झाली. लालाजी त्याचे सचिव बनले.
  • आर्य समाजाचे अनुयायी म्हणून ते अनाथ मुले, विधवा, व दुष्काळग्रस्त लोकाच्या साहाय्याला धावून जात.
  • इ. स. १९०४ मध्ये ‘द पंजाब’ नामक इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. या वृत्तपत्राने पंजाबात राष्ट्रीय चळवळीचे रान पेटविले.
  • इ.स. १९०५ मधये काँग्रेसतर्फे भारताची बाजू माइण्यासाठी लालाजीना इगलंडला पाठवायचे ठरले. त्यासाठी त्यांना जो पैसा देण्यात आला त्यातील नेता पैसा त्यांनी दयानंद अग्ला – वैदिक कॉलेजला व निमा अनाथ विद्याथ्यांच्या शिक्षणासाठी दिला. इंग्लंडला जाण्याचा खर्च त्यांचा त्यानीच केला.
  • इ.स. १९०७ मध्ये लाला लजपत रॉय शेतकऱ्याना चिथावणी देतात, सरकार विरोधी लोकांना भडकवितात या आरोपांवर सरकारने त्याना मंडालेच्या तुरुंगात ठेवले होते. सहा महिन्यांनी त्यांची सुटका झाली पण त्यांच्या पाठीशी लागलेल्या सरकारी हेरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते अमेरिकेस गेले. तिथे असलेल्या भारतीयांमध्ये स्वदेशाच्या स्वातंत्र्याची लालसा निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र काढले. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेग देण्यासाठी ‘इंडियन होमरूल लीग’ ची स्थापना केली.
  • स्वदेशाविषयी परदेशी लोकांत विशेष जागृती निर्माण करून १९२० मध्ये ते मायदेशी परतले. १९२० साली कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला व तुरुंगवास भोगला. तत्पूर्वी लालाजींनी लाहोरमध्ये ‘टिळक राजनीतिशास्त्र शाळा’ नामक राष्ट्रीय शाळा सुरू केली होती.
  • लालाजींनी ‘पीपल्स सोसायटी’ (लोकसेवक संघ) नावाची समाजसेवकांची संस्था काढली होती.
  • इ. स. १९२५ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लालाजींनी भुलविले..
  • इ. स.१९२५ मध्ये ‘वंदे मातरम्’ नामक उर्दू दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
  • इ. स. १९२६ मध्ये जिनिव्हाला आंतरराष्ट्रीय श्रमसंमेलन झाले. भारतीय अमिकाचे प्रतिनिधी म्हणून लालाजींनी त्यात भाग घेतला. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये झालेल्या अशाच समेलनांतही त्यांनी भाग घेतला.
  • इ. स. १९२७ मध्ये भारतात काही सुधारणा कर देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती केली पण सायमन कमिशन मध्ये साठी दस्य है इंग्रजच होते. त्यात एकही भारतीय नव्हता म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
  • ३० ऑक्टोबर १९२८ ला सायमन कमिशन पंजाब मधील लाहोर येथे पोहोचले. लोकांनी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निषेधासाठी प्रचंड मोर्चा काढला होता. पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठीहल्लयात लाला लजपतराय जखमी झाले आणि दोन आठवड्यांनंतर रुणालयात ते मरण पावले.

लाला लजपतराय ग्रंथसंपदा

  • इटलीतील देशभक्त जोसेफ मॅझिनी आणि गॅरिवाल्डी यांची चरित्रे तसेच श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी आणि दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर लालाजींनी पुस्तके लिहिली.
  • यंग इंडिया, अन हॅपी इंडिया, आर्य समाज इत्यादी ग्रंथ लिहिले.

लाला लजपतराय विशेषता

  • लाल-बाल पाल या जहाल त्रिमूर्ती पैकी एक लालाजी होते.
  • ‘पंजाब केसरी’ हा किताब लोकांकडून लालाजींना मिळाला आहे.

Also Read:

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा