मॅडम भिकाजी कामा यांची पूर्ण माहिती मध्ये, Read complete Information about Madam Bhikaji Kama in Marathi.
मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
Madam Bhikaji Kama Information in Marathi
- जन्म: २४ सप्टेंबर १८६१.
- मृत्यू : इ. स १९३६
- पूर्ण नाव : मॅडम भिकाजी रुस्तूमजी कामा.
- वडील : सोराबजी फ्रेमजी पटेल.
- आई : जीजीबाई
- जन्मस्थान : मुंबई
- शिक्षण : अलेक्झांड्रा पारसी कन्या विद्यालय त्यांनी शिक्षण घेतले. भारतीय व विदेशी भाषा अवगत.
- विवाह : रुस्तूमजी कामा सोबत (इ. स. १८८५ मध्ये).
मॅडम भिकाजी कामा यांचे कार्य
- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता. या भयानक संसर्गजन्य रोगाला जेव्हा अनेक लोक बळी पडू लागले तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता रोग्यांच्या सेवाकार्यात भिकाजी कामा यांनी स्वतःला झोकून दिले. परिणामी त्यांना स्वतःलाही त्या रोगाची लागण झाली.
- केवळ सुदैवाने त्या वाचल्या. हवापालट व विश्रांतीसाठी तिच्या सुहृदांनी-नातेवाईकांनी त्यांना इ. स. १९०२ मध्ये यूरोपला पाठविले..
- जर्मनी, स्कॉटलंड आणि फ्रान्स या देशांत प्रत्येकी एकेक वर्ष राहून इ.स. १९०५ मध्ये मॅडम कामा लंडनला आल्या.
- स्वास्थ्यलाभानंतर मॅडम कामा यांनी दादाभाई नौरोजी याचे खासगी सचिव म्हणून दीड वर्ष काम केले. त्या निमिताने त्या अनेक देशभक्त आणि विद्वान व्यक्तींच्या संपर्कात आल्या.
- लंडनमधील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी प्रभावी भाषणे केली.
- स्वातत्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या संपर्कात त्या आल्या. सावरकर,मॅडम कामा आणि काही अन्य देशभक्तांनी मिळून इ. स. १९०५ मध्ये आपल्या तिरंगी ध्वजाचे प्रारूप ठरविले.
- या झेंडयावर हिरवा, केशरी आणि लाल अशा तीन रंगाचे पट्टे होते. सर्वात वर हिरव्या रंगाचा पट्टा असून त्यावर दाखविलेले उमलते आठ पाकळ्यांचे कमळ हे तत्कालीन भारतातील आठ प्रातांचे जणू प्रतिनिधित्व करणारे होते.
- मधल्या केशरी पट्ट्यावर देवनागरी लिपीत ‘वंदे मातरम्’ शब्द भारतमातेला अभिवादन या आशयाने झळकत होते.
- सर्वात शेवटी (खाली) तांबड्या पट्ट्यावर उजव्या बाजूला अर्धचंद्र आणि डाव्या बाजूला उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब होते. तांबडा रंग शक्ती, केशरी रंग विजय आणि हिरवा रंग साहस व उत्साह या तीन महत्त्वपूर्ण गोष्टीच जणू दर्शवीत होते.
- इ.स. १९०७ मध्ये ऑगस्ट महिन्यात जर्मनीतील स्टूटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस संमेलनात मॅडम भिकाजी कामा यांना भारतीय क्रांतिकारकांनी भारताचा प्रतिनिधी म्हणून पाठविले.
- मॅडम कामांनी विदेशी भूमीवर अनेक देशी-विदेशी प्रतिनिधींसमोर भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकविला.
- त्या पुढे फ्रान्समध्ये गेल्या. बॉम्ब बनविण्याची कला भारतीय क्रांतिकारकांना शिकण्यासाठी त्यांनी मदत केली.
- इ. स. १९०९ मध्ये ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र लाला हरदयालनी सुरू केले. हे वृत्तपत्र चालविण्या कामी भिकाजी कामा यांनी त्यांना मोलाची मदत केली.
विशेषता
मॅडम भिकाजी कामा यांना पहिली भारतीय महिला क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते .
Also Read:
- पंडित जवाहरलाल नेहरू – Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi
- लोकमान्य टिळक । Lokmanya Tilak Information in Marathi
- महात्मा गांधी – Mahatma Gandhi Information in Marathi
- संत व त्यांची मूळ गाव
- डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती । Dr. Babasaheb Ambdekar Information in Marathi