मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ – VakyaPrachar in Marathi

मराठी वाक्यप्रचार व अर्थ – Vakya Prachar Ani Arth in Marathi : मराठी मधील २०० हुन अधिक वाक्यप्रचार व त्याचे अर्थ पुढील प्रमाणे. स्पर्धा परीक्षे मध्ये नेहमीच मराठी वाक्यप्रचार वाक्यात उपयोग करा असे प्रश्न विचारले जातात. आम्ही नेहमी प्रमाणे वाक्य प्रचाराची लिस्ट तयार केली आहे. तुम्ही PDF मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता .

वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट

वाक्यप्रचार वाक्यमनात कायमचे राहणेप्रचार अर्थ
सर्वस्व पणाला लावणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
साखर पेरणे गोड गोड बोलून आपलेसे करणे
सामोरे जाणे निधड्या छातीने संकटास तोंड देणे
साक्षर होणे लिहिता-वाचता येणे
साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
सुताने स्वर्गाला जाण थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े
सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे
सूतोवाच करणे पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे
संधान बांधने जवळीक निर्माण करणे
संभ्रमात पडणे गोंधळात पाडणे
स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे
स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरीवर येणे जोराने भांडू लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे
हस्तगत करणे ताब्यात घेणे
हातपाय गळणे धीर सुटणे
हातचा मळ असणे सहजशक्य असणे
हात ओला होणे फायदा होणे
हात टेकणे नाइलाज झाल्याने माघार घेणे
हात देणे मदत करणे
हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे
हाय खाणे धास्ती घेणे
हात चोळणे चरफडणे
हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
हात हलवत परत येणे काम न होता परत येणे
हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे
हाता पाया पडणे गयावया करणे
हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे
हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातावर शीर घेणे जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे
हात धुवून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हूल देणे चकवणे
पोटात ब्रह्मराक्षस उठणे खूप खावेसे वाटणे
प्रश्नांची सरबत्ती करणे एक सारखे प्रश्न विचारणे
प्राण कानात गोळा करणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे
प्राणावर उदार होणे जिवाची पर्वा न करणे
फाटे फोडणे उगाच अडचणी निर्माण करणे
फुटाण्यासारखे उडणे झटकन राग येणेवाक्प्रचार
बट्ट्याबोळ होणे विचका होणे
ब्रम्हा करणे बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे
बारा वाजले पूर्ण नाश होणे
बादरायण संबंध असणे ओढून ताणून लावलेला संबंध असणे
बत्तीशी रंगवणे जोराने थोबाडीत मारणे
बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे
बेत हाणून पाडणे बेत सिद्धीला जाऊ न देणे
, बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून राहते
बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
बोल लावणे दोष देणे
बोळ्याने दूध पिणे बुद्धिहीन असणे
बोलाफुलाला गाठ पडणे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे
भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे
भान नसणे जाणीव नसणे
भारून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे
मनात मांडे खाणे व्यर्थ मनोराज्य करणे
माशा मारणे कोणताही उद्योग न करणे
मिशीवर ताव मारणे बढाई मारणे
मधून विस्तव न जाणे अतिशय वैर असणे
मूग गिळणे उत्तर न देता गप्प राहणे
मधाचे बोट लावणे आशा दाखवणे
मनात घर करणे मनात कायमचे राहणे
मन मोकळे करणे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे
मनाने घेणे मनात पक्का विचार येणे
मन सांशक होणे मनात संशय वाटू लागणे
मनावर ठसण मनावर जोरदारपणे बिंबणे
मशागत करणे मेहनत करून निगा राखणे
मात्रा चालणे योग्य परिणाम होणे
रक्ताचे पाणी करणे अतिशय मेहनत करणे
राईचा पर्वत करणे शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
राख होणे पूर्णपणे नष्ट होणे
राब राब राबणे सतत खूप मेहनत करणे
राम नसणे अर्थ नसणे
राम म्हणणे शेवट होणे मृत्यू येणे
लष्कराच्या भाकर्‍या भाजणे दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे
लहान तोंडी मोठा घास घेणे आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे
लक्ष वेधून घेणे लक्ष ओढून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे
लौकिक मिळवणे सर्वत्र मान मिळवणे
वकील पत्र घेणे एखाद्याची बाजू घेणे
वाट लावणे विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे
वाटाण्याच्या अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारले
वठणीवर आणणे ताळ्यावर आणणेे
वणवण भटकणे एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे
वाचा बसणे एक शब्द येईल बोलता न येणे
विचलित होणे मनाची चलबिचल होणे
विसंवाद असणे एकमेकांशी न जमणे
वड्याचे तेल वांग्यावर काढणे एकाचा राग दुस-यावर काढणे
विडा उचलणे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे
वेड घेऊन पेडगावला जाणे मुद्दाम ढोंग करणे
शब्द जमिनीवर पडू न देणे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
शहानिशा करणे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
शिगेला पोचणे शेवटच्या टोकाला जाणे
शंभर वर्ष भरणे नाश होण्याची वेळी घेणे
श्रीगणेशा करणे आरंभ करणे
सहीसलामत सुटणे दोष न येता सुटका होणे
दगा देणे फसवणे
दबा धरून बस णे टपून बसणेे
दाद मागणे तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे
दात धरणे वैर बाळगणे
दाढी धरणे विनवणी करणे
दगडावरची रेघ खोटे न ठरणारे शब्द
दातांच्या कन्या करणे अनेक वेळा विनंती करून सांगणे
दाती तृण धरणे शरणागती पत्करणे
दत्त म्हणून उभे राहणे एकाएकी हजर होणे
दातखिळी बसणे बोलणे अवघड होणे
द्राविडी प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
दात ओठ खाणे द्वेषाची भावना दाखवणे
दोन हातांचे चार हात होणे विवाह होणे
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे
दातास दात लावून बसणे काही न खातो उपाशी राहणे
दुःखावर डागण्या देणे झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे
धारातीर्थी पडणे रणांगणावर मृत्यू येणे
धाबे दणाणणे खूप घाबरणेे
धूम ठोकणे वेगाने पळून जाणे
धूळ चारणे पूर्ण पराभव करणे
नजरेत भरणे उठून दिसणे
नजर करणे भेटवस्तू देणे े
नाद घासणे स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे
नाक ठेचणे नक्शा उतरवणे
नाक मुरडणे नापसंती दाखवणे
नाकावर राग असणे लवकर चिडणे
नाकाला मिरच्या झोंबणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे
नाकी नऊ येणे मेटाकुटीला येणे फार त्रास होणे
नांगी टाकणे हातपाय गाळणे
नाकाने कांदे सोलणे स्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे
नक्राश्रू ढाळण अंतर्यामी आनंद होत असताना बाह्यतः दुःख दाखवणे
नक्शा उतरवणे गर्व उतरवणे
नाकाशी सूत धरणे आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
पाठीशी घालने संरक्षण देणे
पाणी पडणे वाया जाणे
पाणी मुरणे कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे
पाणी पाजणे पराभव करणे
पाणी सोडणे आशा सोडणे
पदरात घेणे स्वीकारणे
पदरात घालने सुख पटवून देणे स्वाधीन करणे
पाचवीला पुजणे त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे
पाठ न सोडणे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
पाढा वाचणे सविस्तर हकीकत सांगणे
पादाक्रांत करणे जिंकणे
पार पाडणे पूर्ण करणे
पाण्यात पाहणे अत्यंत द्वेष करणे
पराचा कावळा करणे मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे
पाऊल वाकडे पडणे वाईट मार्गाने जाणे
पायाखाली घालने पादाक्रांत करणे
पुंडाई करणे दांडगाईने वागणे
पाठ दाखवणे पळून जाणे
पायमल्ली करणे उपमर्द करणे
पोटात कावळे काव काव करणे अतिशय भूक लागणे
पोटात घालने क्षमा करणे
पोटात शिरणे मर्जी संपादन करणे
पोटावर पाय देणे उदर निर्वाहाचे साधन काढून
पोटाची damdi वळणे खायला न मिळणे
पदरमोड करणे दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे
पोटाला चिमटा घेणे पोटाला न खाता राहणे
चौदावे रत्न दाखवणे मार देणे
जमीनदोस्त होणे पूर्णपणे नष्ट होणे
जंग जंग पछाडणे निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे
जिभेला हाड नसणे वाटेल ते बेजबाबदार पणे बोलणे जिवात जिव येणे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे
जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे
जीव मोठीच धरणे मन घट्ट करणे
जीव मेटाकुटीस येणे त्रासाने अगदी कंटाळून झाली
जीव अधीर होणे उतावीळ होणे
जीव टांगणीला लागणे चिंताग्रस्त होणे
जीवावर उदार होणे प्राण देण्यास तयार होणे
जिवाचे रान करणे खूप कष्ट सोसणे
जीव खाली पडणे काळजी मुक्त होणे
धडा करणे जिवाच्या धडा करणे पक्का निश्चय करणे
जीव की प्राण असणे प्राणाइतके प्रिय असणे
जिवावर उठणे जीव घेण्यास उद्युक्त होणे
जीवावर उड्या मारणे दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे
जीवाला घोर लागणे खूप काळजी वाटणे
जीव गहाण ठेवणे कोणत्याही त्यागास तयार असणे
जिव थोडा थोडा होणे अतिशय काळजी वाटणे
जोपासना करणे काळजीपूर्वक संगोपन करणे
झाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य
झळ लागणे थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे
टक लावून पाहणे एकसारखे रोखून पाहणे
टाहो फोडणे मोठ्याने आकांत करणे
टाके ढीले होणे अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे
टेंभा मिरविणे दिमाख दाखवणे
डाव साधने संधीचा फायदा घेऊन कार्य साधने योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे
डाळ शिजणे थारामानी मिळणे आणि सोया जुळणे मनाजोगे काम होणे
डांगोरा पिटणे जाहीर वाच्यता करणे
डोक्यावर मिरी वाटणे वरचढ होणे
डोके खाजविणे एखाद्या गोष्टीचा विचार करणे
डोक्यावर खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे
डोळ्यांवर कातडे ओढणे जाणून बुजून दुर्लक्ष करणे
डोळा चुकवणे अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणे
डोळे निवणे समाधान होणे
डोळ्यांत खुपणे सहन न होणे
डोळ्यांचे पारणे फिटणे पूर्ण समाधान होणे
डोळे खिळून राहणे एखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे
डोळे दिपवले थक्क करून सोडले
डोळ्यात प्राण आणणे एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे
डोळे फाडून पहाणे तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे
डोळ्यात तेल घालून रहाणे अतिशय जागृत रहाणे
डोळे भरून पहाणे समाधान होईपर्यंत पाहाने
तडीस नेणे पूर्ण करणे
ताळ्यावर आनने योग्य समज देणे
तळपायाची आग मस्तकात जाणे अतिशय संताप होणे
तारांबळ उडणे अतिशय घाई होणे
तिलांजली देणे सोडणे त्याग करणे
तोंड काळे करणे दृष्टीआड होणे नाहीसे होणे
तोंडाला पाने पुसणे फसवणे
तळहातावर शीर घेणे जीवावर उदार होणे
तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरले भयभयीत होणे
तोंडाला पाणी सुटणे लालसा उत्पन्न होणे
त्राटिका कजाग बायको
तोंडात बोट घालने आश्चर्यचकित होणे
तोंड ढाकणे बोलणे
तोंडावाटे ब्र न काढणे एकही शब्द न उच्चारणे
थांब न लागणे कल्पना न येणे
थुंकी झेलणे खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे
उष्टे हाताने कावळा न हाकण कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे
एक घाव दोन तुकडे करणे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे
अंगावर काटे उभे राहणे भीतीने अंगावर शहारे येणे
अंगावर मूठभर मांस चढणे धन्यता वाटणे
अंगाचा तिळपापड होणे अतिशय संताप येणे
अंथरूण पाहून पाय पसरणे एपती नुसार खर्च करणे
कणिक तिंबणे खूप मार देणे
कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे
कपाळमोक्ष होणे मरण पावणे
काण फुंकणे दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे
कागदी घोडे नाचवणे लेखनात शूरपणा दाखविणे
कानावर हात ठेवणे माहीत नसल्याचा बहाणा करणे
कानउघाडणी करणे क** शब्दात चूक दाखवून देणे
काका वर करणे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे
कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे
कायापालट होणे स्वरूप पूर्णपणे बदलणे
काट्याने काटा काढणे का शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे
काट्याचा नायटा होणे शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे
कावरा बावरा होणे बाबरने
काळजाचे पाणी पाणी होणे अति दुःखाने मन विदारण होणे
कुत्रा हाल न खाणे अतिशय वाईट स्थिती येणे
कंठस्नान घालने ठार मारणे
कंठशोष करण ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे े
कंबर कसणे एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे
कुंपणानेच शेत खाणे ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे
केसाने गळा कापणे वरकरणी प्रेम दाखवून कप्तान एखाद्याचा घात करणे
कोंबडे झुंजवणे दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे
कोपरापासून हात जोडणे काही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे
खडा टाकून पहाणे अंदाज घेणे
खसखस पिकणे मोठ्याने हसणे
खूणगाठ बांधणे निश्चय करणे
खडे चारणे शरण येण्यास भाग पाडणे
खडे फोडणे दोष देणे
खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
खाजवुन खरुज काढणे मुद्दाम भांडण करू उकरून काढणे
खाल्ल्याघरचे वासे मोजणे उपकार करणार याचे वाईट चिंतेने
खो घालने विघ्न निर्माण करणे
गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे
गळ्यातील ताईत अतिशय प्रिय
गळ घालने अतिशय आग्रह करणे
गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालने
गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे
गाडी पुन्हा रुळावर येणे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत मार्ग योग्य मार्गाला येणे
गुजराण करणे निर्वाह करणे
गुण दाखवणे निर्गुण दाखवून दुर्गुण दाखवणे
गंगेत घोडे न्हाने कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे
गळ्यात धोंड पडणे तिचं असताना जबाबदारी अंगावर पडणे
गाशा गुंडाळणे एकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे
घडी भरणे विनाश काळ जवळ येऊन ठेपणे
घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे
घर धुवून नेणे सर्वस्वी लुबाडणे
घाम गाळणे खूप कष्ट करणे
घालून-पाडून बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे
घोडे मारणे नुकसान करणे
घोडे पुढे धामटणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणेे
घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे े
चतुर्भुज होणे लग्न करणे
चार पैसे गाठीला बांधणे थोडीफार बचत करणे
चुरमुरे बाळा खात बसणे खजील होणे
चारी दिशा मोकळ्या होणे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे
अग्निदिव्य करण कठीण कसोटीला उतरणेे
अंगद धरणे लठ्ठ होणे
अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवला
अंग काढून घेणे संबंध तोडणे
अठराविश्वे दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्र्य असणे
अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे
अडकित्त्यात सापडणे पेचात सापडणे
अंगाची लाही होणे खूप राग येणे
अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे
आकाशाची कुराड आकस्मिक संकट
अन्नास जागणे उपकाराची आठवण ठेवणे
अन्नास मोताद होणे आत्यंतिक दारिद्र्यात जगणे
अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळवून देणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशाने चढून जाणे
आकांडतांडव करणे रागाने आदळआपट करणे
आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे
आकाश पाताळ एक करणे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने
आकाश पाटणे चारी बाजूंनी संकटे येणे
आकाशाला गवसणी घालने आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे
आगीत तेल ओतणे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे
आज लागणे झळ लागणे
आपल्या पोळीवर तूप ओढणे स्वतःचा फायदा करून घेणे
आभाळ कोसळणे एकाएकी फार मोठे संकट येणे
उखळ पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे
इतिश्री करणे शेवट करणे
उखाळ्या-पाखाळ्या काढणे एकमेकांची उणीदुणी काढणे किंवा दोष देणे
उचलबांगडी करणे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे
उंटावरून शेळ्या हाकणे मनापासून काम न करणे दूरवरून निर्देश देणे स्वतः सामील न होता सल्ले देणे
उदक सोडले एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे
उध्वस्त होणे नाश पावणे
उंबराचे फूल क्वचित भेटणारी व्यक्ती
उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे
उन्हाची लाही फुटणे अतिशय कडक ऊन पडणे
उराशी बाळगणे मनात जतन करुन ठेवणे
उलटी अंबारी हाती येणे भीक मागण्याची पाळी येणे
निवास करने रहाणे
दुमदुमून जाणे निनादून जाणे
सांगड सांगड घालने मेळ साधने
प्रेरणा मिळणे स्फूर्ती मिळणे
नाव मिळवणे कीर्ती मिळवणे
हात न पसरणे न मागणे
आड येणे अडथळा निर्माण करणे
धन्य होणे कृतार्थ होणे
उदास होने खिन्न होणे
विहरणे संचार करणे
बाबरने गोंधळणे
वाट तुडवणे रस्ता कापणे
पाहुणचार करणे आदरातिथ्य करणे
अनमान करणे संकोच करणे
ताट वाढणे जेवायला वाढणे
तोंडीलावणे जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे
छोटे शाई चालवणे दांडगाई करणे
लांछनास्पद असणे लाजिरवाणी असणे
सुळकांडी मारणे सूर मारणे
मागमूस नसणे थांगपत्ता नसणे
अजरामर होणे कायमस्वरूपी टिकणे
कंपित होणे कापणे थरथरणे
बेत आखणे योजना आखणे
यक्षप्रश्न असणे महत्त्वाची गोष्ट असणे
प्रस्ताव ठेवणे ठराव मांडणे
विरोध दर्शवणे प्रतिकार करणे
प्राप्त करणे मिळवणे
गुमान काम करणे निमूटपणे काम करणे
सारसरंजाम असणे सर्व साहित्य उपलब्ध असणे हाडीमांसी भिनने अंगात मुरणे
स्तंभित होणे आश्चर्याने स्तब्ध होणे
मान्यता पावणे सिद्ध होणे
तोंडून अक्षरं न फुटणे घाबरून न बोलणे
कहर करणे अतिरेक करणे
कोडकौतुक होणे लाड होणे
अपूर्व योग येणे दुर्मिळ योग येणे
रुची निर्माण होणे गोडी निर्माण होणे
गुण्यागोविंदाने लहाने प्रेमाने एकत्र रहाणे
कसून मेहनत करणे खूप नेटाने कष्ट करणे
कसं लावणे सामर्थ्य पणाला लावणे
वरदान देणे कृपाशीर्वाद देणे
आत्मसात करणे मिळवणे अंगी बाणवणे
रियाज करणे सराव करणे
पाठिंबा देणे दुजोरा देणे
चेहरा खोलने आनंद होणे
छाननी करणे तपास करणे
अवाक होणे आश्चर्यचकित होण
ओढा असणे कल असणे
समरस होणे गुंग होणे
प्रतिष्ठान लाभणे मान मिळवणे
डाव येणे खेळात राज्य येणे
मात करणे विजय मिळवणे
सहभागी होणे सामील होणे
फिदा होणे खुश होणे
दिशा फुटेल तिकडे पडणे सैरावैरा पळणे
ओक्साबोक्शी रडणे मोठ्याने आवाज करत रडणे
हवालदील होणे हताश होणे
मनावर बिंबवणे मनावर ठसवणे
धुडगूस घालने गोंधळ घालून करणे
सपाटा लावणे एक सारखे वेगात काम करणे
किरकिर करणे एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे
खळखळ करणे नाखुशीने सतत नकार देणे टाळाटाळ करणे
मोहाला बळी पडणे एखाद्या गोष्टीच्या आसक्ती मध्ये वाहून जाणे
हाऊस मागवणे आवड पुरवून घेणे
रस असणे अत्यंत आवड असणे
राबता असणे सतत ये-जा असणे
फंदात न पडणे भानगडीत न अडकणे
नाव कमावणे कीर्ती मिळवणे
बहिष्कार टाकणेे वाळीत टाकणे नकार देणे
कारवाया करणे कारस्थाने करणे
कट करणे सख्य नसणे मैत्री नसणे
निद्राधीन होणे झोपणे
प्रत्यय येणे प्रचीती येणे
रवाना होणे निघून जाणे
देखभाल करणे जतन करणे
डोळे फिरले खूप घाबरणे
पाळी येणे वेळे येणे
दडी मारणे लपून राहणे
विसावा घेणे विश्रांती घेणे
व्रत घेणे वसा घेणे
प्रतिकार करणे विरोध करणे
झुंज देणे लढा देणे संघर्ष करणे
अभिलाषा धरणे एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
टिकाव लागणे निभाव लागणे
तगून राहणे मुखोद्गत असणे
हशा पिकणे हास्य स्फोट होणे
दिस बुडून जाणे सूर्य मावळणे
वजन पडणे प्रभाव पडणे
भडभडून येणे हुंदके देणे गलबलले
वनवन करणे खूप भटकणे
देहातून प्राण जाणे मरण येणे
हंबरडा फोडणे मोठ्याने रडणे
वाऱ्यावर सोडणे अनाथ करणे
बत्तर बाळ्या होणे चिंध्या होणे नासधूस होणे
प्रक्षेपित करणे प्रसारित करणे
बेत करणे योजना आखणे
पदरी घेणे स्वीकार करणे
ब्रह्म करणे भटकंती करणे
देखरेख करणे राखण करणे
उदास होणे खिन्न होणे
उत्पात करणे विध्वंस करणे
अभंग असणे अखंड असणे
ललकारी देणे जयघोष करणे
रोज ठेवणे चिडणे नाराजी असणे
तोंड देणे मुकाबला करणे सामना करणे
प्राणाला मुकले जीव जाणे मरण येणे
मती गुंग होणे आश्चर्य वाटणे
आवर्जून पाहणे मुद्दामहून पाहण
लळा लागणे ओढ वाटणे
आंबून जाणे भेटून जाणे थकणे विपर्यास होणे
डोळ्याला डोळा न भिडवणे घाबरून नजर न देणे
कापरे सुटणे घाबरल्यामुळे थरथरणे
हसता हसता पोट दुखणे खूप हसणे
बस्ती घेणे धक्का घेणे घाबरणे
घोकंपट्टी करणे अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे
प्रचारात आणणे जाहीरपणे माहिती देणे
ठसा उमटवणे छाप पाडणे
चक्कर मारणे फेरफटका मारणे
दप्तरी दाखल होणे संग्रही जमा होणे
अमलात आणणे कारवाई करणे
प्रतिष्ठापीत करणे स्थापना करणे
ग्राह्य धरणे योग्य आहे असे समजणे
धडपड करणे खूप कष्ट करणे
सूड घेणे बदला घेणे
चाहूल लागणे मागोवा लागणे
विरस होणे निराशा होणे उत्साहभंग होणे
ठाण मांडणे एका जागेवर बसून राहणे
परिपाठ असणे विशिष्ट पद्धत असणे नित्यक्रम असणे
छातीत धस्स देशी गोळा येणे अचानक खूप घाबरणे
आखाडे बांधणे मनात आराखडा किंवा अंदाज करणे
नाळ तोडणे संबंध तोडणे
वारसा देणे वडिलोपार्जित हक्क सोपवणे
अप्रूप वाटणे आश्चर्य किंवा कौतुक वाटणे
तारांबळ होणे घाईगडबड होणे
जम बसने स्थिर होणे
बस्तान बसणे पसंती मिळणे अनुकूलता लाभणे
मराठी भरारी मारणे झेप घेणे
पार पाडणे सांगता करणे
संपवणे संपन्न होणे
आयोजित करणे सिद्धता करणे प्रभावित होणे
छाप पडणे परिसीमा गाठणे प
राकोटीला जाणे काळ्यापाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे
प्रघात पडणे रीत असणे
बाहू स्फुरण पावणे स्फूर्ती येणे
भान ठेवणे जाणीव ठेवणे
नजर वाकडी करणे वाईट हेतू बाळगणे
गट्टी जमणे दोस्ती होणे
पहारा देणे राखण करणे
लवलेश नसणे जराही पत्ता नसणे जराही न होणे
उपोषण करणे लंघन करणे उपाशी राहणे
ताटकळत उभे राहणे वाट पाहणे
खंड न पडणे एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे
समजूत काढणे समजावणे हेवा वाटणे
मत्सर वाटणे काळजी घेणे
चिंता वाहने आस्था असणे
बडेजाव वाढवणे प्रौढी मिरवणे
वंचित रहाणे एखादी गोष्ट न मिळणे
भरभराट होणे प्रगती होणे समृद्धी होणे
बांधणी करणे रचना करणे
कटाक्ष असणे कल असणे
भर असणे जोर असणे
पुढाकार घेणे नेतृत्व करणे
हातभार लावणे सहकार्य करणे
कणव असणे आस्था किंवा करून असणे
गढून जाणे मग्न होणे गुंग होणे
काळ्या दगडावरची रेघ खोटे न ठरणारे शब्द
मिशांना तूप लावणे उगीच ऐट दाखवणे
Yogakshema चालविणे रक्षणाची काळजी वाहणे जीवाची मुंबई करणे अतिशय चैनबाजी करणे
अंगाला होणे अंगाला छान बसणे
अंगी ताठा भरणे मग्रुरी करणे े
पोटात ठेवणे गुप्तता ठेवणे
अठरा गुणांचा खंडोबा लबाड माणूस
धारवाडी काटा बिनचूक वजनाचा काटा
जीवाची मुंबई करणे अतिशय चैनबाजी करणे
डोळे लावून बसणे खूप वाट पाहणे
कुणकुण लागणे चाहूल लागणे
कच्छपी लागणे नादी लागणे
धिंडवडे निघणे फजिती होणे
बाजार गप्पा निंदानालस्ती
अंगावर काटा येणे भीती वाटणे
जीव वरखाली होणे घाबरणे
उसंत मिळणे वेळ मिळणे
चितपट करणे कुस्ती हरविणे
फटफटती सकाळ होणे पोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे
डोळे वटारणे रागाने बघणे
दक्षता घेणे काळजी घेणे
साशंक होणे शंका येणे
ज्याचे नाव ते असणे उपमा देण्यात उदाहरण नसणे
भानावर येणे परिस्थितीची जाणीव होणे शुद्धीवर येणे
निक्षून सांगणे स्पष्टपणे सांगणे
वाचा बंद होणे तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
तोंड भरून बोलणे खूप स्तुती करणे
गाजावाजा करणे खूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
नूर पातळ होणे रूप उतरणे
उसने बळ आणणे खोटी शक्ती दाखविणे
उताणा पडणे पराभूत होणे
खितपत पडणे क्षीण होत जाणे
भाऊबंदकी असणे ना त्यांना त्यात भांडण असणे
सांजावने संध्याकाळ होणे
कात्रीत सापडणे दोन्ही बाजूंनी संकटात सापडले
भंडावून सोडले त्रास देणे
खायचे वांदे होणे उपासमार होणे खायला न मिळणे
तगादा लावणे पुन्हा पुन्हा मागणी करणे
पडाव पडणे वस्ती करणे
चाहूल लागणे एखाद्याचे अस्तित्व जाणवणे
लष्टक लावणे झंझट लावणे निकड लावणे
ऊहापोह करणे सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
पाळत ठेवणे लक्ष ठेवणे
अनभिज्ञ असते एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे
कूच करने वाटचाल करणे
संभ्रमित होणे गोंधळणे
विदीर्ण होणे भग्न होणे मोडतोड होणे
साद घालने मनातल्या मनात दुःख करणे
वेसन घालने मर्यादा घालने
बारा गावचे पाणी पिणे विविध प्रकारचे अनुभव घेणे
रक्षणाची काळजी घेणे योगक्षेम चालविणे
मिनतवारी करणे दादा पुता करणे
गाजावाजा करने प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
उसने बळ आनने खोटी शक्ती दाखविणे
उताणे पडणे पराभूत होणे
कानशिलं ची भाजी होणे मारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे
हीच काय दाखविणे बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे
दातखिळी बसणे बोलती बंद होणे
नाक मुठीत धरणे अगतिक होणे
काळीज उडणे भीती वाटणे
नसती बिलामत येणे नसती कटकट ओढणे
पिंक टाकणे थुंकणे
सख्या नसणे प्रेमळ नाते नसणे े
चित्त विचलित होणे मूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे
आंदण देणे देऊन टाकणे
मनोरथ पूर्ण होणे इच्छा पूर्ण होणे
पुनरुज्जीवन करणे पुन्हा उपयोगात आणणे
निष्प्रभ करणे महत्व कमी करणे
अट्टहास करणे आग्रह धरणे
बळ लावणे शक्ती खर्च करणे
हुडहुडी भरणे थंडी भरणे
उच्छाद मांडला धिंगाना घालने
सही ठोकणे निश्चित करणे
माशी शिंकणे अडथळा येणे
पाचवीला पूजले एखादी गोष्ट जन्मापासून असणे
तजवीज करणे तरतूद करणे
प्रतिबंध करणे अटकाव करणे
जळफळाट होणे रागाने लाल होणे
डोक्यावर घेणे अति लाड करणे
देणे-घेणे नसणे संबंध नसणे
बस्तान ठोकणे मुक्काम ठोकणे
आभाळाला कवेत घेणे मोठे काम साध्य करणे
आतल्या आत कुढणे मनातल्या मनात दुःख करणे

तुम्ही वाचले आहेत मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ.