नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Panchayat Raj नवीन अपडेट

विधानपरिषद माहिती : Vidhan Parishad Information in Marathi

अपडेट: September 20, 2023

VidhanParishad Information in Marathi

• कलम-१७१ नुसार विधानपरिषदेच्या रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे.

• भारतात सध्या ७ घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे. (महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मिर, तेलंगणा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश.)

• महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ इतकी आहे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

• विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे द्वितीय व वरिष्ठ सभागृह आहे.

• कलम-१६९ नुसार घटकराज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित घटकराज्याच्या विधानसभेचा आहे.

• विधानपरिषद अस्तित्वात आणण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने २/३ बहुमताने ठराव पारित करावा लागतो, व हा ठराव संसदेने साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो.

• १९५६ च्या ७ व्या घटनादुरुस्तीनुसार विधानपरिषदेची सदस्यसंख्या संबंधित घटकराज्याच्या विधानसभा सदस्यसंख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी व ४० पेक्षा कमी नसावी असे ठरविण्यात आले आहे.


अपवाद :जम्मू काश्मिरच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ३६ इतकी आहे. सर्वात जास्त सदस्यसंख्या उत्तरप्रदेशच्या विधानपरिषदेची 100 इतकी आहे.

विधानपरिषद (Legislative Council) माहिती

निवडणूक पद्धत :

  • १/१२ (७) सदस्यांची निवड पद्वीधर मतदारसंघातून केली जाते.
  • १/३ (२६) सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिले जातात.
  • १/१२ (७) सदस्यांची निवड शिक्षक मतदार संघातून केली जाते.
  • कलम १७१ (३) नुसार विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे.
  • ३ वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराकडून हे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात.
  • १/३ (२६) सदस्य राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून त्या सभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तिमधून निवडुन दिले जातात.
  • विधानपरिषदेच्या एकुण सदस्यापैकी ५/६ सदस्य एकलसंक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीनुसार निवडुन दिले जातात.
  • नामनिर्देशित सदस्य – १/६ (१२) कलम १७१ (५) नुसार सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करतात.

पात्रता :

१) भारतीय नागरिकत्त्व असावे.

२) वयाची ३० वर्ष पूर्ण केलेली असावीत.

३) संसदेने केलेल्या कायद्यांच्या अटीची वेळोवेळी पूर्तता करावी.

कार्यकाळ :


• विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.

• दर दोन वर्षांनी विधान परिषदेतील १/३ सदस्य निवृत्त होतात व त्यांच्या जागी पुन्हा तितकेच नवीन सदस्य निवडले जातात.

• विधान परिषदेच्या सदस्यांची मुदत सहा वर्ष असते.

• सभागृहाच्या परवानगीविना सतत व सलग ६० दिवस विधान परिषदेच्या सभांना गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होते.

सभापती व उपसभापती :


• भारतीय घटनेमध्ये सभापती व उपसभापती यांच्या कार्यकाळ संदर्भात तरतूद नाही.

• विधानपरिषदेचे सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती म्हणून तर एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.

• विधानपरिषदेच्या सभापतींना लेखी स्वरूपात आपला राजीनामा उपसभापतींना द्यावा लागतो.

• उपसभापती व इतर सदस्य आपला राजीनामा सभापतीकडे देतात.

• विधानपरिषदेच्या सभापतींना विधानपरिषदेमध्ये बहुमताने ठराव समंत करुन पदावरुन दूर केले जाऊ शकते परंतु असा ठराव १४ दिवस आधी पुर्वसूचना दिल्यानंतरच मांडता येतो.

महत्त्वाचे :– राष्ट्रपतींची निवडणुक, घटनादुरुस्ती विधेयक यांमध्ये विधान परिषदेस स्थान नसते.
गणपूर्ती :- सभागृहाच्या एकुण सदस्य संख्येच्या एक दशांश (१/ किंवा १० यापैकी अधिक असेल ती झाल्यास सभापती सभागृह तहकूब करतात.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा